Wednesday, 6 March 2024

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दिव्यांग वस्तू विक्री प्रदर्शनातील भ्रष्टाचाराची माहिती देण्यास टाळाटाळ ?

ठाणे जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागातील दिव्यांग वस्तू विक्री प्रदर्शनातील भ्रष्टाचाराची माहिती देण्यास टाळाटाळ ?



कल्याण (संजय कांबळे) : दिव्यांग व्यक्ती अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे आयोजन ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या प्रांगणात २२ डिसेंबर ते २६ डिसेंबर या कालावधी करण्यात आले होते. परंतु याचे आयोजन दिवाळी न करता ऐन सुट्टीच्या वेळेत केल्याने या प्रदर्शनाकडे अक्षरशः नागरिकांनी पाठ फिरवली असून शेवटच्या दिवसापर्यंत या स्टाँलवर केवळ १०० ते दिडशे रुपयांची वस्तू विक्री झाल्याने या कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाखांची तरतूद नक्की दिव्यांगासाठी? की ठेकेदारासाठी या बाबत प्रश्न निर्माण झाला आहे, यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याने याबाबत टिटवाळा येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश गायकवाड यांनी माहिती मागवली होती, मात्र आज दिड ते दोन महिन्यानंतर देखील ती न देण्यात आल्याने सीईओ तसेच राज्य माहिती आयुक्त यांच्या कडे दाद मागण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ रुपाली सातपुते यांच्या हस्ते जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित दिव्यांंग व्यक्त अथवा अपंगांच्या संस्थेने तयार केलेल्या वस्तूंची विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन  करण्यात आले, २२ ते २६ डिसेंबर असे ५ दिवस हे प्रदर्शन भरविण्यात आले. यामध्ये दिव्यांगाच्या जवळपास १८ संस्था व शाळा यांनी आपले स्टाँल मांडले होते. या प्रदर्शना मागील उद्देश होता की, दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, यावेळी यातील सहभागी व्यक्तींना चहा, नास्ता व भोजन व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व कार्यक्रमासाठी तब्बल ३५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती.


यामध्ये दिव्यांगानी अथवा अपंग संस्थांनी बनविलेल्या वस्तू विक्री व प्रदर्शन  जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आयोजित केले होते, याचा ठेका निखिल शहा, या एका जिल्ह्यातील वजनदार मंत्र्यांच्या जवळच्या व्यक्तीने घेतला होता., वास्तविक पाहता हे प्रदर्शन दिवाळीच्या काळात घ्यायला हवे होते, मात्र ते नेमकं नाताळच्या  सलग सुट्टीच्या वेळी घेण्यात आले, याचा परिणाम असा झाला की, या प्रदर्शनाकडे दिव्यांग बांधव व नागरिकांनी अक्षरशः पाठ फिरवली होती. ५/७ गुंटे मैदानावर उभारण्यात आलेल्या मंडपात पुर्णपणे शुकशुकाट दिसून येत होता.. या प्रदर्शनास प्रत्यक्ष भेट दिली असता धक्कादायक चित्र समोर आले, काही स्टाँल धारक झोपले होते, प्रदर्शनास नागरिक नसल्यामुळे गेल्या ४ दिवसांत केवळ १००/१५० रुपयांची विक्री झाल्याचे स्टाँल धारकांनी सांगितले, तर हे प्रदर्शन चुकीचे दिवसांत घेतले, आंम्हाला अचानक सांगितले, त्यामुळे जे मिळेल त्या वस्तू घेऊन इथे आलो, आमची पंचायत झाली. पण आम्ही बोलू शकत नाही, असेही काहिनी सांगितले, याहीपेक्षा आश्चर्य व गमतीशीर बाब म्हणजे, वरीष्ठ अधिकां-यांना वस्तूंंची खरेदी झाली आहे हे दाखविण्यासाठी आम्ही एकमेकांच्या स्टाँल वरील वस्तू खरेदी केल्या असे एका महिला स्टाँल धारकांनी सांगितले. यावरून हे प्रदर्शन नक्की कोणासाठी?हा प्रश्न उपस्थित होतो


याहून दुर्दैवाची बाब म्हणजे या प्रदर्शनाच्या उद्घाटनानंतर सीईओ सह कोणीही वरीष्ठ अधिकारी येथे उपस्थित नव्हते, केवळ जिल्हा समाज कल्याण प्रभारी अधिकारी संजय बागुल हे काही तासापुरते हजेरी लावून जात होते, ४ दिवसात जेमतेम १०० ते २०० लोकांनी जेवण केले असेल, परंतु ठेकेदार मात्र रोज २००लोक जेवतात असा दावा करतो हे मोठे धाडसाचे वाटते.


एकूणच येथील सहभागी संस्था, शाळा, उभारण्यात आलेला मंडप आणि असलेला शुकशुकाट पाहता जेमतेम या ५ दिवसात ५ ते १० लाख रुपये खर्च देखील शक्य वाटत नसताना तब्बल ३५ लाख रुपये कोणासाठी? हे वेगळं सांगण्याची गरज नाही, तर ठेकेदार निखिल शहा हा खालपासून वरपर्यंत सर्वांना 'आर्थिक,प्रोत्साहन देतो, अशी खाजगीत चर्चा ऐकायला मिळत होती. त्यामुळे ठाणे जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाचा यामधील कागदोपत्री उद्देश दिव्यांगाना प्रोत्साहन व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा हा असला तरी प्रत्यक्षात मात्र ठेकेदाराला भरमसाठ'आर्थिक, प्रोत्साहन मिळेल ऐवढे मात्र शंभर टक्के खरे आहे.यामुळे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने टिटवाळा येथील शेतकरी सेवा सोसायटीचे संचालक तथा सामाजिक कार्यकर्ते सुरज गायकवाड यांनी ३ जानेवारी २०२४ रोजी जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे माहिती अधिकार कायद्यानुसार माहिती मागितली. मात्र आज दिड ते दोन महिने झाले तरी अद्याप माहिती दिली गेली नाही, किंवा याबाबत काहीही कळविले नाही. म्हणून अखेरीस श्री गायकवाड यांनी जिल्हा परिषदेचे समाजकल्याण अधिकारी संजय बागुल यांची भेट घेतली असता बघतो, सांगतो,करतो अशी उडवाउडवीची उत्तरे दिली तर याच कार्यालयातील विस्तार अधिकारी लक्ष्मण सुरोशे यांनी दोन दिवस थांबा असे सांगितले.

एकूणच या अधिकारी व कर्मचारी यांची भाषा व देहबोली वरुन या दिव्यांग प्रदर्शन व विक्री मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे भासत होते, त्यामुळे आपण या विरोधात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी तसेच राज्य माहिती आयुक्त यांच्या कडे दाद मागणार असल्याचे सुरश गायकवाड यांनी सांगितले.

Tuesday, 5 March 2024

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !!

विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम या शाळेस वसई तालुक्यातून प्रथम क्रमांक !!
मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा या स्पर्धात्मक अभियानात खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांतून वसई तालुकास्तरावर विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यमाच्या शाळेस प्रथम क्रमांक प्राप्त.

माहे फेब्रुवारी महिन्यापासून सुरु करण्यात आलेल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श शाळा योजनेंतर्गत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' या स्पर्धात्मक अभियानात राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांचा समावेश होता, या स्पर्धेत केंद्र, तालुका, जिल्हा, विभाग आणि राज्य अशा टप्प्यावर शाळांची निवड करण्यात आली.

पालघर जिल्हयातील वसई तालुक्यातून खाजगी व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या एकूण ६६६ सहभागी निवडक शाळांमधून विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, उत्कर्ष विद्यालय प्राथमिक विभाग मराठी माध्यम (यूडायस क्रमांक -27361711005) या शाळेची वसई तालुका स्तरावर प्रथम क्रमांकावर निवड करण्यात येऊन वसई तालुक्यात आदर्श शाळा म्हणून अव्वल स्थान प्राप्त झाले. 

संस्थेच्या सचिव श्रीमती. अपर्णा ठाकूर मॅडम, संस्थेच्या व्यवस्थापन समिती सदस्य  संजीव पाटील सर, संजय पिंगुळकर सर, समन्वयक श्री. नारायण कुट्टी सर, मार्गदर्शिका श्रीमती कल्पना राऊत मॅडम, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका श्रीमती. भक्ती वर्तक मॅडम तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी तथा पालक यांचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे.

कोकण समाज भूषण पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानित !!

कोकण समाज भूषण पुरस्काराने कृष्णा कदम सन्मानित !!

*उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण*

मुंबई, (शांताराम गुडेकर) :

          ग्रामीण तसेच दुर्गम भागातील सामान्य रुग्णांना शहरातील रुग्णालयात उपचार मिळावे, तातडीची मदत व्हावी याकरिता वैद्यकीय मदत कक्षा तर्फे सामाजिक कार्य करणाऱ्या मुंबईतील ज्येष्ठ समाजसेवक कृष्णा मारुती कदम यांना कोकण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पुणे, गणेश नगर, मुक्ताई गार्डन येथे कोकण रहिवाशी समाज संघाच्या वतीने कोकणवासीयांच्या महामेळाव्यात राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या प्रमुख उपस्थितीत कृष्णा कदम यांना पुरस्कार सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला आमदार भरत गोगावले, नगरसेवक काकासाहेब पवार, कोकण रहिवाशी समाज संघाचे अध्यक्ष प्रकाश यादव, कार्याध्यक्ष सुनील मोरे, सचिव लक्ष्मण कदम हे देखील उपस्थित होते.
         कोरोना महमारीत रुग्णाचे झालेले हाल लक्ष्यात घेऊन कदम यांनी तीन वर्षापूर्वी ग्रामीण भागातून शहरात उपचार करिता येणाऱ्या रुग्णांना रुग्णालयात मदत व्हावी यासाठी वैद्यकीय मदत कक्षाची स्थापना केली. वैद्यकीय मदत कक्षाच्या व्हॉट्स अप्स ग्रुप बनवत यात ८०० हून अधिक सदस्य यात डॉक्टर, कर्मचारी, सामाजिक कार्यकर्ते, वार्ड बॉय, रक्तदाते, मेडिकल संबधित विविध क्षेत्रातील लोकांना एकत्र आणत वैद्यकीय कार्यासाठी जोडले. तीन वर्षात हजारहून अधिक रुग्णांना या कक्षाची मदत मिळाली असून ७० हून अधिक दिव्यांगना चेअर स्ट्रेचर तर ६० पेक्षा जास्त महिला आणि पुरुषाचे मोफत मोतीबिंदू चे ऑपरेशन करण्यात आले आहे. कृष्णा कदम यांचे व त्यांच्या वैद्यकीय मदत कक्षाचे कार्याची दखल घेत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या उपस्थितीत कृष्णा कदम यांना कोकण समाज भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी मदत कार्यासाठी शेकडो हात एकत्र आल्याने रुग्णांना मदत देणे शक्य होत आहे. मुंबई गोवा महामार्गावर अपघात ग्रस्त रुग्णांना तसेच ग्रामीण भागातील रुग्णांना उपचार करिता रुग्णालय व्हावे यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. मिळणार पुरस्कार ही आमच्यासाठी शाब्बासकी आहे आणि हा पुरस्कार माझ्या वैद्यकीय मदत कक्षात कार्य करणाऱ्या सर्व डॉक्टर , कर्मचारी , कार्यकर्ते यांना समर्पित करत आहे असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णा कदम यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले.

लाल बावटा शेतमजुर युनियन तर्फे भाजपा हटावं शेतमजूर बचाव मोहीम !!

लाल बावटा शेतमजुर युनियन तर्फे भाजपा हटावं शेतमजूर बचाव मोहीम !!

चोपडा, प्रतिनिधी.. लाल बावटा शेतमजूर युनियन तर्फे चोपडा येथे आयटक कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत नुकत्याच पार पडलेल्या नागपूर येथील अखिल भारतीय खेत मजदूर युनियन बैठकीचा रिपोर्टवर का अमृत महाजन यांनी माहिती दिली. 

अध्यक्षस्थानी जळगावचे कॉम्रेड भास्कर सपकाळे होते. या बैठकीत येत्या 26 मार्चपर्यंत जिल्ह्यात तीन ठिकाणी शेतमजुरांच्या प्रश्नावर आंदोलन करण्याचे ठरले. दिनांक 18 मार्च चोपडा, 19 मार्च अमळनेर, 20 मार्च जळगाव येथील तालुका तहसीलदार कार्यालयांवर धरणे व मोर्चा आणि 26 मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करण्याचे ठरले. बैठकीला जाते जिल्हा सचिव वासुदेव कोळी, सरफराज शहा बाबू शहा, अशोक गायकवाड व श्रीमती  पाटील उपस्थित होत्या. 

या बैठकीत शिरपूर येथील कष्टकरी जनतेचे वकील कॉम्रेड एडवोकेट दिवंगत मदन परदेशी यांना सर्व कार्यकर्त्यांनी दोन मिनिट मौन पाडून श्रद्धांजली वाहिली.

विवा महाविद्यालयात लसीकरण !!

विवा महाविद्यालयात लसीकरण !!

कर्करोग म्हटलं की मनात भीती निर्माण होते. जगभरातील स्त्रियांमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजे सर्व्हायकल कॅन्सर हा खूप चिंतेचा विषय आहे. स्त्रियांमध्ये सामान्यत: हा कर्करोग चौथ्या क्रमांकावर आहे. संपूर्ण जगात जानेवारी महिना सर्व्हायकल कर्करोगाबाबत जागृती महिना म्हणून पाळला जातो.

साधारण हा कर्करोग ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) यामुळे होतो. आज या कर्करोगापासून वाचण्यासाठी लस निर्माण झाली आहे. मात्र या लसीबद्दल हवी तशी जनजागृती झाली नाही. ह्याच पार्श्वभूमीवर कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशन, विष्णू वामन ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट विरार, पालघर अकॅडमी ऑफ पीडीअट्रिक्स, विरार मेडिकल असोसिएशन, यंग स्टार्स ट्रस्ट, विरार आणि भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक ४ मार्च २०२४ रोजी ह्यूमन पॅपिलोमा व्हायरस (HPV) वॅक्सिनेशन कॅम्प विरार पश्चिमेच्या  विवा महाविद्यालयाच्या नवीन इमारतीमध्ये घेण्यात आला.

गर्भाशयाच्या कर्करोगाच्या लसीकरण शिबिराच्या आयोजनासाठी विरार मेडिकल असोसिएशन तसेच यंग स्टार्स ट्रस्ट विरार ह्यांनी उत्तम नियोजन केले होते. भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेच्या माध्यमातून लस उपलब्ध करण्यात आली आणि कॅन्सर पेशंट्स एड असोसिएशनच्या सहकार्याने विवा महाविद्यालय, उत्कर्ष कनिष्ठ महाविद्यालय, उत्कर्ष मराठी आणि इंग्रजी माध्यम शाळेतील जवळपास १३०० मुलींना हे  लसीकरण देण्यात आले. 

सदर लसीकरण शिबीराचे यशस्वी आयोजन करण्यासाठी डॉ. प्रवीण क्षीरसागर, डॉ. शैलेश बारुड तसेच विरार मेडिकल असोसिएशनची संपूर्ण टीम आणि यंग स्टार्स ट्रस्ट समन्वयक अजीव पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक हार्दिक राऊत आणि इतर सर्व पदाधिकारी ह्यांनी आयोजन आणि नियोजनामध्ये सहभाग घेतला.

Monday, 4 March 2024

कल्याण मुरबाडवासियांची अखेरीस धुळीतून मुक्तता नाहिच, रस्त्यावरील धुळवडीनंतर गावागावात राजकीय 'शिमगा ?

कल्याण मुरबाडवासियांची अखेरीस धुळीतून मुक्तता नाहिच, रस्त्यावरील धुळवडीनंतर गावागावात राजकीय' शिमगा ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण मुरबाड महामार्गावरील म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान दिडदोन वर्षे चिखल, खड्डे, धुळ, इत्यादींच्या त्रासामुळे नरक यातना भोगल्यानंतर एकदाचा हा रस्ता सिंमेट काँक्रीटीकरण झाला, यानंतर तरी म्हारळ, वरप, कांबा या परिसरासह या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्या नागरिकांची सुटका होईल असे वाटत असतानाच आता पुन्हा पाचवामैल ते पुढे मुरबाडच्या दिशेने रस्त्याचे काम सुरू झाले असून यावर वेळेत पुरेसे पाणी मारत नसल्यामुळे धुळीचे लोट उठत आहेत, यामुळे कल्याण मुरबाड वासियांची धुळितून मुक्तता नाहिच, तर रस्त्यावरिल धुळवडीनंतर आता गावागावात निवडणुकीचा राजकीय 'शिमगा, सुरु झाला आहे.

कल्याण मुरबाडच्या महामार्गावर म्हारळपाडा ते पाचवामैल दरम्यान सिंमेट काँक्रीटीकरण चे काम ठेकेदाराने सुरू केले, मात्र अनंत अडचणीमुळे हे काम तब्बल एक ते दोन वर्षे सुरू राहिले, या काळात, धुळ, चिखल, खड्डे, पाणी तुंबने आदी मुळे शेकडो लोकांना त्रास झाला, खड्ड्यांच्या अपघातामुळे काहिंचा जीव गेला तर अनेकांना अपंगत्व आले. तसेच धुळीमुळे बहुतांश नागरिकांना श्वसनाचे, डोळ्यांचे आजार जडले, ऐवढ्यानंतरही अद्याप हा रस्ता पुर्ण झाला नाही.

असे असतानाच याच रस्त्यावर पाचवामैल ते बापसई पर्यंत रस्त्याच्या दुतर्फा खोदकाम सुरू केले आहे. तर रायते येथे मुख्य रस्ता खोदून वळण रस्ता तयार केला आहे. परंतु हे करत असताना कुठे ही पाणी मारले जात नाही, गाड्यांच्या वर्दळीमुळे धुळीचे लोट हवेत उडत आहेत, तसेच रस्ता खोदकामामुळे वाहतूक कोंडी होत आहे, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असल्याने धुळ व वाहतूक कोंडी याचा त्रास, मुलांना, पालकांना, नागरिकांना होत आहे. मात्र याचे कोणालाही सोयरसुतक दिसत नाही. त्यामुळे काही दिवस, महिने, वर्षे सुध्दा कल्याण मुरबाड या मार्गावर प्रवास करणाऱ्यांना धुळवडिचा सामना करावा लागणार आहे. यामुळे मुरबाड रेल्वे बहुत दूर हे, लेकिन 'धुळ, नजदिक है, असे मिश्कील पणे बोलले जात आहे.

दरम्यान रस्त्यावरील या धुळवडीनंतर आता लोकसभेच्या निवडणुकीचा गावागावात राजकीय शिमगा सुरू झाला आहे, नेत्यांच्या बँनरबाजीने कोपरे, चौक, व्यापले जात आहेत, आपला नेता, आपला पक्ष कसा चांगला ५ वर्षे त्यांनी लोकासाठी काय काय केले ते पटवून देण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. घरोघरी विविध टिव्ही चँनेल वर मोदींची 'गँरटी, लोकावर थोपविली जात आहे. तर निर्भय बनो या झंझावातामुळे सत्ताधारी यांचे पितळ उघडे पाडले जात आहे. या कार्यक्रमाची चर्चा गावागावात होत आहे. गावातील सार्वजनिक ठिकाण, कट्टा, पार, चौक येथे भाजपाची फोडाफोडी, उध्दव ठाकरे यांची जहरी टिका, अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्या बद्दल संताप, वंचित च्या भूमिकेबद्ल संशय, काँग्रेसचे नेतृत्व यावर खमंग चर्चा, शाब्दिक बाचाबाची, ऐकायला मिळत आहे, एकूणच शिमगोत्सव काही दिवसानंतर असला तरी राजकीय शिमगा मात्र जोरदार सुरू आहे.

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अखेर मंजूर, सरपंच पदाचा पदभार उप सरपंचाकडे की प्रशासक ?

कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंचाविरोधातील अविश्वास ठराव अखेर मंजूर, सरपंच पदाचा पदभार उप सरपंचाकडे की प्रशासक ?

कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील बहुचर्चित कांबा ग्रामपंचायतीच्या सरपंच भारती महेंंद्र भगत यांच्या विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव अखेरीस आज ११ विरुद्ध २ अशा मतानी मंजूर झाला असून यानंतर रिक्त सरपंच पदाचा पदभार उपसरपंच छाया कुडंलिक बनकरी यांच्या कडे दिला जातो की ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमला जातो, हे काही दिवसानंतर स्पष्ट होणार आहे.

तालुक्यातील कांबा ग्रामपंचायत ही औद्योगिक ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते, या ग्रामपंचायतवर सत्ता स्थापन करण्यासाठी सदस्य जिवाचा आटा पिटा करतात, मागील एक दिड वर्षांपूर्वी ग्रामपंचायतीवर भारती महेंद्र भगत यांची सरपंचपदी वर्णी लागली होती, मात्र त्या सदस्यांना विश्वासात घेत नाहीत, मनमानी कारभार करतात, त्यांचे पती ग्रामपंचायत कारभारात हस्तक्षेप करतात असे एक ना अनेक आरोप करत यांच्या विरोधात कल्याण तहसीलदार सचिन शेजाळा यांच्या कडे काही सदस्यांनी पत्र दिले होते. त्यानुसार तहसीलदार शेजाळ यांनी आज कांबा ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच अविश्वास ठरावाची सभा बोलावली होती, याकरिता सर्वच्या सर्व सदस्य उपस्थित होते.

यावेळी या सरपंच अविश्वास सभेचे सूचक होते अरुण वंसत शिरोसे तर अनुमोदन सदस्य संदीप कुडंलिक पावशे यांनी दिले, याप्रसंगी सरपंच भारती भगत यांच्या विरोधात छाया कुडलिंक बनकरी, पद्माकर शिरोसे, दत्ता भोईर, उषा गांवडे, अरुण शिरोसे, इजा भोईर, संदिप पावशे, संतोष पावशे, हरिदास सवार, सुंगधा पावशे, वंदना पावशे आदी ११ सदस्यांनी हात उंचावून मतदान केले तर त्यांच्या बाजूने केवळ दोन म्हणजे स्वतः सरपंच भारती भगत व सोनाली विजय उबाळे यांनी केले, म्हणजे सरपंचा विरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव ११ विरुद्ध २ मतानी मंजूर झाला आहे.
यावेळी कार्यालया बाहेर फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.

यावेळी शिवसेनेचे राजेंद्र चौधरी, उद्योजक छगनशेठ बनकरी, योगेश बनकरी, आदी मंडळी उपस्थित होते तर गावातील कायदा सुव्यवस्था बिघडू नये म्हणून कल्याण तालुका पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र ठाकूर, म्हारळ पोलीस चौकीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

दरम्यान कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून पल्लवी सस्ते यांची नियुक्ती झाली आहे, मात्र त्यांना अद्यापही डहाणू बीडिओ म्हणून कार्यमुक्त करण्यात आले नाही, शिवाय राजपत्रित अधिकारी यांच्या संघटनेने या बदल्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यामुळे सध्या कल्याण पंचायत समितीवर गटविकास अधिकारी नाही, हा चार्ज अंबरनाथ गटविकास अधिकारी परदेशी यांच्या कडे देण्यात आला आहे. त्यांनी यामध्ये लक्ष घातले तर हा अविश्वास ठराव पडताळणी साठी पुन्हा ग्रामपंचायतीकडे पाठवला जाईल, व त्याची पडताळणी झाल्यानंतर सरपंच पदाचा पदभार उपसरपंच यांच्या कडे दिला जाईल असे एका वरीष्ठ अधिका-याने सांगितले, त्यामुळे कांबा ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे किती दिवस रिक्त राहते? की पदभार उपसरपंच की प्रशासक हे काही दिवसातच स्पष्ट होईल. हे काही असले तरी सरपंच भारती भगत यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झाल्याने सदस्यांनी मात्र आनंद व्यक्त केला आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...