Sunday, 5 September 2021

डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेल्या काव्य संमेलनात अश्रूंचा फुटला बांध !! "प्रिय भावास राज्यस्तरीय कविसंमेलन ठरले भावस्पर्शी"

डॉ. दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ठेवलेल्या काव्य संमेलनात अश्रूंचा फुटला बांध !!

"प्रिय भावास राज्यस्तरीय कविसंमेलन ठरले भावस्पर्शी"


शहापूर, (एस.एल.गुडेकर) :
       डी. वाय. फाउंडेशन, ठाणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघ, लोक हिंद वृत्तवाहिनी आणि साप्ताहिक शिवमार्ग ने जेष्ठ साहित्यीक, निर्भीड शिवव्याखाते दिवंगत डॉ दिलीप धानके यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित केलेल्या प्रिय भावास या कविसंमेलनात कवींसह रसिकांच्याही अश्रूंचा बांध फुटला, अनेकांनी डॉ दिलीप धानके यांच्या व अनेक दिवंगत भावांच्या आठवणीने अश्रू अनावर झाले, डॉ. दिलीप धानके यांच्याबद्दल कविता व प्रास्तविक सादर करताना महेश धानके यांची भावाप्रति श्रद्धा पाहून तर सारेच संमेलन भावव्याकुळ झाले, किल्ले माहुलीच्या कुशीत माजी सभापती गजानन गोरे यांच्या फार्म हाऊसवर हे भावस्पर्शी व अविस्मरणीय असे राज्यस्तरीय कवि संमेलन पार पडले,
     डि.वाय.फाउंडेशन चे अध्यक्ष दयानंद चोरघे यांच्या शुभ हस्ते प्रथम, व्दितीय, तृतीय व उत्तेजनार्थ आलेल्या अनुक्रमे सुनील म्हसकर, सागरराजे निंबाळकर, देवभाऊ उबाळे, प्रसाद फर्डे, सुरेखा गायकवाड, वसंत हिरे याना सन्मान चिन्ह, मानपत्र, ज्ञानेश्वरी, पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले, यावेळी शहापूर - मुरबाड रहिवासी संघाचे अध्यक्ष किसन बोन्द्रे, कल्याण तालुका काँग्रेस अध्यक्ष परशुराम पितांबरे, सोनुभाऊ बसवंत महाविद्यालयाचे संचालक विनायक सापळे, प्रहार चे तालुका कार्याध्यक्ष धनंजय धसाडे, सेवा निवृत्त पोलीस अधिकारी वसंत भेरे, वैशाखरे येथील माजी सरपंच विलास घरत, आदर्श सरपंच चंदू कापडी, डॉ. दिलीप धानके यांचे जेष्ठ पुत्र रोहन धानके, देवेन्द्र भेरे, किरण केणे, चिंतामण वेखंडे, जयवंत विषे आदी मान्यवर उपस्थित होते, परीक्षक म्हणून जेष्ठ कवी केशव शेलवले तर युवा कवी प्रकाश फर्डे यांनी काम पाहिले, संमेलनात ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, नाशिक आणि पुणे येथील मान्यवर कवींनी आपल्या दर्जेदार कविता सादर केल्या, सूत्रसंचालन भास्कर जाधव, धनश्री पाठारी, वैशाली घरत यांनी केले तर संमेलन यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण घरत, रवींद्र परटोले, रामचंद्र जोशी, अंकुश भोईर, सिद्धार्थ धानके, रवींद्र जाधव, अविनाश वाकचौरे, तेजस रोकडे, मुकेश विशे, आशुतोष घरत, यांनी विशेष परिश्रम घेतले.

शिक्षक दिन* *- संत राजिन्दर सिंह जी महाराज*

*शिक्षक दिन*
*- संत राजिन्दर सिंह जी महाराज*


आजचा दिवस आपण सर्वजण 'शिक्षक दिन' किंवा 'टीचर्स डे' च्या रूपात साजरा करतो. या दिवशी आपण आपल्या शिक्षकांचा आणि गुरुजनांचा सन्मान करतो. काही शिष्य या प्रसंगी आपल्या शिक्षकांकरिता विविध प्रकारच्या भेटवस्तू घेऊन जातात, कोणी शुभेच्छा पत्र घेऊन जातात, तर कोणी काही अन्य भेटवस्तूही नेतात. अशा प्रकारे ते त्यांच्या विषयी आपली श्रद्धा आणि आभार प्रकट करतात.


या संसारात जेव्हा कधी आपल्या मुलांना एखादा विषय शिकायचा असेल तेव्हा, ते अशा शिक्षकांकडे जातात जे त्या विषयात निपुण आहेत. आपण हे सर्व चांगल्या प्रकारे जाणून आहोत की शिक्षकांची मुलांच्या जीवनात खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुलं केवळ लिहिणे वाचणे शिकत नाहीत, तर भविष्यात मोठे होऊन त्यांना काय बनायचे आहे याची माहिती सुद्धा त्यांना शिक्षकांद्वारेच मिळते.

अशाच पकारे जर आपण स्वतःला अध्यात्मिक रूपाने सुद्धा विकसित करू इच्छित असू, तर त्याकरिता आपल्याला कोणत्या विद्यमान पूर्ण सद्गुरूंच्या चरण-कमळी जावे लागेल. कारण एक पूर्ण सद्गुरु अध्यात्माच्या विषयात निपुण असतात. या धरतीवर प्रत्येक समयी कोणी ना कोणी पूर्ण सद्गुरु अवश्य अस्तित्वात असतात. जे आपणास ध्यान-अभ्यासा द्वारे आपल्या अंतरी अस्तित्वात असणाऱ्या प्रभु सत्तेशी जोडण्याकरिता आपली मदत करतात. प्रभुसत्ता कोणत्या ना कोणत्या मानवी शरीराच्या माध्यमातून अवश्य कार्य करत असते.

जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो तेव्हा आपणास माहीत होते की, चौर्‍यांशी लाख योनी मध्ये केवळ मानवदेहातच आपण आपल्या आत्म्याचे मिलन प्रभुशी करू शकतो, जो मानवी जीवनाचा मुख्य उद्देश आहे. ते आपल्याला समजावतात की, पिता परमेश्वर प्रेमाचे महासागर आहेत. आपला आत्मा त्यांचा अंश असल्याकारणाने प्रेम आहे आणि पिता परमेश्वराला प्राप्त करण्याचे माध्यम प्रेमच आहे.

शिक्षकांमध्ये शिष्याच्या जीवनात बदल घडवण्याची शक्ती असते. जर शिक्षक अशा विद्यार्थ्यांना शिकवत असतील ज्यांच्यात सदाचाराची कमी आहे तर ते त्यांना हळूहळू सदाचारी व्यक्तीमध्ये परिवर्तीत करतात. हेच काम एक सद्गुरु करतात, ते काम, क्रोध, लोभ, मोह आणि अहंकार ग्रस्त दुःखी लोकांना जवळ करतात आणि त्यांचे अशा माणसात परिवर्तन करतात की जे अहिंसा, पवित्रता, नम्रता, सत्य, निस्वार्थसेवा आणि प्रेमपूर्ण असतात. ते असं कसे करू शकतात? ते हे सर्व प्रभु प्रेमाच्या शक्तीने करू शकतात. 
तें केवळ आंतरिक अनुभव प्राप्तीच्या विधी विषयीच समजावित नाहीत तर ते प्रत्यक्ष त्याची अनुभूती सुद्धा देतात. कारण की केवळ बोलण्याने किंवा वाचनाने आपण अध्यात्म शिकू शकत नाही. हे केवळ व्यक्तिगत अनुभवानेच शिकता येते. आणि तो अनुभव केवळ पूर्ण सद्गुरु प्रदान करू शकतात.
याकरिता आपल्याला एखाद्या पूर्ण गुरूंना शरण गेले पाहिजे. जेव्हा ते आपल्याला दीक्षा अथवा नामदान देतात तेव्हा ते आपल्याला ध्यान-अभ्यासाची विधि शिकवितात. ते आपल्याला सांगतात की आपण आपले ध्यान दोन डोळ्यांच्या भ्रुमध्या मध्ये एकाग्र करावे ज्याला शिवनेत्र सुद्धा म्हटले जाते. जस-जसे आपण ध्यानाभ्यासाला वेळ देतो तस-तसे आपण आपल्या अंतरी प्रभुच्या ज्योती आणि श्रुतीचा अनुभव करतो, ज्यामुळे आपल्या जीवनात एक परिवर्तन येते. आपण आपल्या अंतरी शांति आणि प्रेमाला अनुभवतो.

ज्याप्रकारे एका शिक्षकाचे कार्य मुलांना शिक्षणाद्वारे त्यांच्या इच्छेनुसार दुनियावी उद्देशाप्रति पोहोचविणे आहे. ठीक अशाचप्रकारे एक सद्गुरु सुद्धा प्रेमाच्या माध्यमातून पिता परमेश्वरापासून वेगळ्या झालेल्या आत्म्यांना त्यांच्या निजधामी सच खंडात पोहोचवितात.

चला तर! आजच्या दिनी न केवळ अध्यापकांचा सन्मान करूया परंतु आपल्या अध्यात्मिक गुरुंप्रती सुद्धा कृतज्ञता प्रकट करूया, कारण की त्यांच्याद्वारे च आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊन पिता परमेश्वरात  लीन होऊ शकतो. अशा पूर्ण सद्गुरूंना कोटी कोटी वंदन !

सावन कृपाल रुहानी मिशन, सावन आश्रम, संत कृपाल सिंह जी महाराज चौक, खेमानी रोड, उल्हासनगर- 2
अमृता : +91 84510 93275


Saturday, 4 September 2021

आदर्श शिक्षक पुरस्काराला "अश्लील," आरोपाचे 'प्रमाणपत्र? त्या शिक्षकांकडून समाजासमोर कोणता, 'आदर्श'?

आदर्श शिक्षक पुरस्काराला "अश्लील," आरोपाचे 'प्रमाणपत्र? त्या शिक्षकांकडून समाजासमोर कोणता, 'आदर्श'?


कल्याण, (संजय कांबळे) : पुर्वी शिक्षक हे समाजाचे, गावाचे एकमेव, आदर्श'असायचे, पण हल्ली स्वतःला आदर्श म्हणून घेण्यासाठी डझनभर शिफारशी, अनेक तडजोडी, हुजरेगिरी करावी लागते, असाच काहीसा प्रकार यंदाच्या, आदर्श शिक्षक पुरस्काराच्या निमित्ताने समोर आला असून विद्यार्थ्यांनीशी' अश्लील'चाळे करणाऱ्या शिक्षकाची आदर्श पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर दुसरीकडे 'मला' पुरस्कार मिळाला नाही तर हा कार्यक्रमच उधळून लावू असा इशारा एका शिक्षिकेने दिल्याने अशा 'मास्तरां'कडून समाजाने काय आदर्श घ्यावा असा प्रश्न उपस्थित केला जात असून यानंतरही या शिक्षकाला 'आदर्श'शिक्षक पुरस्कार देण्यात आल्यास त्याचा निषेध करून अंदोलन करु असा गर्भित इशारा मुरबाड चे भगवान पवार यांनी दिला आहे.


कोरोना महामारी मुळे गेली दोन वर्षे शिक्षकांचा मानाचा असा 'आदर्श शिक्षक, पुरस्कार सोहळा झाला नव्हता. परंतु आता कोरोनाचे प्रमाण कमी झाल्याने व लाॅकडाऊणचे निर्बंध शिथील केल्याने या वर्षी ५ संप्टेंबर या शिक्षक दिनी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने जिल्ह्यातील शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यातील जिप शाळा खापरी यथील तत्कालीन शिक्षक अंनता केदार यांना ही पुरस्कार जाहीर झाला आहे. परंतु या शिक्षकाने येथील एका विद्यार्थीनीशी अश्लील चाळे केले होते, यानंतर ग्रामस्थांनी यांच्या विरोधात अंदोलन केल्याने याची तक्रारी बदली कल्याण तालुक्यातील म्हसकळ जिप शाळा येथे करण्यात आली होती. तसेच या तक्रारीची चौकशी करण्यासाठी शिक्षणाधिकारी भारती व विस्तार अधिकारी अतरगे मँडम गेल्या होत्या. त्यामुळे अशा नैतिकता गमावलेल्या शिक्षकाला आदर्श शिक्षक पुरस्कार देऊ नये अशी लेखी तक्रार रिपब्लिकन पार्टी आँफ इंडिया चे सहसचिव भगवान पवार यांनी जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिका-याकडे केली आहे, तसेच तक्रारी नंतरही प्रशासनाने पुरस्कार दिल्यास याचा निषेध करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारही देण्यात आला आहे.


तर दुसरीकडे कल्याण तालुक्यातील एका शिक्षकेच्या अनेक तक्रारी असल्याने तसचे गुणांकामध्ये त्या बसत नसल्याने त्यांना पुरस्कार नाकारला आहे. त्यामुळे त्यांनी चक्क पुरस्कार सोहळा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे आज होणा-या आदर्श शिक्षक पुरस्कार कार्यक्रमाला "बिचाऱ्या," कल्याण गटशिक्षणाधिका-यांना पोलीस बंदोबस्त घ्यावा लागतो आहे. कसला हा आदर्श?

वास्तविक पाहता अंनता केदार यांच्या विरोधातील तक्रारी नंतर शिक्षणविभागाने त्यांचे सर्विस बुक तपासले यामध्ये कोणत्याही प्रकारची आक्षेपार्ह नोंद नसल्याने त्यांना पुरस्कार जाहीर केला आहे असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु हे प्रकरण वेळीच रफादफा केल्याने तक्रार नोंदवली नाही, तसेच यात काही तथ्य नसते तर शिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी चौकशी साठी कसे काय आले?त्यामुळे नैतिकता म्हणून तरी या शिक्षकाने पुरस्कार स्विकारु नये असे अवाहन भगवान पवार यांनी केले आहे.

दरम्यान कल्याण तालुक्यातील सन २०२१/२२ वर्षासाठी १६ शिक्षकांची आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे तर मुरबाड तालुक्यातील या दोन वर्षासाठी २२ शिक्षकांना पुरस्कार जाहीर झाला आहे. कोरोना मुळे हा कार्यक्रम सलग दोन वर्षे रखडला होता. तब्बल दोन वर्षानंतर हा सोहळा संपन्न होत आहे. परंतु आता ही या सोहळ्यास अश्लील आरोपाचे, वादाचे, इशाऱ्याचे, अंदोलनाचे ग्रहण लागल्याने विद्यार्थ्यांनी, समाजाने यांचेकडून काय व कोणता" आदर्श" घ्यावा हे मोठे कोडेच आहे.

*_प्रेमळ आणि मन मिळावू स्वभावाच्या मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप ( जनो पाटलीन ) यांचे वृद्धापकाळाने निधन_*

*_प्रेमळ आणि मन मिळावू स्वभावाच्या मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप ( जनो पाटलीन ) यांचे वृद्धापकाळाने निधन_*


*भुईबावडा* :

वैभववाडी तालुक्यातील आखवणे गावच्या ज्येष्ठ रहिवाशी स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप ( जनो पाटलीन ) यांचे मंगळवार दिनांक 31 ऑगस्ट 2021 रोजी वयाच्या 124 व्या वषीॅ वृद्धापकाळाने दु:खद निधन झाले.

स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप यांच्या निधनाने जुन्या पीढीतील एका पर्वाचा अंत झाला आहे.

आखवणे, नागपवाडी, भोम गाव एका ज्येष्ठ आणि श्रेष्ठ व्यक्तीमत्वास मुकला आहे.

स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप या प्रेमळ, नम्र, साध्या, सरळ, मनमिळावू ,परोपकारी स्वभावाच्या होत्या.

आयुष्यभर त्यांनी आपल्या स्वभावाने जीवा भावाची माणसं जपली.

आखवणे,नागपवाडी,भोम आणि परीसरात स्व.मातोश्री सिताबाई रामचंद्र नागप या जनो पाटलीन या नावानेच ओळखल्या जात होत्या.

लोक आदराने त्यांना जनो पाटलीन म्हणुनच संबोधीत असतं.

स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप (जनो पाटलीन) यांच्या पश्चात सुन,तसेच नातवंडे गणेश नागप, रामदास नागप, अरुण गुडेकर (नातवंडं) वासुदेव राणे, अजय माळकर, सुरेश पालांडे, (नातं जावंई) असा मोठा परीवार आहे.

 स्व.मातोश्री सीताबाई रामचंद्र नागप (जनो पाटलीन) यांच्या पवित्र स्मृतिस आखवणे, नागपवाडी, भोम अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या वतीने भावपुर्ण श्रध्दांजली.

Friday, 3 September 2021

भिवंडीत धोकादायक इमारती पैकी एक मजली इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर सात जण जखमी !!

भिवंडीत धोकादायक इमारती पैकी  एक मजली इमारत कोसळली,एकाचा मृत्यू तर सात जण जखमी !!


अरुण पाटील (कोपर), भिवंडी, दिं,4 :
             भिवंडीत शहरातील धोकादायक इमारती पैकी आजमी नगर, टिपू सुलतान चौक परिसरात असलेली एक मजली इमारत शुक्रवारी कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत एक जणाचा मृत्यू तर सात जण जखमी झाले आहेत. 
             रजाक ( वय अंदाजे ३५ ते ४० वर्ष ) असे दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झालेल्या इसमाचे नाव आहे. तर हसीम शेख ३५, सुबेदा खातून ३५, अमिना अन्सारी ४५, रोशन बानो ३०, जारा कलाम १२, रोजी फातिमा १४, जिकरा अन्सारी १४ अशी जखमींची नावे आहेत.
             शहरातील आजमी नगर टिपू सुलतान चौक परिसरात शब्बीर अंसारी यांचे राहते घर होते. मार्केट परिसरात असलेल्या या घराच्या आजू बाजूला शब्बीर यांनी घराच्या गॅलेरिवर वाढीव अधिकृत बांधकाम केले होते. या इमारतीच्या खाली किराणा दुकान तसेच इतर दुकाने होती. मार्केट परिसर व दुकाने असल्याने या ठिकाणी नागरिक खरेदीसाठी आले होते. त्यावेळी वाढीव गॅलेरी व घराचा भाग खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर कोसळल्याने या दुर्घटनेत एक जण मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. विशेष म्हणजे या दुर्घटनेत घरातील कोणीही जखमी झाले नसून मार्केट व दुकानात खरेदीसाठी आलेले नागरिक व महिला दुर्घटनेत मयत व जखमी झाले आहेत.        
             जखमींना शहरातील स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. जखमींमध्ये तिघांची परिस्थिती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस व आपत्ती व्यवस्थापन बचाव पथक दाखल होत मदत कार्य सुरू होते. भोईवाडा पोलीस ठाण्यात या दुर्घटनेची नोंद करण्यात आली आहे.

तळा तालुका शेकापच्या वतीने पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे स्वागत !!

तळा तालुका शेकापच्या वतीने पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे स्वागत !!


     बोरघर / माणगांव, ( विश्वास गायकवाड ) : रायगड जिल्ह्यातील तळा तालुका पोलीस ठाण्याचे नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांचे तळा तालुका शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेतकरी कामगार  पक्षाचे तळा तालुका सरचिटणीस धनराज गायकवाड आणि युवा नेते लहुशेठ चव्हाण यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
      अलिकडेच पोलीस खात्यातील पोलीस निरीक्षक यांच्या झालेल्या बदल्यांच्या प्रक्रियेत पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची रायगड जिल्ह्यातील तळा तालुका पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती झाली आहे. जनमानसात किंबहुना कोणत्याही शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस आणि जनता यांच्या मधील समन्वय अत्यंत महत्त्वाचा असतो. 
    जनतेच्या रक्षणासाठी, हितासाठी अहोरात्र झटणाऱ्या पोलीसांप्रती जनतेच्या मनात नितांत आदर , सद्भावना आणि समन्वय अपरिहार्य असते. या पार्श्वभूमीवर तळा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झालेल्या पोलीस निरीक्षक गोविंद ओमासे यांची तळा शेकापचे सरचिटणीस धनराज गायकवाड यांनी त्यांची तळा पोलीस ठाण्यात जाऊन भेट घेऊन त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे शेकापच्या वतीने सहर्ष स्वागत केले.

म्हारळ, वरप,कांबा गावाच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही आमदार सरसावले, मंडळ अध्यक्षाचा पुढाकार !!

म्हारळ, वरप,कांबा गावाच्या विकासासाठी आणि प्रश्न सोडविण्यासाठी दोन्ही आमदार सरसावले, मंडळ अध्यक्षाचा पुढाकार !!


कल्याण, (संजय कांबळे) : गेली कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या कल्याण तालुक्यातील पण उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेली म्हारळ, वरप, कांबा या गावांचा सर्वागीण विकास करण्यासाठी तसेच येथील प्रश्न, अडचणी, समस्या सोडवण्यासाठी कार्यसम्राट आमदार किसन कथोरे आणि कुमार आयलानी यांनी अधिकारी व या गावचे ग्रामस्थ व ग्रामसेवक याची नुकतीच एक बैठक आयोजित केली होती. त्यामुळे आता तरी नागरिकांचे प्रश्न सुटतील अशी आशा बाळगायला काही हरकत नाही.


उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असलेल्या कल्याण तालुक्यातील म्हारळ, वरप, कांबा या गावाची खूपच वाईट स्थिती आहे. कल्याण मुरबाड महामार्गावर तसेच उल्हासनगर, कल्याण, अंबरनाथ, टिटवाळा अशा मोठ्या शहराला लागून ही गावे वसल्याने या परिसराचे झपाट्याने नागरीकरण झाले आहे. नियोजन शुन्य बाधकांमे ,जेथें जागा मिळेल तेथे चाळी उभ्या राहिल्या मुळे आज मुलभूत सोईसुविधा पुरवताना ग्रामपंचायतीला घाम फुटत आहे. एकट्या म्हारळ गावाची लोकसंख्या एक लाखांच्या आसपास गेली आहे,यांच्या पावलावर पाऊल ठेवून शेजारील वरप,कांबा ही गावे वाटचाल करीत आहे. कचरा, गटारे, सांडपाणी, रस्ते, असे प्रश्न वर्षानुवर्षे तसेच आहेत. कांबा गावाला तर शुद्ध पाणी मिळत नाही ही शोकांतिका आहे.


बिल्डर मंडळी ने जागोजागी मातीचे भराव केल्याने, नैसर्गिक गटारे बंद केल्याने, त्यांचे मार्ग बदल्याने आज प्रत्येक वेळी या तिन्ही गावांना पुराच्या पाण्याचा फटका बसत आहे. जी अवस्था रस्ते, गटारे, कचरा याची तशीच व्यथा आरोग्याची,येथे आरोग्य उपकेंद्र नसल्यामुळे येथील नागरिकांना दहागाव प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा गोवेली ग्रामीण रुग्णालय तेथे जावे लागत आहे. यां गावाचे दुर्दैव असे की येथील सरपंच, सदस्य, नागरिक यांच्या त एकमत, समन्वय नसल्याने येथील आमदार व इतर लोकप्रतिनिधी यांनी सोईस्कर दुर्लक्ष केले होते.

पण अलीकडच्या काळात म्हारळ ग्रामपंचायतीचे सदस्य व या तिन्ही गावचे भाजपाचे मंडळ अध्यक्ष योगेश देशमुख यांनी आमदार कुमार आयलानी यांच्या सतत पाठीमागे लागून या गावाकडे लक्ष देण्यास सांगितले. त्या नुसार मागील महिन्यात कुमार आयलानी यांनी या भागाचा दौरा केला व अडचणी जाणून घेतल्या, याचाच एक भाग म्हणून मुरबाड विधान सभा मतदारसंघांचे कार्यसम्राट आमदार किसन कथोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार कुमार आयलानी यांच्या कार्यालयात विविध अधिकारी, पदाधिकारी, ग्रामसेवक यांच्या उपस्थित एका बैठकीचे आयोजन केले होते.

यामध्ये गावातील रोड सिंमेट काँक्रीटीकरण, आरोग्य केंद्र साठी जागा, कचरा डंम्पिंग, गटार व्यवस्था, वीज समस्या, पुरग्रस्तांंना मदत, कल्याण मुरबाड हायवेवर राहिलेली कामे, आदी बाबतीत चर्चा करून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. 

या बैठकीला कल्याण पंचायत समितीचेप्रभारी गटविकास अधिकारी परदेशी, सर्व विभागाचे प्रमुख, तिन्ही गावचे ग्रामसेवक, भाजपचे महेश सुखरामनी, झेडपी सदस्या वैशाली शिंदे, माझी सरपंच प्रमोद देशमुख, पंचायत समितीचे सदस्य पांडुरंग म्हात्रे, रंजना देशमुख, अमृता देशमुख, अस्मिता जाधव, समाजसेवक महेश देशमुख, केतन देशमुख, बाळकृष्ण देशमुख,वरपच्या सरपंच छाया भोईर, राजेश भोईर व भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...