Wednesday, 25 August 2021

तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदयातील नागरिकांसाठी प्रस्तावित विशेष कोव्हिड-१९ लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न !!

तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदयातील नागरिकांसाठी प्रस्तावित विशेष कोव्हिड-१९ लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा संपन्न !!


मुंबई, (केतन भोज) ; बृहन्मुंबई महानगरपालिका "एन" प्रभाग यांच्या सहकार्याने सेंट जोसेफ शाळा विक्रोळी, (पश्चिम) येथे तृतीय पंथीयांसह समलैंगिक समुदयातील नागरिकांसाठी विशेष कोव्हिड-१९ प्रतिबंधक मोफत लसीकरण केंद्राचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्यमंत्री सन्मा. श्री.राजेशजी टोपे यांच्या हस्ते करण्यात आला. 


सदर लसीकरण केंद्र हे तृतीयपंथी व समलैंगिक समुदायाला समर्पित केलेले भारतातील पहिले मोफत लसीकरण केंद्र आहे.लसीकरण करण्यासाठी आलेल्या नागरिकांची विचारपूस करुन त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी मार्गदर्शन यावेळी करण्यात आले. 


सदर प्रसंगी " एन " विभाग प्रभाग समिती अध्यक्षा व नगरसेविका सौ.स्नेहल सुनिल मोरे यांच्यासह स्थानिक नगरसेविका सौ.ज्योती हारुन खान,नगरसेविका सौ.राखी जाधव, उपायुक्त श्री.देवीदास क्षीरसागर (परिमंडळ ६), कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ.मंगला गोमारे, 'एन' विभागाचे सहाय्यक आयुक्त श्री.संजय सोनावणे,सहाय्यक आरोग्य अधिकारी डॉ. शीला जगताप, एन विभाग वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.महेंद्र खांदाडे, एलजीबीटी बिगर शासकीय संस्थेच्या प्रिया पाटील, सलमा खान यांच्यासह इतर मान्यवर व शिवसेना पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

मार्चमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ! राज्यातील रखडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता !!

मार्चमध्ये निवडणुकांची रणधुमाळी ! राज्यातील रखडलेल्या नगरपालिका, महानगरपालिका निवडणुका होण्याची शक्यता !!


कल्याण : कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यामुळे आता स्थानिक निवडणुका घेण्याबाबत अखेर तयारी सुरू झाली आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील महापालिका, नगरपरिषदेच्या निवडणुका लांबणीवर पडल्या होत्या. या निवडणुका आता मार्च महिन्यात घेण्याची तयारी निवडणूक आयोगाने केल्याची माहिती समोर आली आहे. 

तब्बल अंदाजे ७ कोटी मतदार या निवडणुकीत आपले स्थानिक प्रतिनिधी निवडणार आहे. 
मुदत संपलेल्या महापालिकांमध्ये नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, वसई विरार, कोल्हापूर आणि औरंगाबाद महापालिकांचा समावेश आहे. फेब्रुवारीमध्ये मुदत संपणाऱ्या महापालिका १० बृहन्मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती अकोला आणि नागपूर महापालिका आहे. तसेच, ३१० नगरपालिका आणि नगर पंचायत यात १ कोटी २६ लाख मतदार असतील. यात १०० नगरपालिकांची मुदत संपली आहे, तर फेब्रुवारीमध्ये २१० नगरपालिकांची मुदत संपणार आहे. सुमारे ३ कोटी ५० लाख मतदार असलेल्या २७ जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका होणार आहे. २७ जिल्हा परिषद आणि ५ जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणूक त्याच बरोबर २९९ पंचायत समितीच्या निवडणूक होतील. 

ठाणे, पालघर वगळून सर्व जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. राज्यातील २०० ग्रामपंचायतच्या निवडणूक याच कालावधीत होतील. त्यामुळे निवडणुकीच्या प्रतिक्षेत असलेल्या इच्छुक उमेदवारांनी आता कामाला लागण्यास हरकत नाही.

महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता होणार कायापालट !!

महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता होणार कायापालट !!


कल्याण : महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून महापालिका परिसरातील रस्त्यांचा आता कायापालट होणार असून महापालिका क्षेत्रातील 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक व 7 वाहतुक बेटे यांचे सुशोभिकरण आणि निगा, देखभाल-दुरुस्तीसाठी महापालिकेने CREDAI-MCHI, कल्याण यांच्या बरोबर नुकताच एक सामंजस्य करार केला आहे. महापालिकेच्या विकास आराखडयातील  वाहतूक बेटे, रस्ता दुभाजक इ. चे सुशोभिकरण, निगा, देखभाल करण्यासाठी 5 वर्षाच्या कालावधीसाठी महापालिकेने हा करार केला आहे. यानुसार रस्ता दुभाजक, चौक यामध्ये हिरवळ, झाडे लावणे व त्यांची दैनंदिन निगा, देखभाल करणे त्याचप्रमाणे प्रत्येक रस्ता दुभाजकाला व गार्ड स्टोनला वर्षातून एकदा रंगरंगोटी करणे व वर्षातून दोन वेळा पाण्याने धुणे व किरकोळ दुरुस्ती सुद्धा करण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची राहणार आहे. त्याबदल्यात वाहतूक बेटे व रस्ता दुभाजकाच्या विदयुत खांबावर जाहिराती चे हक्क विकासकांना विना शुल्क स्वरुपात देण्यात आले आहे. व तसेच सामाजिक संदेश व महापालिकेने दिलेले संदेश लावणे संबंधित विकासकास बंधनकारक राहील.

महापालिका क्षेत्रातील पुना लिंक रोड (सुचक नाका) ते विठ्ठलवाडी, चक्की नाका ते मलंग रोड, चेतना नाका ते साकेत कॉलेज, नेतीवली नाका ते चक्की नाका, मूरबाड डायव्हर्शन रोड (दुर्गाडी ते प्रेम ऑटो), गांधारी रोड (लाल चौकी ते गांधारी पुल), संतोषी माता रोड (सहजानंद चौक ते इंदिरा नगर), बेतुरकरपाडा ते खडकपाडा, बारावे रोड (खडकपाडा ते गोदरेज हिल), बिर्ला कॉलेज ते चिकणघर, निक्की नगर ते माधव संकल्प, निक्की नगर मधील भोईर चौक, विशाल भोईर चौक ते उंबर्डे रोड, एमएसआरडीए 45 मिटर ते साई सत्यम होम्स, कोलीवली रोड, विश्वनाथ भोईर बंगलो- 18 मिटर ते कडोमपा पाण्याची टाकी, काली मश्जिद ते चिकणघर, प्रेम ऑटो ते शहाड पूल, शहाड – मोहने रोड, वैष्णवी देवी मंदिर ते टिटवाळा स्टेशन, टिटवाळा स्टेशन ते गणेश मंदिर,रेल्वे समांतर (90 फुट रोड), ठाकुर्ली, सावित्रीबाई फुले नाटयगृह रोड, घारडा चौक ते मंजूनाथ शाळा या 22 रस्त्यांमधील रस्ता दुभाजक त्याचप्रमाणे चक्की नाका सर्कल कल्याण (पूर्व), म्हात्रे नाका सर्कल साकेत कॉलेज रोड कल्याण (पूर्व),  कोळीवली रोड 18 मी. व 15 मी. जंक्शन रस्ता येथील सर्कल, सेंट लॉरेन्स शाळेजवळ आधारवाडी कल्याण (प) येथील सर्कल, कोलीवली सर्कल, प्रांत ऑफिस वायले नगर चौक, टिटवाळा मंदिर सर्कल अशी 7 वाहतूक बेटे/सर्कल यांचे सुशोभीकरण करणेबाबत महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी मान्यता दिल्यानंतर करारनामा नुकताच महापालिकेच्या वतीने शहर अभियंता सपना कोळी-देवनपल्ली आणि CREDAI-MCHI चे अध्यक्ष श्रीकांत शितोळे यांनी केला असून सदर समयी महापालिकेचे कार्यकारी अभियंता सुभाष पाटील, मुख्य उदयान अधिक्षक संजय जाधव, CREDAI-MCHI चे सेक्रेटरी विकास जैन, खजिनदार साकेत तिवारी हे उपस्थित होते.

भाजप विरुद्ध सेना वाद शिगेला, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार !!

भाजप विरुद्ध सेना वाद शिगेला, सामनाच्या संपादक रश्मी ठाकरेंविरोधात नाशिक पोलिसांत तक्रार !! 


भिवंडी, दिं, 25, अरुण पाटील, (कोपर) :
          केंद्रीय मंत्री नारायण राणे  यांच्या अटक प्रकरणामुळे आता शिवसेना  आणि भाजपमध्ये तक्रार युद्ध पेटले आहे. नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी सामनाच्या संपादकांविरोधात तक्रार अर्ज दाखल केला आहे. आजच्या 'सामना'च्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करून नाशिकमध्ये पोस्टर झळकवले आहे, त्यामुळे तक्रार देण्यात आली आहे.
          नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात  भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी एक तक्रार अर्ज दिला आहे. या तक्रार अर्जावर सामनाच्या संपादक रश्मी ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला आहे.  शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या आजच्या दैनिक सामनाच्या अग्रलेखात नारायण राणे यांच्यावर खालच्या भाषेत टीका करण्यात आली आहे.
          त्याचबरोबर नाशिकमध्ये राणें विरोधात पोस्टर झळकवले आहे. त्यामुळे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी भाजप पदाधिकाऱ्यांनी केली आहे. विशेष म्हणजे, राणें विरोधात नाशिक पोलिसांतच तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यामुळे भाजपकडूनही नाशिक पोलिसांकडे तक्रार करण्यात आली आहे. त्यामुळे नाशिक पोलिसांच्या भूमिकेकडे लक्ष लागले आहे.
         पंतप्रधान मोदी यांच्या मांडीस मांडी लावून बसणाऱ्या महात्मा नारोबा राणे यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर हल्ला करण्याची भाषा केली. पंतप्रधानांच्या बाबतीत कुणी असं विधान केलं असतं तर त्यास देशद्रोहाच्या आरोपाखाली एव्हाना तुरुंगात डांबलेच असते. नारोबा राणे यांचा गुन्हा त्याच पद्धतीचा आहे.
          महाराष्ट्रात कायद्याचेच राज्य आहे व एका मर्यादेपलीकडे ही बेताल बादशाही खपवून घेतली जाणार नाही हे कृतीनं दाखवून द्यायची हीच वेळ आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हा बेतालपणा सहन करणार नाहीत. मुख्यमंत्र्यांवर हात टाकण्याची भाषा करणारा कोणीही असो त्यांचे हात सध्या तरी कायदेशीर मार्गानं उखडलेलेच बरे !.
        पंतप्रधान मोदींना मारण्याचा नुसता कट रचल्याच्या ? आरोपाखाली काही विचारवंतांना फडणवीस सरकारनं तुरुंगात सडवलेच आहे. इथे नारोबा राणे यांनी मुख्यमंत्र्यांना मारण्याचीच सुपारी घेतल्याचं दिसत आहे. आता सुपारीबाजांची महाराष्ट्रात आरती ओवळायची काय?
        महात्मा नारोबांसारखे भाडोत्री लोक शिवसेनेवर सोडले जात आहेत. या भाडोत्रींनी भाजपलाच नागडे करुन सोडले व आता तोंड लपवून फिरण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. केंद्रीय मंत्री नारोबा राणे यांनी शपथ ग्रहण केल्यापासून जे दिवे पेटवले व अक्कल पाजळली त्यामुळे केंद्र सरकारची मान शरमेनं खाली झुकली आहे.

फळेगाव-आबांर्जे रस्ता खड्ड्यात, इतर रस्त्यांची चाळण, सर्वत्र घाणीचे साम्राज्य?

फळेगाव-आबांर्जे रस्ता खड्ड्यात, इतर रस्त्यांची चाळण, सर्वत्र घाणीचे साम्राज्य?


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण आणि शहापूर तालुक्यांंना जोडणारा फळेगाव आबांर्जे रस्ता अक्षरशः खड्ड्यात गेला आहे तर इतर गावातील अंतर्गत तसेच बाह्य रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे चिखल, कचरा, सांडपाणी, आदीमुळे सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून यामुळेच विविध साथीचे आजार वाढले आहे.


कल्याण आणि शहापूर तालुक्यातील  फळेगाव हे मोठ्या लोकसंख्येचे गाव दोन्ही तालुक्याच्या वेशीवर आहे, येथून शहापूर, आबांर्जे, चिखले मार्गे मुरबाड येथेही जाण्या येण्यासाठी रस्ता आहे. या गावाच्या अगदी शेजारीच मढ येथे गंगा गोरेश्वर हे नदीच्या काठावर पवित्र क्षेत्र आहे,येथे महाशिवरात्री ला मोठी यात्राही भरते,अशा या महत्त्वाच्या ठिकाणी रस्त्याची मात्र पुरती बोंबाबोंब आहे, अगदी फळेगाव पासून ते आबांर्जे गावाच्या नाल्या पर्यत रस्ता खड्ड्यात आहे की रस्त्यावर खड्डे हेच कळत नाही.


तर इतर काही गावात सिंमेट काँक्रीट चे रस्ते केले आहेत. पण त्यांना गटारे नसल्याने, असे मजबूत रस्ते काही लोकांनी विविध कारणासाठी फोडल्याने, अडविल्याने, येथे रस्त्यावर चिखल,सांडपाणी, गुंराचे मलमूत्र, कचरा यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्याचा नेमका उद्देश काय? हेच कळल्याचे दिसत नाही, अगदी ही परिस्थिती प्रत्येक गावात दिसते.

मोहना, मानिवली, आंबिवली, मांडा, वासुर्दी, निंबवली, राया, खडवली, फळेगाव, गेरसे, कोसले, संतेचापाडा, घोटसई, रूंदे फळेगाव तसेच अगदी कल्याण मुरबाड वरील म्हारळ, वरप, कांबा येथे रस्त्यांंची काय अवस्था झाली आहे. याला जबाबदार कोण? केवळ प्रशासनाकडे बोट दाखवून चालेल?आपले लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार, मंत्री काय करतात? याहूनही महत्त्वाचे आपण नागरिक म्हणून आपली काय जबाबदारी याचा ही विचार व्हायला नको का?

नुकतेच जिल्ह्यातील केंद्रीय पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांनी जन आशीर्वाद यात्रेचे आयोजन केले होते, त्यामुळे त्यांना येथील प्रश्न, अडचणी, समस्या कळल्या असतील किंवा त्यांच्या कार्यकर्ते मंडळीनी सांगितले असतील अशी अपेक्षा धरून गावोगावचे विविध प्रश्न सुटतील अशी आशा व्यक्त करुन ग्रामस्थांनी देखील पक्षीय राजकारण बाजूला ठेवून, गावविकासा साठी, समाजविकासाठी सदर प्रश्नांचा पाठपुरावा करायला हवा, तेंव्हा गाव समृद्ध व सुजलाम सूफलाम होईल. हे लक्षात घ्यायला हवे.

Tuesday, 24 August 2021

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले शिवसेनेच्या युवासेनेचे कौतुक !!

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले शिवसेनेच्या युवासेनेचे कौतुक !!


मुंबई : सत्तेत आल्यानंतर शिवसेनेनं शहाणपण दाखवत मवाळ भूमिका घेतली होती. पण, आज शिवसैनिकांचा आक्रमक बाणा आज पाहण्यास मिळाला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या विधानाचा निषेध करत शिवसैनिकांनी राज्यभर भाजप कार्यालयावर एकच हल्लाबोल केला.

नारायण राणे आणि शिवसेना हा वाद महाराष्ट्रासाठी नवा नाही, पण आज शिवसैनिकांनी आपले नवे रुप दाखवत भाजपला गारद केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर हात उगारण्याची भाषा करणाऱ्या नारायण राणे यांच्याविरोधात शिवसेनेच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईपासून ते राज्यभर जोरदार निदर्शनं केली. अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यालयावर आक्रमकपणे हल्ला केला. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची चांगलीच त्रेधातिरपट उडाली.

युवासैनिकांच्या या धडाकेबाज कामगिरीचं शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केलं आहे. आज युवासैनिकांनी शिवसेना स्टाईल केलेल्या आंदोलनाची उद्धव ठाकरे यांनी तोंडभरून स्तुती केली आहे. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये आणखी जल्लोष वाढल्याचं पाहण्यास मिळत आहे.

पोलिसांनी जेवणाच्या ताटावरूनच नारायण राणेंना केली अटक, मुंबईत शिवसैनिकांनी फोडले फटाके.!

पोलिसांनी जेवणाच्या ताटावरूनच  नारायण राणेंना केली अटक, मुंबईत शिवसैनिकांनी फोडले फटाके.!


भिवंडी, दिं,24, अरुण पाटील (कोपर) :
         नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील वादाचा नवा अंक आज पाहण्यास मिळाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्याविरोधात अरेरावीची भाषा करणे राणे यांना चांगलेच भोवले आहे. पोलिसांनी जेवणाच्या ताटावरून नारायण राणेंना अटक केली आहे. राणेंना अटक होताच मुंबईतील कुलाब्यात शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून एकच जल्लोष केला आहे.
          केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर नारायण राणे यांनी शिवसेनेला अंगावर घेतले आणि जोरदार टीकास्त्र सोडले. पण, रायगडमध्ये पत्रकारांशी बोलत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल अरेरावीची भाषा वापरल्यामुळे राणे यांना चांगलेच महागात पडले. पोलिसांनी नारायण राणे यांना अटक केली आहे.नारायण राणे यांना अटक केल्यानंतर शिवसैनिकांनी एकच जल्लोष साजरा केला. मुंबईतील कुलाबा परिसरातील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिकांनी जोरदार फटाके फोडून राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
      आज सकाळपासून ठिकठिकाणी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयांवर जोरदार हल्ला चढवला होता. मुंबई, ठाण्यात, पुणे, नाशिक, सिंधुदुर्गात शिव सैनिकांनी भाजपविरोधात जोरदार राडा घातला. दरम्यान, गोळवली येथील रा.स्व. संघाच्या सेवा प्रकल्पाची पाहाणी करत असताना रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतले. राणे आपल्या दोन्ही मुलं आणि आमदार प्रसाद लाड यांच्या सोबत बंद खोलीत बसून जेवण करत होते. पोलीसांचा  मोठा फौजफाटा बाहेर उभा होता.
            पोलीस अधिक्षकांनी राणेंना सोबत येण्याची विनंती केली, पण जेव्हा आतमध्ये मोठा गोंधळ उडाला. निलेश राणे यांनी पोलिसांना तुमच्याकडे अटक वॉरंट आहे का असं म्हणत हुज्जत घातली, त्यावेळी राणे जेवत असताना उठले. त्यानंतर राणेंना पोलिसांनी ताब्यात घेतलं.अटकेनंतर नारायण राणे यांचं ब्लड प्रेशर आणि शुगर वाढली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात यावं असा सल्ला डॅाक्टरांनी पोलीस अधिक्षक यांना दिला आहे.

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर ....

गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा..! चाळीसगावात विद्यार्थ्यांसाठी जनजागृतीपर आरोग्य शिबीर .... *चाळीसगाव, दि. ११ सप्टेंबर २०२६ :* ...