विघ्नहर्ता ग्रुप पोलादपूरच्या वतीने एक अनोळखी दिवाळी साजरी केली पोलादपूरच्या आदिवासी बांधवांना दिवाळीचा फराळ वाटाप कार्यक्रम करून आदिवासी बांधवाना शुभ पाडवा व दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या व ते आनंदी झाले. या छोटे खानी कार्यक्रम प्रसंगी पोलादपूरच्या नगर पंचायत महिला बालकल्याण सभापती सौ सिद्दीकी फयाज लोखंडे तसेच विघ्नहर्ता ग्रुप चे अध्यक्ष सिध्देश गंगाधर पवार तसेच कु अर्थव प्रसन्न बुटाला , बापू दरेकर सन्मित दरेकर , अर्चन पाटोळे,अभिषेक जंगम, प्रथमेश मोहिरे,मुझसिर हेलवादकर,आणि सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते
Monday, 12 November 2018
Sunday, 11 November 2018
खालसा गावात जवानांचे जोरदार स्वागत
अतिरेक्याच्या हल्यात जखमी झालेल्या जवानाचे जवखेडे खालसा गावात जोरदार स्वागत
जवखेडे खालसा,ता.पाथर्डी, जि. अहमदनगर येथील भुमिपुत्र ऋषिकेश आंधळे हा भारतीय सैन्य दलामध्ये पॅरा
पाथर्डी - (प्रतिनिधी ) -
कमांडो फोर्स दलात गेल्या चार वर्षापासुन कार्यरत आहे,सध्या तो काश्मीर खोऱ्यात अतिसंवेदनशील भागात सोफियान येथे देशसेवेत कार्यरत आहे,शुक्रवार पाच ऑगस्ट २०१८ रोजी या जवानाच्या बटालियनला मेमेनडर गावामध्ये अतिरेकी घुसल्याची खबर मिळाल्याबरोबर ही १७ जवांनाची फौज अतिरेक्यावर कारवायी करण्यासाठी आर्मीच्या गाडीत निघाली असता पहाडी भागामध्ये सदर गाडीला सुरूंगाच्या स्फोटात उडविण्यात आले गाडी पलटी होऊन अपघात झाल्यामुळे सतरा जवान जखमी झाले,त्यांच्यावर एक महिना सैनिक दवाखान्यात उपचार केल्यानंतर विश्रांतीसाठी घरी पाठविण्यात आले,व ज्या दिवशी ऋषिकेश घरी येणार होता त्याच दिवशी योगायोगाने त्याचा वाढदिवस असल्यामुळे अमोल वाघ व अॅड.वैभव आंधळे मित्र मडंळाच्या वतीने ऋषिकेशचे जवखेडे खालसा गावामध्ये फटाक्याच्या आतषबाजीत जोरदार स्वागत करून देशसेवेविषयीचे आपले प्रेम याव्दारे व्यक्त केले,यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन मंत्रालयातील प्रधान सचिवांचे विशेषकार्यकारी आधिकारी डॉ.बाबासाहेब राजळे,ठाणे जिल्हा येथील पोलिस निरीक्षक सुरेश आव्हाड, पाथर्डी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी हे उपस्थित होते,प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऋषिकेश यांच्यासह जवखेडे खालसा कासारवाडी गावातील सर्व आजी माजी सैनिकांचा सन्मान व गौरव करण्यात आला यावेळी डॉ.राजळे यांनी तरूणांनी भारतीय सेवेमध्ये जाण्यासाठी प्रयत्न करावेत व गावामध्ये स्पर्धा परिक्षेसाठी ग्रंथालय सुरू करावेत त्यासाठी लागणारे पुस्तके मी स्वतः देईल असे आश्वासन दिले, पोलिस निरीक्षक आव्हाड यांनी जवखेडे गावात पस्तीस आजी माजी सैनिक असल्याने गावचे कौतुक केले तर पाथर्डीचे पोलिस निरीक्षक रमेश रत्नपारखी यावेळी बोलताना म्हणाले की, अमोल वाघ व अॅड. वैभव आंधळे मित्रमडंळाने आज जो कार्यक्रम ठेवला आहे तो अतिशय स्तुत्य असुन या उपक्रमामुळे युवकांना स्फुर्ती देण्याचे काम केले आहे,व जास्तीत जास्त युवकांनी स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करून शारीरीक व्यायाम ही करावा जेणे करून पोलिस व आर्मी भरतीमध्ये अडचणी येणार नाहीत,असे सांगुन गावातील चौकामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची सुचना केली.
याप्रसंगी आजी माजी सैनिकांनी आपली मनोगते व्यक्त केली.
या कार्यक्रमास जेष्ठ नेते पोपटराव आंधळे,अमोल वाघ,अॅड. वैभव आंधळे,अॅड. राजेंद्र कासार, अंजिक्य आंधळे, महमंद पठाण, वसंत पोटे,बाळासाहेब भोसले, इरफान पठाण,जगन्नाथ आंधळे, कैलास वाघ,नितीन जाधव,विजय भोसले,प्रा.राजेंद्र वाघ,उध्दव मतकर,संभाजी आंधळे,प्रकाश वाघ,उत्तम आंधळे,भुजंग भताने, दिलीप आंधळे,दिलीप शिंदे, संकेत आंधळे,रंगनाथ मतकर, गोरक्ष काळे,भास्कर आंधळे,प्रा.रविंद्र जाधव,एकनाथ आंधळे,लालुभाई शेख,संजय खंडागळे,आयुब शेख,गुलाब शेख,रमेश कासार,संतोष उगले, दत्ता गायकवाड यांच्यासह आजी माजी सैनिकांचे नातेवाईक,जेष्ठ नागरिक व युवकमित्र मोठ्या संख्येने उपस्थित होते,प्रारंभी प्रास्ताविक अॅड.वैभव आंधळे यांनी तर शेवटी आभार मच्छिंद्र लांघे सर यांनी मानले.
प्रतिनीधी सुनिल नजन अहमदनगर -(पाथर्डी शेवगाव विधानसभा )
एक छोटीशी मदत पण, डोंगराएव्हड्या स्वप्नांना आकार देणारी
"सांगड "या सामाजिक संस्थेकडून इंन्फटला दिवाळी निमित्त मदतीचा हात.
सांगड संस्थेने " हम साथ-साथ है " चे दर्शन घडविले.
ठाणे - ( प्रतिनिधी)
ठाणे, टिटवाळा येथील सांगड या सामाजिक संस्थेने HIV. सह जगणाऱ्या इंन्फट इंडियाच्या ७५ अनाथ व उपेक्षित बालकांच्या दिवाळीचा किराणा सामान भरून अनाथाची दिवाळी साजरी केली.
सांगडच्या सर्व सहकारी मित्राच्या मदतीने २५७००/- रूपयांचे दिवाळीचे सामान या वेळी इंन्फट इंडिया संस्थेस भरुन दिले. त्याबद्दल सांगडचे विषेश कौतुक जनतेकडून होत आहे.
तसेच "एक छोटीशी मदत पण डोंगराएवढ्या स्वप्नांना आकार देणारी....! अशी ठरली.
दिवाळीचं दान वंचितांच्या पहाट फुलवण्यासाठी..!
यंदाची दिवाळी खर्या अर्थाने वंचितांसाठी साजरी झाल्याचे समाधान या सर्व सांगड च्या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होते. अनाथ, निराधार, व्याधीग्रस्त मुलांचा " इंफट इंडीया—पाली (बीड)" या प्रकल्पातील मुलांसाठी रुपये २५७००/— दिवाळी भेट सर्व सांगड च्या मित्रांनी मिळून ज।आ केली.
या कार्यात समर्थ साथ देणारे हितचिंतक,मित्र परीवारांचे खुप खुप आभार या कार्यकर्त्यांनी मानले .
दिवाळीच्या पहील्या दिवशी (वासुबारस )टिटवाळा गुरवली येथील " आईची सावली " या अनाथ मुलांच्या वस्तीगृहास भेट देऊन मुलांना फटाके,मिठाई,दिवाळी फराळ व दररोजच्या उपयोगी वस्तू भेट म्हणून दिल्या.
या दान महोत्सवात सहभागी होऊन वंचित बालकांच्या आयुष्यात प्रकाश निर्माण करण्यास मदत देणारे दाते:—
१) सिद्धेश्वर फड - १०००/-
२) श्रीकृष्णा सोनावणे - ८००/-
३) विजय आव्हाड - १०००/-
४) गणपत पालवे - १०००/-
५) इंद्रेश यादव - ८००/-
६) पंढरीनाथ भालेराव - १०००/-
७) सचिन येवले - १५००/- वस्तु स्वरुपात
८) सचिन भोजने - १०००/—
९) अर्जुन घुगे - ४०००/-
१०) शिवाजी दराडे - १०००/-
११)आरती भार्जे—१५००/—
१२)विठ्ठल पवार-१०००/—
१३)निलेश पिसाळ—१०००/—
१४)श्री.हंगरगे साहेब -५०००/
१५)अनिल फड—१६००/—
१६)अनामिक दाता—५००/—
१७)अनामिक दाता—५००/—
१८)राजाराम सांगळे—१०००/—
१९)उपेंद्र सिंग—१०००/—
२०)प्रविण सुतार—१०००/—
२१)अमोल पवार—१६००/—
२२)प्रितम—८००/—.
Thursday, 8 November 2018
राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते दैनिक बातमीदार व बातमीदार माझा चॅनलच्या विभागीय कार्यलयाचे उद्घाटन
राजाभाऊ पातकर यांच्या हस्ते दै.बातमीदार व बातमीदार माझा चॅनल च्या विभागीय कार्यालयाचे उद्घाटन
कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
दिवाळी मधील आज साडेतीन मुहूर्ता पैकी एक शुभ मुहूर्त म्हणून पाडवा संबोधला जातो. या शुभ मुहूर्तावर सन १९३५ पासून जळगाव येथे सुरू असलेल्या दैनिक बातमीदार चे मुंबई-ठाणे-कोकण विभागीय कार्यालय व बातमीदार माझा u tube चॅनलचे ही कार्यालयाचे, कल्याण येथे, प्रसिद्ध उद्योगपती श्री. मा. राजकुमारजी (राजाभाऊ) पातकर व सपत्नीक (सौ. राखी पातकर) यांच्या हस्ते करण्यात आले.
सकाळी या विभागीय कार्यलयाचे उद्घाटन राजाभाऊ पातकर यांनी आपल्या पत्नी सह फित कापून केले. नंतर दीप प्रज्वलन करून त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या प्रसंगी त्यांनी निपक्ष, बेधडक पत्रकारितेबद्दल कौतुक करून सर्व सामान्य जनतेचा आवाज बनून दैनिक बातमीदार व बातमीदार माझाआपले कार्य या पुढे करेल असे मनोगत व्यक्त केले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विभागीय कार्यकारी संपादक सचिन बुटाला व व्यवस्थापकीय संपादक जैनेंन्द्र सैतवाल यांनी राजाभाऊ पातकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच ज्ञानेश्वर पाटील यांचेही पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी सौ. राखी पातकर यांचेही स्वागत सौ. सीमा सैतवाल यांनी पुष्पगुच्छ देऊन केले.
याप्रसंगी सचिन भोईर, मितेश बुटाला, रिया पातकर, व पातकर, सैतवाल, बुटाला परिवार व मित्र परिवार या वेळी उपस्थित होते.
Tuesday, 6 November 2018
प्रभाकर भोईर यांनी बाल-भवनास एकवर्षभर शैक्षणिक व आरोग्य सेवा देऊन साजरा केला वाढदिवस
संभाजी ब्रिगेडचे कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष प्रभाकर भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी संपन्न
टिटवाळा - (जैनेंन्द्र सैतवाल)
सामाजिक व राजकीय क्षेत्रात नावाजलेले नाव म्हणजे संभाजी ब्रिगेड. या संभाजी ब्रिगेड चे कल्याण-डोंबिवली महानगर अध्यक्ष व मांडा-टिटवाळा येथील रहिवाशी असलेले प्रभाकर भोईर यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी त्यांच्या मित्रपरिवाराने मोठ्या उत्साहात साजरा केला.
सकाळी, घरातील जेष्टांचे व श्री क्षेत्र असलेल्या टिटवाळा सिद्धिविनायक महागणपती चे दर्शन व आशीर्वाद घेऊन प्रभाकर भोईर यांच्या मित्रांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमांचे आयोजन केले होते.
सकाळी महागणपती हॉस्पिटल येथे प्रभाकर भोईर यांनी रक्तदान केले. वाढदिवसानिमित्त रक्तदान केल्याचा खूप आनंद व समाधान वाटले, तसेच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असल्याचे भोईर यांनी या प्रसंगी सांगितले.
तद्नंतर दुपारी टिटवाळया जवळील गुरवली येथील राईट्स ऑफ वुमन संचालित आईची सावली या बाल-भवनातील मुला-मुलींना शैक्षणिक साहित्य, खाऊ व प्राथमिक उपचारासाठी मेडिकल बॉक्स ही दिला. वर्षभर बाल-भवनातील पाण्याची टाकी मोफत स्वच्छ करणार असल्याचे व येथील २२ मुला- मुलींचा वर्षभर शैक्षणिक व आरोग्य उपचाराची जबादारी प्रभाकर भोईर यांनी घेतल्याचे पत्र संचालिका दीपा गांगुर्डे यांना दिले. या व्यतिरिक्तही अजून काही मदत लागत असेल तर तुम्ही सांगा व मी ते करेल असे या प्रसंगी भोईर म्हणाले.
संध्याकाळी त्यांच्या ऑफिस मध्ये ऑफिस कर्मचाऱ्यानी केक कापून त्यांचा वाढदिवस साजरा केला. शेवटी सर्व मित्र परिवाराचे आभार त्यांनी व्यक्त केले.
कल्याण RTO च्या सौ. चित्रा पवार सेवानिवृत्त
कल्याण येथील प्रादेशिक परिवहन कार्यलयातील जेष्ठ लिपिक सौ. चित्रा विलास पवार सेवानिवृत्त.
कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल)
येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील जेष्ठ लिपिक सौ.चित्रा विलास पवार यांचा सेवा निवृत्तीचा सोहळा नुकताच येथील कार्यलयात सर्व वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी व प्रतिनिधी यांच्या सानिध्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्यांना वाजत-गाजत, बँड, फटाके वाजवून व आर.टी. ओ. च्या सरकारी व्हॅन मध्ये बसवून निरोप देण्यात आला.
सन१९८५ साली नोकरीत रुजू झालेल्या पवार मॅडम दि. २५/२/१९८५ रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे येथे कामावर रुजू झाल्यात. क्लार्क कम टायपिस्ट या पदावर त्या कार्यरत होत्या. साधारण १० वर्षे प्रादेशिक परिवहन कार्यालात काम केले. प्रथम आवक-जावक विभागाचे २ वर्ष काम केले. त्यांनी ट्रान्सपोर्ट विभागात २ वर्षे काम केले, नंतर टंकलेखनाचे काम १ वर्षे केले, त्यानंतर ५ वर्षे खटला विभागात काम केले. १९९५ मध्ये त्यांची उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात बदली झाली. साधारण १९९५ ते २००५ पर्यंत ट्रान्सपोर्ट विभागात काम केले, तसेच MSCIT चे प्रशिक्षण घेतले १९९६ ते १९९७ या कालावधीत ट्रान्सपोर्ट विभाग,आणि परवाना विभागाचे पर्वाने करण्याचे कामकाज ते पाहत होते. साधारण २० वर्षाने त्यांना सहायक रोखपाल ची पदोन्नती मिळाली. २००५ ते २०१० या कालावधी त्यांनी सहाय्यक रोखपाल म्हणून काम केले. त्या नंतर त्यांना मे २०१० ला वरिष्ठ लिपिक म्हणून पदोन्नती मिळाली. आणि त्यांना मुख्य रोखपलाचे काम देण्यात आले. २०१० -२०१२ पर्यंत मुख्य रोखपालाचे काम पाहिले, तसेच वाहनांना कर काढून देण्याचे काम पाहत होते. २०१२ -२०१५ या कालावधीत सर्व कमर्शियल वाहनांना नंबर देणे, कमर्शियल वाहनांचे परवाना देणे, महितीअधिकार, टॅक्स काढून देणे, मासिक अहवाल तयार करणे, डिझास्टर म्यानेजमेंट, रजिस्ट्रेशन, ग्रीनटॅक्स, टाईम बोउंड, नॅशनल परमिट, मॅक्सिमायजेशन, माहिती अधिकार इत्यादी अहवाल पाठवणे, तसेच आठवड्याची ,रेव्हेन्यू तयार करण्याचे चे काम त्या करत होत्या. शिवाय ऑडिटचे कामकाज करणे, टॅक्स एरियर्सची माहिती पाठवणे, सांख्यिकी स्टेटमेन्ट १-४२ टेबल्स भरून वर्षातून एकदा पाठवणे, कार्यक्रम अंदाज पत्रक वार्षिक अहवाल तयार करणे, इत्यादी कामे त्यांनी बघितली.त्या दरम्यान भानुदास देशपांडे , मुख्य लिपिक सेवा निवृत्त झाले होते, त्यांचा संपुर्ण कार्यभार त्यांना देण्यात आला होता. नंतर २०१५ मध्ये बदल्या करण्यात आल्या नंतर परवाना विभागाचे तसेच नम्बरिंग देणेचे काम काढुन दुसऱ्या वरीष्ठ लिपिकाना देण्यात आले,आणि होमरीजन ट्रान्सपोर्ट,आणि प्रोफेशनल टॅक्स काढणे,तसेच काही महिने इतर राज्यातून येणाऱ्या वाहनांचे रेकॉर्ड मेंटेन करणे, तसेच उरलेली सगळीच कामे सांभाळून त्या करीत होत्या. नंतर संगणकाचे कामकाज ऑक्टोम्बर २०१७ मध्ये सुरू झाले, आणि ऑनलाइन नंबर देणे, आर.सी.,फिटनेस देणेचे कामकाज आज पर्यंत त्या करत आल्यात. .२००६ मध्ये संगणकावर IMV, BMV पावत्या फडण्याचे काम सुरू झाले, त्यावेळी त्यांनाच MDL च्या पावत्या तयार करण्याचे काम करत आले, तसेच मॅन्युअल DD, CHQ. च्या पावत्या आणि संगणकावर नॉन ट्रान्सपोर्ट च्या पावत्या तयार करणे म्हणजे मॅन्युअल आणि कॉम्पुटर या दोन्ही प्रकारचे कामे एकटेच त्या करीत होत्या.
खारटमल साहेबांच्या वेळी, रास्ता सुरक्षा सप्ताहाचे कामकाज बघितले, संक्रांतीच्या वेळी रस्त्यावर उभे राहून वाहने थांबवून त्यांना गुलाबाचे फुल व तिळाचे लाडू वाटण्याचा उपक्रम राबविला. गुजराथी साहेबांच्या काळात नवीन रिक्षा परवान्यांचे कामकाज सुरू झाले असताना स्वतःचे कामकाज सांभाळून रिक्षा परवाना धारकांचे आलेली कागद पत्र तपासणी करणेची कामे केली.
त्यांच्या ट्रान्सपोर्ट विभागात वाहन धारकांना कर सम्बधी मागणी पत्रके पाठवणे, ना-वापर वाहनांना तपासणी करणे करता मोटार वाहन निरीक्षकांना याद्या तयार करून देणे, पत्र व्यवहार करणे, मोटार वाहन निरीक्षकांना कर न भरलेल्या वाहनांच्या याद्या कर वसुलीच्या कामासाठी तयार करून देणे, आणि आयत्यावेळी आलेली कामे पार पाडणे.
कॅरेज बाय रोड ऍक्ट २००५ नुसार व्यवसाय करणे सम्बधी लायसन्स देणे, ३/३ च्या केसेस, परिवहन आयुक्तांना कर माफी विषयी पत्र व्यवहार करणे,आर.आर.सी.तयार करून नोटीसा बजावणे, अशी अनेक विविध कामे पवार मॅडम यांनी केली, अशा या कर्तव्यदक्ष वरिष्ठ-जेष्ठ लिपिक महिला अधिकारी सौ चित्रा पवार यांना सेवानिवृत्तीचा निरोप देताना त्यांच्या समवेत असलेल्या महिला सहकारी कर्मचाऱ्याना अश्रू अनावर झाले. पण तरीही सर्व अधिकारी, कर्मचारी, प्रतिनिधी यांनी त्यांना वाजत-गाजत बँड, फटाके वाजऊन निरोप दिला.
Thursday, 1 November 2018
डॉक्टर च्या हलगर्जी पणा मुळे निष्पाप सृष्टी चा मृत्यू
कल्याण येथील डॉक्टर चा हलगर्जीपणामुळे
एका निष्पाप मुलीचा मृत्यू
पोलीस तक्रार घेत नसल्यामुळे आज कल्याण येथे कँडल मार्च
कल्याण - (जैनेंन्द्र सैतवाल )
येथील कोळसेवाडी चिंचपाडा विभागात राहणारे अभिजित सोनवणे यांची सहा वर्षांची मुलगी सृष्टी हिस डेंगू झाल्याने डॉ. नितीन कोकरे यांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाला. असा आरोप त्यांनी केला आहे. या विषयीची तक्रार कोळसेवाडी पोलीस स्टेशनला अभिजित सोनवणे गेले असता त्यांची तक्रार घेतली गेली नाही.
दिनांक ०६ ऑक्टोबर २०१८ रोजी सृष्टी ला ताप आला, तिच्या आईने तिला साई विनीत हॉस्पिटल, कल्याण (पूर्व) येथे उपचारासाठी घेऊन गेली. डॉ कोकरे यांनी औषधउपचार करून पुन्हा ५ दिवसानंतर यायला सांगितले. सृष्टी चा ताप उतरत नव्हता म्हणून दिनांक १० ऑक्टोबर २०१८ रोजी पुन्हा साई विनीत हॉस्पिटल मध्ये तिला उपचारासाठी तिची आई घेऊन गेली. डॉक्टरांनी डेंग्यू ची टेस्ट करायला सांगितली. त्याच दिवशी रात्री १० वाजता सृष्टी ला डेंग्यू आहे असे कळाले . साई विहान चे डॉक्टर यांनी सृष्टी ला हॉस्पिटल मध्ये ऍडमिट करायला सांगितले. सृष्टी च्या पालकांनी तात्काळ ते मान्य करून सृष्टी ला साई विहान हॉस्पिटल मध्ये ऍडमिट केले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारी १:०० वाजता सृष्टी चा ताप अतिशय वाढत गेला, सृष्टी ची आई स्टाफ ला विनंती करायला लागली कि कृपया डॉक्टरांना बोलावा तरी डॉक्टर आलेच नाही. दुपारी १:३० वाजता सृष्टी ला फिट आली. डॉक्टर येऊन नंतर तिला परस्पर रॉयल चिल्ड्रेन हॉस्पिटल, कल्याण (पूर्व) येथे पाठवले, तोपर्यंत सृष्टी बेशुद्ध झाली होती, रॉयल चिल्ड्रेन हॉस्पिटल मधून सहा तासा नंतर तिला मृत घोषित करण्यात आली. पालकांन वर दुःखाचा डोंगर कोसळला, अतिशय गोड असणारी सृष्टी एका क्षणात दिसेनासी झाली. पालकांच्या लक्षात आले कि सृष्टी ला डेंग्यू निदान झाल्यानंतर देखील साई विनीत च्या डॉक्टरांनी डेंग्यू साठी कोणतेही उपचार केले नाहीत, तिला ट्रीट करणाऱ्या नर्स प्रशिक्षित नव्हत्या. तरीही या ट्रिटमेंट चा खर्च दोन्ही हॉस्पिटल मिळून रूपये ४४,०००/- हजार सृष्टी च्या पालकांकडून उकळले.
पालकांनी सृष्टी च्या मृत्यू साठी साई विनीत हॉस्पिटल जबाबदार आहे अशी तक्रार दिनांक १५ ऑक्टोबर २०१८ रोजी कोळसेवाडी पोलीस स्टेशन येथे सृष्टी चे वडील अभिजित सोनावणे यांनी केली. पोलीस यांनी चौकशी करतो असे सांगत तक्रार लिहून घेण्यास नकार दिला. आज १५ दिवस उलटून गेले आहेत. कोळसेवाडी पोलीस स्टेशन यांनी तक्रार नोंदवलीच नाही, अभिजित सोनावणे यांच्या म्हणण्या नुसार पोलीस तक्रार नोंदवण्यास मुद्दाम चाल ढकल करत आहेत.
पोलिसांच्या या चालढकलीचा "डेमोक्रॅटिक युथ फेडेरेशन ऑफ इंडिया " (DYFI) तीव्र निषेध व्यक्त करत आहे. DYFI सोबतच या कँडल मार्च करीता, श्यामदादा गायकवाड यांचा आर पी आय सेक्युलर पक्ष, काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारिप पक्ष, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघ, तसेच अनेक पुरोगामी पक्ष आणि संघटना भाग घेत आहेत.
सृष्टी चा श्रद्धांजली पर कँडल मार्च दिनांक ०२ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता रविकिरण अपार्टमेंट, मॉडेल कॉलेज जावळ, चिंचपाडा रोड, कल्याण (पूर्व) येथून निघेल. हा मार्च पुढे कोळसेवाडी पोलीस स्टेशन विठ्ठलवाडी स्टेशन बाजूला संपून तिथे सृष्टी ला श्रद्धांजली वाहण्यात येईल.
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!
मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...
-
विरारच्या उत्कर्ष विद्यालयात दुमदुमला मराठी भाषेचा जागर !! विरार प्रतिनिधी/ पंकज चव्हाण 'भाषा हे संस्कृतीचे बलस्थान असतं...
-
भिवंडी तालुक्यातील केवणी (दिवे) खाडी किनाऱ्यावरून दररोज होते शेकडो हायवा डंपर मधून "हजारो ब्रास" रेतीची चोरटी वाहतूक, कारवाई फक्त ...
-
कल्याणमध्ये सुप्रिया सुळे आणि शशिकांत शिंदे यांचे राष्ट्रवादीकडून उत्साहात स्वागत !! *कल्याण :* कांबा, कल्याण येथे नियोजित महिला...