Saturday, 1 October 2022

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यरोपणाची यशस्वी शस्रक्रिया , कोकणातल्या एसटी कर्मचाऱ्याला जीवदान !!

ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात प्रथमच हृदय प्रत्यरोपणाची यशस्वी शस्रक्रिया , कोकणातल्या एसटी कर्मचाऱ्याला जीवदान !!


भिवंडी, दिं २, अरुण पाटील (कोपर) :
         ठाण्यातील हृदय प्रत्यारोपणाची पहिलीच शस्त्रक्रिया ज्युपीटर रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी करून दाखवली असून कोकणातील ३९ वर्षीय एसटी कर्मचाऱ्याला चक्क दुसरे हृदय लावण्याची किमया केल्याने जीवदान मिळाले आहे. अशी माहिती ज्युपीटर रुग्णालयाचे डॉक्टर नितिन बुरकुले यांनी दिली आहे.
          ही अवघड शस्त्रक्रिया डॉ. प्रविण कुलकर्णी, डॉ. सौम्य शेखर यांच्या मार्गदर्शनाखाली ८ वरील हृदयरोग तज्ज्ञांनी पार पडल्याचे रुग्णालयाच्या सीईओ डॉ. शिल्पा ताटके यांनी सांगितले. दरम्यान, कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भिकाजी निर्गुण हे रुग्ण एसटी कर्मचारी असून जीवदान दिल्याबद्दल त्यांनी तसेच त्यांच्या कुटुंबियांनी ज्युपिटर रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले आहेत.
          सविस्तर हकीगत अशी की,सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील नेरुर, माड्याची वाडी येथे भिकाजी हे पत्नी समिक्षा व दोन मुलांसह राहतात. गेली १२ वर्षे ते एसटी महामंडळाच्या वेंगुर्ला आगारात यांत्रिक विभागात नोकरीला आहेत. ३ जुलैला शेतात काम करत असताना त्यांना अचानक हृदविकाराचा तीव्र झटका आला. त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्यांना जवळच्या एका खासगी रुग्णालयात नेण्यात आले. त्या रुग्णालयात प्रचंड खर्च लागेल म्हणून कुटुंबिय हादरले. नंतर ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात ३ ऑगस्टला दाखल करण्यात आले होते.
           नंतर २४ ऑगस्टला मध्यरात्री ४ वाचता त्यांच्यावर हृदय प्रत्यारोपणाची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सरकारच्या विभागीय समितीमार्फत मुंबईच्या नानावटी रुग्णालयातील ५९ वर्षीय रुग्णाचे हृदय उपलब्ध झाले. त्यांनतर मुंबई आणि ठाणे पोलिसांच्या मदतीने ग्रीन कॉरिडॉर तयार करुन अवघ्या ३५ मिनीटांत हृदय ठाण्यात आणण्यात आल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. ही ठाण्यातील पहिलीच हृदय प्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.
         या शस्त्रक्रियेसाठी कोकणातील गावकऱ्यांनी आणि काही ट्रस्टच्या साह्याने जवळपास ४० ते ५० लाख जमा झाले आणि शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याने रुग्ण व त्याच्या कुटुंबियांनी ज्युपिटर रुग्णालयातील सर्व डॉक्टरांचे आभार मानले आहे .
          भिकाजी निर्गुण यांना ज्युपीटर रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती अतिशय गंभीर होती. शस्त्रक्रिया खर्चिक तसेच अवघड होती. पण, रुग्णसेवेला प्राधान्य देत हृदय मिळाल्यानंतर चार तासातच ही शस्त्रक्रिया यशस्वीरिच्या पार पडली. सुदैवाने मुंबईतच हृदय उपलब्ध झाल्याने गोल्डन अवरमध्ये प्रत्यारोपण उत्तमरित्या होऊ शकले. या कठीण अशा शस्त्रक्रियेत ज्युपिटरचे सर्व डॉक्टर, कर्मचारी तसेच अत्याधुनिक यंत्रसामुग्री यांचे योगदान मोलाचे ठरले.

समेळपाडा कॉंग्रेस अध्यक्षा रुचिता अमित नाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश !! "आयुक्तांकडुन कारवाई"

समेळपाडा कॉंग्रेस अध्यक्षा रुचिता अमित नाईक यांच्या मागणी व पाठपुराव्याला यश !!  "आयुक्तांकडुन कारवाई"  

*नालासोपारा (प.) मधिल रेल्वे स्टेशनला जाणारा रस्ता अनधिकृत फेरीवाले व दुकानदार यांच्या अतिक्रमणामुुळे होता अरूंद"


वसई, प्रतिनिधी : नालासोपारा (प) मधिल सत्यम शिवम शॉपिंग सेंटर व सोनल शॉपिंग सेंटर मधिल रेल्वे स्टेशन ला जाणाऱ्या रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी रस्त्यावर दुकान वाढवून रस्ता अरुंद केल्याने नागरीकांना जाण्यायेण्यास ही रस्ता राहिला नाही महापालिका दरवेळेस धातुर मातुर कारवाई करून दिखाऊपणा करण्याचे काम करत असे.


या रस्त्यावरील होणारा त्रास कायमचा सोडवून रस्त्ता मोकळा करावा अशी मागणी नागरीकांनी माझ्याकडे केली असुन याचा नाहक त्रास प्रवास करून येणाऱ्या रेल्वे प्रवाशांना करावा लागत आहे, अनधिकृत फेरीवाल्यांबाबत योग्य नियोजन करत त्यांना स्थलांतरीत करण्यात यावे. 


या रस्त्यावर ज्या अनधिकृत फेरीवाले व दुकानदारांनी अतिक्रमण करून रस्ता अरूंद केला आहे व रेल्वे प्रवासी व नागरीकांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यावर तातडीने दंडात्मक कारवाई करून फौजदारी गुन्हे नोंद करावी.  


तसेच या रस्त्यावर "ना- फेरीवाला क्षेत्र" घोषित करण्यात यावे अशी मागणी *रुचिता नाईक* यांनी महापालिका आयुक्तांकडे १ ऑगस्ट २०२२ तक्रार केली होती, आयुक्तांनी याची दखल घेत कारवाई केली....

लाभार्थी संवाद संमेलनाला केंद्रीयमंत्री भूपेंद्रसिंग यादव यांच्या उपस्थितीत संवाद !

लाभार्थी संवाद संमेलनाला केंद्रीयमंत्री भूपेंद्रसिंग यादव यांच्या उपस्थितीत संवाद !


औरंगाबाद (लासुर स्टेशन), अखलाख देशमुख, दि १ ऑक्टो. : पांडव लॉन्स, ता. गंगापूर येथे भारतीय जनता पार्टी आयोजित लाभार्थी संवाद संमेलनाला केंद्रीयमंत्री भूपेंद्र यादव यांच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत लासूर स्टेशन येथे केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड, सहकार मंत्री अतुल सावे, आमदार प्रशांत बंब यांनी यावेळी उपस्थित राहून लाभार्थ्यांशी संवाद साधला व योजनांच्या अंमलबजावणी बाबत त्यांचा अभिप्राय घेतला.

तसेच प्रदेश सरचिटणीस संजय केणेकर, सयांनमंत्री संजय कोडगे, प्रदेश सचिव इद्रिस मुलतानी, प्रदेश सचिव प्रवीण घुगे जिल्हा, अध्यक्ष विजय औताडे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष एल. जी. गायकवाड, तालुका अध्यक्ष शिवनाथ मालकर, जिल्हा सरचिटणीस किशोरजी धनायात, तालुका अध्यक्ष प्रकाशजी वाकळे, माजी सभापती गणेश नाना आधाने, जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते, जिल्हा सचिव प्रा. संजय गव्हाणे, नगराध्यक्ष प्रदीप पाटील, जिल्हा सरचिटणीस लक्ष्मणराव आवटे पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

आंबिवली येथे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपतर्फे गरजू गरीब २०० महिलांना साडी वाटप !

आंबिवली येथे मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपतर्फे गरजू गरीब २०० महिलांना साडी वाटप !                     

कल्याण, संदीप शेंडगे : मानव सेवा हीच ईश्वर सेवा या ग्रुपचे प्रमुख डॉ. मनिलाल शिंपी यांच्या नेतृत्वाखाली दैनिक स्वराज्य तोरण चे संपादक डॉ. किशोर पाटील, स्वामीनारायण ट्रस्टचे संचालक डॉ. दिनेश भाई ठक्कर, समाजसेवक डॉ. रामचंद्र देसले, सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण तरे, लेडीज एक्सप्रेसच्या मधुबेन ठक्कर, वर्षा बाविस्कर, ज्योती पुजारा, यांच्या सहकार्याने मोहने आंबिवली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक उद्यान येथे आज २०० गरजू महिलांना साडी वाटप करण्यात आले. 


नवरात्रीच्या पहिल्या दिवसापासून वीट भट्टी कामगार, ऊसतोड कामगार, बिगारी कामगार अंध अपंग अशा गरीब गरजू महिलांना साडीचोळी देऊन खऱ्या अर्थाने दुर्गा पूजन करण्याच्या मानस मानव सेवा ग्रुप मार्फत अमलात आणला जात आहे. आतापर्यंत ३५०० (साडेतीन हजार) गरजू आणि मेहनती महीला नवदुर्गांना साडीचोळी देऊन महिलांचा सन्मान करण्यात आला. 


तसेच डॉक्टर मनीलाल शिंपी आणि त्यांच्या सहकारी टीम कडून आदिवासी पाड्यात शनिवारी महिलांना साडी वाटप करून दुर्गा पूजन आयोजित केले आहे व सोमवारी अष्टमी नवदुर्गा मातेचा महोत्सव निमित्त अंधअपंग अशा महिलांना साडी दुर्गा पूजन करायचे आहे. 


समाजातील दानशूर व्यक्तींनी सढळ हाताने केलेल्या मदतीमुळे आम्हाला सेवा करण्याची संधी मिळत आहे. त्याबद्दल या सर्वांचे मनिलाल शिंपी यांनी आभार व्यक्त केले. आजचा संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अक्षरा विकास सामजिक संघटनेचे अधक्षा कल्पना पायाळ, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे वार्ड क्रमांक १२ चे अध्यक्ष आनंद सोनवणे, कल्याण नागरिकचे कार्यकारी संपादक संदीप शेंडगे यांनी केले होते. नुसरत सिद्धी, शिला लव्हे रेखा झेंडे, यासह मोहोने परिसरातील अनेक महिलांनी या कार्यक्रमात हजेरी लावली.

फाईव्ह जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती- मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे

फाईव्ह जी तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती- मुख्यमंत्री - एकनाथ संभाजी शिंदे 


मुंबई, दि.१ : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे पसंत केले आणि विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना मुख्यमंत्र्यांनी फाईव्ह जी चे महत्व सांगितले. क्रांतीकारक क्षणाचे आपण साक्षीदार असल्याचे सांगत शिक्षण, कृषी, आरोग्य, बॅंकींग यासह सर्वच क्षेत्रात फाईव्ह जी तंत्रज्ञानाने क्रांती होणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशव्यापी फाईव्ह जी तंत्रज्ञानाचा शुभारंभ झाला. यामध्ये व्हर्च्युअल क्लासरुमसाठी महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील पनवेल महापालिकेच्या सावित्रीबाई फुले शाळा क्रमांक आठ मधील विद्यार्थ्यांची निवड झाली होती. याकार्यक्रमास राज्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे उपस्थित होते.

प्रधानमंत्र्यांच्या संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी खुर्चीऐवजी बेंचची बसण्यासाठी निवड केली. मीही तुमच्या सोबत आज विद्यार्थी झाल्याचे मुख्यंत्र्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. राष्ट्रीय शुभारंभ कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी राज्यातील काही शाळांमधील विद्यार्थ्यांशी ऑनलाईन संवाद साधला.

मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, या तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड वाढणार आहे. त्याचा फायदा सर्वाधिक शिक्षण क्षेत्राला होणार असून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. इंटरनेटला मिळणाऱ्या स्पीडचा फायदा अभ्यासासाठी करा गेम आणि सिनेमे डाऊनलोड करण्यासाठी नाही, असा सल्लाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी महाराष्ट्रातून पनवेलच्या शाळेची निवड झाली त्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करतानाच प्रधानमंत्र्यांचे देखील आभार मानले. या नविन तंत्रज्ञानामुळे विद्यार्थ्यांना डिजीटल दृष्यांच्या माध्यमातून विषय समजण्यास अधिक सोपे होईल आणि शाळेचे वर्ग सामान्य वर्गवारीत न राहता ते स्मार्ट क्लास होतील, असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी गृहरक्षक दल-नागरी संरक्षणाचे अपर पोलिस महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी फाईव्ह जी तंत्रज्ञानाबाबत विद्यार्थ्यांना सहज सोप्या शब्दात समजेल अशी माहिती दिली. यावेळी सादरीकरण करताना श्री. सिंग यांनी टेलीकॉम तंत्रज्ञानाचा वन जी ते फाईव्ह जी असा प्रवास चित्रांच्या माध्यमातून समजावून सांगितला. मोबाईलचा वापर स्वताच्या सुरक्षेसाठी करा या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर हा देशाच्या आणि स्वताच्या चांगल्यासाठी करा, असे आवाहनही श्री. सिंग यांनी यावेळी केले.

यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर, पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख आदी उपस्थित होते.

सारथी संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामसभेत चावडी वाचन करून होणार -राजेंद्र दाते पाटील

सारथी संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामसभेत चावडी वाचन करून होणार -राजेंद्र दाते पाटील


औरंगाबाद, अखलाख देशमुख, दि ०१ : राज्य शासनाने त्यांचे आदेश क्रमांक : व्हीपीएम-२०२२/प्र.क्र.३०१पं.रा- ३, दि ३०/९/२०२२ नुसार राज्यातील सर्व मुख्यकार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद यांना आदेशीत केले आहे की,सारथी संस्थेअंतर्गत राबविण्यात येणा-या योजनांच्या माहितीचे दि.२.१०.२०२२ च्या ग्रामसभेमध्ये चावडी वाचन करण्या बाबत उपसचिव श्री.दे.लोंढे महाराष्ट्र शासन यांचे स्वाक्षरीने निर्देश दिले असुन त्यात नमुद केले आहे की, राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी- मराठा व मराठा कुणबी या लक्षीत गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी कंपनी कायदा २०१३ चे कलम ८ खाली "सारथी" संस्थेची नोंदणी १५ जुन २०१८ रोजी करण्यात आलेली आहे.

सदर संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची व उपक्रमांची माहिती जनमाणसा पर्यंत पोहोचवण्या करीता सदर योजनांचे ग्रामसभे मध्ये चावडी वाचन केल्यास या योजनांची माहिती लक्षीत गटातील व्यक्ति पर्यन्त पोहोचू शकेल व पात्र लाभार्थींना या योजनेचा लाभ घेता येईल. सारथी संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामसभेत वाचल्यास ग्रामीण भागातील खेड्या पाड्या मधील लक्षीत गटातील व्यक्ती पर्यंत पोहोचण्यास, निश्चितच मदत होईल.
या पत्रासमवेतच्या परिशिष्ट 'अ' मधील सारथी संस्थे मार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांच्या माहितीचे दि.०२ आक्टोबर २०२२ रोजीच्या ग्रामसभेमध्ये वाचन करण्याबाबत अधिनस्त सर्व ग्रामसेवक / ग्रामविकास अधिकारी यांना आदेशीत करण्या बाबत सुचना देण्यात आल्या आहेत.३० सप्टेंबर, २०२२ रोजीच्या या पत्राची प्रत सर्व विभागीय आयुक्त यांना तत्काळ कार्यवाही साठी अग्रेशित सुद्धा केलेली आहे.

ग्रामीण भागातील संशोधक छात्र, स्पर्धा परीक्षा- आठवी ते बारावी पर्यंतचे विद्यार्थी यासह अनेकांना या दवंडी प्रक्रियेचा लाभ होणार असल्याचे मत जेष्ठ अभ्यासक राजेंद्र दाते पाटील यांनी आमच्या प्रतिनिधी सोबत विशेष बातचीत करतांना व्यक्त केले असुन सारथीची संचालक मंडळ यासह कार्यकरी संचालक अशोक काकडे व सर्व कर्मचारी यांचे खुप खुप आभार व्यक्त करण्यात आले आहे.

मान्यवरांसह 'महापौर सौ.जयश्री महाजन' यांच्या उपस्थितीत जळगावात "लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो"चा थाटात शुभारंभ !

मान्यवरांसह 'महापौर सौ.जयश्री महाजन' यांच्या उपस्थितीत जळगावात "लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो"चा थाटात शुभारंभ !


जळगाव, अखलाख देशमुख, दि.३० : गोदावरी फाऊंडेशन प्रायोजित तथा लेवा चेंबर ऑफ कॉमर्स आणि ग्लोबल लेवा पाटीदार फाऊंडेशनच्या वतीने शहरातील सागर पार्क येथे 'लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो' या प्रदर्शनाचे मान्यवरांसह शहराच्या प्रथम नागरिक तथा महापौर व दि जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडच्या संचालिका तथा जळगाव जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीच्या तज्ञ संचालिका सौ. जयश्री सुनिल महाजन यांच्या उपस्थितीत माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दि जळगाव पीपल्स को-ऑप बँकेचे चेअरमन अनिकेत भालचंद्र पाटील हे होते.

याप्रसंगी ज्येष्ठ नेते तथा विधान परिषद सदस्य आ.एकनाथराव खडसे, शहराचे आमदार सुरेश ऊर्फ राजूमामा भोळे, खान्देश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नंदकुमार बेंडाळे, सुदर्शन पेपर अँण्ड प्रॉडक्टचे संचालक राजीव चौधरी, कृष्णा पेक्टिन्सचे के.सी. पाटील, चौधरी टोयोटाचे संचालक महेश चौधरी, गोदावरी फॉउंडेशच्या डॉ.सौ.केतकी वैभव पाटील, सोनी एजन्सीजचे संचालक जीवन येवले, स्टार फेब्रिकेटर्सचे संचालक रवींद्र अत्तरदे, खोशल प्लास्टो पॅक प्रा.लि.चे संचालक चंदन अरुण नारखेडे,चंदन कोल्हे,रवींद्र पाटील यांच्यासह आदी मान्यवर, व्यवसायिक व उद्योजक तसेच समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या ऐतिहासिक अशा लेवा पाटीदार बिझनेस एक्सपो प्रदर्शनात १५० हुन अधिक स्टॉल प्रदर्शनस्थळी लावण्यात आले आहेत. उदघाटन सोहळ्याला एक्सपोचे आयोजक मंडळ व लेवा पाटीदार समाजातील प्रतिष्ठित व्यावसायिक आणि जळगावकर बंधू-भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...