Thursday, 29 February 2024
'सारथी' संस्थेमार्फत ४७ गड-किल्यांची स्वच्छता !!
Wednesday, 28 February 2024
युवा उद्योजक मा.श्री.अथर्व बुटाला यांना नुकताच जाहीर झाला बिझनेस एक्ससिल्लेन्स अवॉर्ड २०२४ ..
राजीव गांधी हत्त्या कांडातील आरोपीचा राजीव गांधी रुग्णालयात मृत्यू !!
सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी !!
सावकारीच्या विळख्यात अडकले ६३ हजार शेतकरी !!
अमरावती, प्रतिनिधी ::बॅंकांचे कर्ज भरण्यास अपयशी ठरलेल्या शेतकऱ्यांवर सावकारी कर्ज घेण्याची वेळ येत आहे. जिल्ह्यात गेल्या ९ महिन्यांत परवानाधारक ६०२ सावकारांनी ६३,०६३ कर्जदारांना ६७.४४ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई !!
यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खोपोली बाह्यमार्गात बदल !!
महासंस्कृती महोत्सव २०२४ चे शानदार उद्घाटन !!
ग्रंथ समाजाला दिशा देण्याचे काम करतात - ॲड श्रीमती सुनीता जोशी
जिल्ह्यातील 10 शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर !!
महर्षी दयानंद कॉलेज कला विभाग बॅच -१९८७-८९ चे चौथे स्नेहसंमेलन खेळीमेळीच्या वातावरणात साजरे !!
मराठी राजभाषा दिनी विद्यार्थांना देण्यात आली मराठी साहित्यिकांची ओळख !!
राज्यातील एकूण अठ्ठावीस अधिका-या बदल्या, कल्याण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी म्हणून डहाणू च्या बीडिओची नियुक्ती !
Tuesday, 27 February 2024
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर !!
उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री मा. अजितदादा पवार यांच्याकडून अंतरिम अर्थसंकल्प सादर !!
*** पायाभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद
मुंबई, प्रतिनिधी : राज्याच्या २०२४-२५ वर्षाच्या एकूण खर्चासाठी ६ लाख ५२२ कोटी रुपयांची तरतूद असलेला अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केला. अर्थसंकल्पामध्ये ४ लाख ९८ हजार ७५८ कोटी रुपये महसुली जमा आणि ५ लाख ८ हजार ४९२ कोटी रुपयेम हसुली खर्च दाखवण्यात आला आहे. महसुली तूट ९ हजार ७३४ कोटी रुपयांची तर, राजकोषीय तूट ९९ हजार २८८ कोटी रुपयांची अंदाजित करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात चार महिन्यांचे लेखानुदान मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहे.
उपमुख्यमंत्र्यांनी विधानसभेत सादर केलेल्या अंतरिम अर्थसंकल्पात कार्यक्रम खर्चाकरिता नियोजन विभागास ९ हजार १९३ कोटी रुपये, रोजगार हमी योजनेसाठी २ हजार २०५ कोटी रुपये, मराठी विभागासाठी ७१ कोटी रुपये नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १८ हजार १६५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. राज्याची वार्षिक योजना १ लाख ९२ हजार कोटी रुपयांची आहे. अनुसूचित जाती उपयोजनेसाठी १५ हजार ८९३ कोटी रुपये, आदिवासी विकास उपयोजनेसाठी १५ हजार ३६० कोटी रुपये प्रस्तावित करण्यात आले आहेत.
राज्याचा हा अंतरिम अर्थसंकल्प असला तरी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, शेतकरी, कष्टकरी, महिला, विद्यार्थी, युवक, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, उद्योजक, व्यापारी, व्यावसायिक अशा समाजातील सर्व घटकांना न्याय आणि विकासाची संधी उपलब्ध करुन देण्याचा प्रयत्न अर्थसंकल्पात केला आहे. अंतरिम अर्थसंकल्पातही अर्थमंत्री अजित पवार यांनी शाश्वत, पर्यावरणपूरक, सर्वसमावेशक विकास साधण्याच्या राज्याच्या धोरणाला गती देण्यास प्राधान्य दिले आहे.
अर्थसंकल्पातील प्रमुख घोषणा__
* जुलै 2022 पासून शेतीपिकांच्या नुकसानीसाठी 12 हजार 769 कोटी रूपये मदत देण्यात आली.
* शेतकऱ्याला दिवसा वीज पुरवठा -मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेअंतर्गत 7 हजार मेगावॅट सौर ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट शेतकऱ्यांसाठी 'मागेल त्याला सौर कृषी पंप' या योजनेअंतर्गत 8 लाख 50 हजार नवीन सौरकृषी पंप
* 25 वर्षांपेक्षा जुन्या 155 प्रकल्पांची दुरूस्ती आणि 75 अपूर्ण सिंचन प्रकल्पांची कामे पूर्ण करण्यात येतील यातून 3 लाख 55 हजार हेक्टर सिंचन क्षमता आणि 23.37 टीएमसी पाणीसाठा निर्माण होईल.
* श्रीनगर आणि अयोध्या येथे महाराष्ट्र भवन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी 77 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
* नवी मुंबई विमानतळाचा पहिला टप्पा मार्च 2025 ला कार्यान्वित होईल.
* राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीसांची 14 हजार रिक्त पदे भरण्यात आली आहेत. इतर रिक्त पदे भरण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
* कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी नागरी बाल विकास केंद्र सुरु करण्यात आली आहेत.
* महिला सक्षमीकरणासाठी दहा शहरांतील पाच हजार महिलांना पिंक रिक्षा योजना प्रस्तावित आहे.
* मुलींच्या सक्षमीकरणासाठी लेक लाडकी ही नवी योजना 1 एप्रिलपासून सुरू केली जाणार आहे. यात 18 वर्षांपर्यंत टप्याटप्याने एकूण 1 लाख 1 हजार रूपये मिळतील.
* वाशिम, जालना, हिंगोली,अमरावती, भंडारा, गडचिरोली, वर्धा, बुलढाणा, पालघर, नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे प्रत्येकी 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, संलग्नित 430 खाटांचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
* महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेचे संवर्धन करणाऱ्या मराठी मंडळांना अनुदान देण्यात येणार आहे. त्याचबरोबर गोवा, दिल्ली, बेळगाव, कर्नाटक याठिकाणी मराठी भाषा उपकेंद्र स्थापन केले जाईल.
* राज्यात नवीन 10 अतिरिक्त कुटुंब न्यायालये, 5 जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालये आणि 5 दिवाणी न्यायालयांना स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
* महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळामार्फत ॲन्युईटी योजना भाग-2 अंतर्गत 7 हजार 500 किलोमीटर रस्त्यांची कामे केली जातील.
* वर्सोवा वांद्रे सागरी सेतूचा विस्तार पालघरपर्यंत आणि विलासराव देशमुख पूर्व मुक्त मार्गाचा ठाणे शहरापर्यंत विस्तार केला जाणार आहे.
* छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळाच्या विस्ताराकरिता भूसंपादनासाठी 578 कोटी 45 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल.
* कोकण विभागातील पर्यटनास चालना देण्यासाठी शिवकालीन 32 गडकिल्ल्यांचे नूतनीकरण व संवर्धन केले जाणार. पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत पर्यटन धोरण आखलं जाईल.
* कल्याण-मुरबाड, पुणे-नाशिक आणि सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या नवीन रेल्वे मार्गांचे भूसंपादन सुरु करण्याची तरतूद अर्थसंकल्पात केली जाईल.
* संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळामार्फत देवनार येथे "लेदर पार्क", कोल्हापूर येथे चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची निर्मिती केली जाईल.
* प्रत्येक महसुली विभागात 'उत्कृष्टता केंद्रांची' स्थापना, गोवंडी येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत चर्मोद्योग प्रशिक्षण केंद्राची उभारणी करण्यात येईल.
* मातंग समाजासाठी "अण्णाभाऊ साठे संशोधन व प्रशिक्षण संस्था- आर्टीची स्थापना करण्यात आली.
* वार्षिक योजना एक लाख 92 हजार कोटी रुपये, अनुसुचीत जाती उपयोजना 15 हजार 893 कोटी रुपये आणि आदिवासी विकास उपयोजना 15 हजार 360 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे.
* नमो शेतकरी महासन्मान निधी योजना" अंतर्गत 84 लाख 57 हजार शेतकरी कुटुंबांना पहिल्या हप्त्यापोटी 1 हजार 691 कोटी 47 लाख रुपये
* सर्व जिल्ह्यांमध्ये 15 खाटांचे अद्ययावत डे केअर केमोथेरपी सेंटर सुरू करणार, 234 तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयांत डायलिसीस सेवा केंद्र सुरू करणार त्याचबरोबर रुग्ण मृत्यू पावल्यास मृतदेह रुग्णालयातून नेण्यासाठी प्रत्येक तालुक्यात एक शववाहिका सुरू केली जाणार.
कणकवली एस्.एम्.हायस्कूल १९७६ बॅचच्या एकत्र आलेल्या मित्र-मैत्रिणींच्या सहवासातून मिळाला नवचैतन्याचा अविष्कार, जुन्या आठवणींना उजाळा देत स्नेह मेळा उत्साहात संपन्न...!
वरप येथे जांभूळ बिटाचा महिला मेळावा संपन्न, मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ग्रंथ दिडिंने सुरुवात, मदतनीसांच्या लेझीम ने रंगत वाढली !
Monday, 26 February 2024
रायगड जिल्हाधिकारीपदाची सूत्रे श्री. किशन जावळे यांनी स्वीकारली !!
“शासन आपल्या दारी” अभियानाच्या यशस्वीततेसाठी सर्व शासकीय यंत्रणांनी उत्कृष्ट योगदान द्यावे -- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे
महाड तालुका कुणबी समाज रहिवाशी संघाचा नालासोपारा येथे हळदीकुंकू व स्नेहसंमेलन संपन्न !!
कासार कोळवण बावनदी पूल व्हावा म्हणून उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांना ग्रामस्थांचे निवेदन !!
म्हारळ ग्रामपंचायतीच्या वतीने डॉ मेघा मोरे हिचा सत्कार, वडिलांचा कोरोनामुळे मृत्यूनंतरही मिळवले यश !
श्री देव केदारलिंग युवा स्पोर्ट्स क्लब मारळ आयोजित मार्लेश्वर पंचक्रोशी मर्यादित केदारलिंग चषक -२०२४ चे राजकोजी क्रिकेट संघ रेवाळेवाडी आंगवली ठरला मानकरी !!
रुग्णांसाठी कार्य करणाऱ्या देवदुतांचा सन्मान !!
Sunday, 25 February 2024
राष्ट्रीय कर्मचारी सेनेचा G4S सेक्युरिटी ला दणका !!
अपना बाजारच्या पंचवार्षिक निवडणुकीत अपना जय हो पॅनलचा प्रचंड मतांनी विजय..
संजय सिताराम भोसले यांचे निधन !!
Saturday, 24 February 2024
28 फेब्रुवारी रोजी जामनेर येथे ग्रामपंचायत कर्मचारी महासंघाचा मोर्चा गिरीश महाजन यांच्या कार्यालयावर मोर्चा ! यशस्वी करा !!
रत्नागिरी सावकारी कर्जाच्या विळख्यात ! अनेक सावकार रडारवर !!
रत्नागिरी सावकारी कर्जाच्या विळख्यात ! अनेक सावकार रडारवर !!
रत्नागिरी, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यात सावकारी कर्जाच्या विळख्यात अनेकजण अडकले आहेत. सावकारी कर्जात अनेकांची पिळवणूकही झाली असून काहीजणांनी आत्महत्येपर्यंतचे पाऊल उचल्याची माहिती पुढे येत आहे. आतापर्यंत सावकारी कर्ज देणाऱ्या अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. रत्नागिरीत सुरू असलेल्या सावकारीकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी गांभीर्याने लक्ष दिले असून लवकरच या सावकारीचा बिमोड केला जाणार आहे.
एक लाख रूपये सावकारी कर्ज घेतलेल्या व्यक्तीचे 40 लाख रूपये कर्ज झाल्याचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी वैभव राजाराम सावंत याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चाळीस जणांनी कर्जाची नोटरी केल्याचे आढळून आले. त्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी गांभीर्याने लक्ष घातले आहे. पत्रकारांशी शुक्रवारी बोलताना पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी म्हणाले की, सध्या जिल्ह्यात सुरू असलेल्या सावकारी कर्जाच्या विषयावर आम्ही लक्ष ठेवून आहोत. अनेक जण त्या सावकारी कर्जाला बळी पडले आहेत. काहींनी आत्महत्येचे पाऊल उचलले होते. परवा उघडकीस आलेल्या प्रकारात त्याने 1 लाख 20 हजाराचे कर्ज घेतले. त्याला दर महिना 20 टक्के व्याज म्हणजे वर्षाला 240 टक्के व्याज लावले. चक्रवाढ पध्दतीने व्याज लावून त्याची रक्कम 40 लाख रूपये केल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली.
पोलिसांनी सावकारी कर्जाबाबत तक्रारी करण्याचे आवाहन केल्यानंतर सावकारी करणाऱ्या 10 जणांविरूद्द तक्रारी करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सावकारी सुरू असून कामगार व सर्वसामान्य त्याला बळी ठरले आहेत.जिल्ह्यात सावकारी कर्ज देणाऱ्यांचा शोध पोलीस घेत आहेत.
अवैध सावकारी संदर्भात कोणतीही तक्रार असल्यास तात्काळ ईमेल/अर्ज अथवा प्रत्यक्ष भेटून तक्रार करू शकता. अवैध सावकारी व त्यातून होणारी पिळवणूक रोखण्यासाठी जिल्हा पोलीस दल कठोर पाऊले उचलेल. कर्ज घेण्याच्या कायदेशीर मार्गांचा अवलंब करावा.
- धनंजय कुलकर्णी, पोलीस अधीक्षक, रत्नागिरी
अवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!
अवैध सावकारावर उपनिबंधकाची कारवाई !!
उमरखेड, प्रतिनिधी : घराचे प्लॉटचे कागदपत्र गहाण ठेवून अवैध सावकारी व्यवसाय करणारा सावकार व्याजाच्या पैशासाठी तगादा लावत असल्याने तक्रारदाराने जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दाखल केली. त्यामुळे उपनिबंधक पथकाने अवैध सावकाराच्या घरावर धाड टाकून घरातील संशयास्पद 161 कागदपत्रे जप्त केली. या कारवाईने अवैध सावकारी करणार्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
नारायण बाळा निमजवार (चिरडे नगर, महागाव रोड, उमरखेड) असे अवैध सावकारी करणार्या सावकाराचे नाव आहे. त्याने उमरखेडमधील शिवाजी वॉर्डातील रहिवासी श्याम तुकाराम गोसावी यांच्या घराचे कागदपत्रे ठेवून व्याजाने पैसे दिले होते. दिलेल्या पैशाचा व्याजापोटी हा सावकार तगादा लावत असल्याने श्याम गोसावी यांनी 15 जानेवारी 2024 रोजी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ येथे तक्रार दिली होती.
त्यावर गुरवार, २३ फेब्रुवारी अर्जाच्या अनुषंगाने पडताळणीसाठी उपनिबंधक सावकारी पथकाने नारायण निमजवार याच्या चिरडे नगर येथील घरावर धाड टाकून झडती घेतली. या कारवाईदरम्यान निमजवार याच्या घरातून संशयास्पद कोरे चेक, कोरे स्टॅम्प पेपर, खरेदी खत, नोंदी असलेल्या डायर्या व हिशोबाच्या चिठ्ठ्या असे एकूण 161 कागदपत्रे जप्त करण्यात आली. या कागदपत्रांची पडताळणी करून महाराष्ट्र सावकारी अधिनियम 2014 मधील तरतुदीनुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे
१ जुलै पासुन ३ नवीन फौजदारी कायदे लागू होणार !!
डॉक्टर काका सांभाळा !
डॉक्टर काका सांभाळा ! लहानपणी डॉक्टर हा आमच्या कुटुंबाचाच एक भाग असायचा. सहसा त्याला फॅमिली डॉक्टर म्हटलं जायचं. आमच्या कोणत्याह...
-
कडोंमनपा स्वच्छता अधिकारी अविनाश मांजरेकर कमावतात महिन्यात पाच लाख रुपये - माहिती अधिकार कार्यकर्ते मेढेकर *** आयुक्तांचे यांच्यावर नाही नि...
-
वाहनधारकांनी सर्व वाहनांना हाय सेक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे अत्यावश्यक ! मुंबई, प्रतिनिधी : केंद्रीय मोटार वाहन नियम, 1989...
-
कल्याण स्टेशन परिसरात ट्रॅफिक ची जीवघेणी कोंडी. कल्याण पश्चिम मधील नागरीकांची 'रोज मरे त्याला कोण विचारे' अशी अवस्था !! ** स्मृती फा...