Wednesday, 2 December 2020

रायगड अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या आराखड्याबाबत पालकमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न !

रायगड अलिबाग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीच्या आराखड्याबाबत पालकमंत्री तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न !
   
 
        बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : अलिबाग येथे स्थापन होणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय बांधकामाचा आराखडा व अंदाजपत्रक तयार करण्याच्या अनुषंगाने राज्यमंत्री तथा रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु. अदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली.
          यावेळी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे संचालक डॉ.तात्याराव लहाने, ‘आरसीएफ’च्या महाव्यवस्थापक श्रीमती सुनीता शुक्ला', रायगड जिल्ह्याचे अप्पर जिल्हाधिकारी अमोल यादव, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.गिरीश ठाकूर, सा.बां.कोकण विभागाचे मुख्य अभियंता श्री.इंगोले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता राहुल मोरे व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
       यावेळी राज्यमंत्री कु.तटकरे यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आवश्यक सोयी-सुविधांचा विचार करून वास्तू मांडणी आराखडा तयार करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.
    संचालक डॉ.लहाने यांनी महाविद्यालय उभारणीच्या दृष्टीने प्रत्यक्ष जागेचा पाहणी दौरा करणार असल्याचे सांगितले.

गणेश हिरवे उभयतांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !

गणेश हिरवे उभयतांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात !


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर) :
                  कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता. शिक्षिका  योगिता हिरवे व शिक्षक गणेश हिरवे जोगेश्वरी पूर्व यांनी आपल्या लग्न वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना साखर, चहापावडर, साबण, तेल व मास्क, व्हँसलीन डबा अन्य आवश्यक साहित्य  भेट म्हणून दिले. त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात यापुर्वीही दिला आहे.आज दि.२ डिसेंबर २०२० रोजी लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल/मदिना मस्जिद येथे गरजूंना देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. योगिता हिरवे,गणेश हिरवे या उभयतांनी आपल्या लग्न वाढदिवसानिमित जेष्ठ नागरिकांना मदत देण्याच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे जेष्ठ नागरिकांकडून आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले. 

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वृक्षारोपणातून कल्याण वनविभागाने पुन्हा फुलवली वरप येथे वनराई !

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या वृक्षारोपणातून कल्याण वनविभागाने पुन्हा फुलवली वरप येथे वनराई !


कल्याण (संजय कांबळे) : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, पालकमंत्री एकनाथ शिंदे, प्रसिद्ध निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई यांच्या हस्ते कल्याण तालुक्यातील वरप येथील वनजमीनीवर वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतू यांनतर काहीच दिवसांनी येथील झाडे काही समाजकंटकांनी जाळून टाकली होती. त्यामुळे कल्याण वनविभागावर टिकेची झोड उठवली गेली होती. परंतु याला न डगमगता मोठ्या जिद्दीने कल्याण वनविभागाने वरप येथील सुमारे १५ हेक्टर क्षेत्रात वनराई फुलवली असून यामुळे परिसरात समाधान व्यक्त केले जात आहे.
कल्याण वनविभागाचे हद्दीत दिवसेंदिवस अतिक्रमणे वाढत आहेत. काही भूमाफियांनी राजकीय पुढाऱ्यांच्या आशिर्वादाने ही अतिक्रमणे केली होती. वनविभागाचे काही कर्मचारी यामध्ये सामिल असल्याने भूमाफियांना अधिक बळ मिळत होते. हे कुठेतरी थांबायला हवे म्हणून वरप येथील राधा स्वामी संत्सग चे मागे असलेल्या वनजमीनीवर पॅल्टेशन करुन माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि वनमंत्री सुधीर फडके, पालकमंत्री एकनाथ शिंदे, निर्माते व दिग्दर्शक सुभाष घई, यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले होते. परंतू यानंतर काही दिवसांनी येथील काही झाडे अज्ञात समाजकंटकांनी झाळली होती. त्यामुळे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी कल्पना वाघिरे यांच्या वर टिकेची झोड उठवली होती. त्यांच्या वर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यांनतर त्यांची बदली देखील करण्यात आली होती.
परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांना खरी परिस्थिती समजली व त्यांना पुन्हा कल्याण येथेच पाठविण्यात आले. त्यांनी हजर होताच प्रथम वरप येथील वनजमीनीवर वनराई फुलवली. संपूर्ण जागे भोवती तारेचे कुंफन  लावले यामुळे मोकाट जनावरांपासून झाडांचे रक्षण होऊन आज हा सुमारे १५ हेक्टर चे क्षेत्र हिरवेगार झाले आहे. टेकडिवर पाण्याची टाकी बसवून पाण्याची सोय केल्याने बारमाही झाडे हिरवीगार असतात यामुळे येथील वातावरण भरपूर आॅक्शिजनयुक्त व आल्हाददायक आहे.


याशिवाय उंबार्णी येथे २१अ येथील ८ हेक्टर वनजमीनीवरील अतिक्रमण हटवून पॅल्टेंशन करून साडेतीन हेक्टर वर आयन, खैर, साग, शिताफळ, बांबू, बहिवा, मोह, काजू, कांचन, आदी झाडे लावली आहेत गुरवली येथील गवत काढून झाडांना वाढीसाठी पोषक वातावरण तयार करण्यात येत आहे. तसेच रेवती येथे दे अंत्यत सुंदर पॅल्टेंशन करुन वृक्षलागवड करण्यात आली आहे. त्यामुळे कल्याण तालुक्यातील नैसर्गिक वातावरण निर्माण होण्यास मदत झाली आहे. भविष्यात उन्हाळ्यात झाडांना जगविण्यासाठी टॅंकरने पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे कल्याण वनपरिक्षेत्र अधिकारी श्रीमती कल्पना वाघिरे यांनी सांगितले. विशेष म्हणजे आजच्या कोरोनोच्या वाढत्या काळात नैसर्गिक आॅक्शिजन केवळ वन संवर्धनातूनच मिळू शकतो.

Tuesday, 1 December 2020

पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते माणगांव उपजिल्हा रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे उदघाटन !

पालकमंत्री अदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते माणगांव उपजिल्हा रूग्णालयातील अत्याधुनिक आरोग्य सुविधांचे उदघाटन !


      बोरघर / माणगांव (विश्वास गायकवाड) : रायगड जिल्ह्याच्या माणगाव तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय येथे पालकमंत्री कु.आदिती तटकरे व आमदार भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते पोर्टेबल एक्स-रे मशीन, कोविड पूर्व तपासणी केंद्र व फिरता दवाखाना असलेली अत्याधुनिक व  सर्व प्रकारच्या आरोग्य सोयी-सुविधांनी सज्ज रुग्णवाहिका, अत्यंत प्रगत अत्याधुनिक ईसीजी मशिन चे उद्घाटन आज करण्यात आले. या अत्याधुनिक आरोग्य सोयी-सुविधांचा माणगावकरांना निश्चितच लाभ होईल, कोविड संशयित रुग्ण शोध मोहिमेस मोठा हातभार लागेल व इतर क्षयरोग, न्यूमोनियासदृश्य रुग्ण शोधण्यास देखील मदत होईल, असे प्रतिपादन याप्रसंगी पालकमंत्री कु.आदिती तटकरे यांनी केले.
   यावेळी माणगाव नगराध्यक्षा योगिता चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.सुहास माने, वैद्यकीय अधीक्षक डॉ.प्रदीप इंगोले, प्रांताधिकारी प्रशाली दिघावकर, तहसिलदार ललिता बाबर व अन्य अधिकारी कर्मचारी, पदाधिकारी उपस्थित होते.

अनाधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या विरोधात कल्याण तहसीलदारांची धडक मोहीम, अनेक गाड्यांवर धाडी, लाखोंचा दंड ?

अनाधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या विरोधात कल्याण तहसीलदारांची धडक मोहीम, अनेक गाड्यांवर धाडी, लाखोंचा दंड ? 




कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुका हद्दीत अनाधिकृत पणे गौण खनिजांची वाहतूक करणे, अतिरिक्त माल भरणे, शासनाचा लाखो चा महसूल बुडवून चोरटी वाहतूक करणाऱ्या विरोधात कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी विशेष मोहीम उघडली असून आतापर्यंत अशी वाहतूक करणारे अनेक ट्रक वर धाडी टाकून त्यांना खोंचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले आहेत.
कल्याण तालुक्यात कांबा म्हारळ, टिटवाळा, या परिसरात मोठय़ा प्रमाणात दगड खाणी आहेत. अनेकांनजवळ शासनाची "राॅयल्टी" नसल्याचे कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी शहाड, टिटवाळा, कल्याण, गोवेली, चिखनघर आदी तलाठी व मंडल आधिकारी यांची पथके तयार करून पहाटे, कांबा गावाजवळील टाटा पॉवर हाऊस, वरप येथील सिमा रिसाॅट येथे अचानक धाडी टाकून म्हारळ, अंबरनाथ, चिखनघर, टिटवाळा, डोंबिवली, आणि खडकपाडा येथील वाहन मालकांचे ७ ट्रक पकडले. यामध्ये खडी, दगडपावडर, होती एकूण २३,५ब्रास माल जप्त करुन त्यांचेवर सुमारे १३ लाख १८ हजार ५६ रुपये इतका दंड ठोठावण्यात आला आहे.
याशिवाय अशी अनाधिकृत गौण खनिजांची वाहतूक करणाऱ्या विरोधात मुळ दंडाच्या ५पट दंड आकारण्यात आला आहे. तसेच एकदा पकडण्यात आलेले वाहन पुन्हा सापडले तर पाचपट दंड तर आकारला जाईल च पण अशा वाहनांचा लिलाव देखील करण्यात येईल असा इशारा कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी दिला आहे. त्यामुळे सध्या गौण खनिजांची अनाधिकृत व अतिरिक्त वाहतूक करणाऱ्या चे काही खरे नाही असेच म्हणावे लागेल. तसेच जे नियमानुसार वाहतूक करतात त्यांना आमच्या पथकाकडून कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही असे ही त्यांनी सांगितले.

उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रवीण भोईर बिनविरोध, निवड होताच कामांना सुरुवात !

उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रवीण भोईर बिनविरोध, निवड होताच कामांना सुरुवात !


कल्याण (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी प्रवीण भोईर यांची आज बिनविरोध निवड करण्यात आली. निवड होताच त्यांनी विविध प्रकारच्या विकास कामांना प्राधान्य दिले असून मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
कल्याण आणि शहापूर तालुक्याच्या बाॅर्डरवर उशीद हे गाव वसले आहे. शेतीप्रधान म्हणून ओळखले जाणारे हे गावाच्या शेजारुन मुंबई नागपूर समृद्धी महामार्गामुळे प्रसिद्धीच्या झोतात आले आहे. 7सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतीचा एक ते सव्वा वर्षाचा कालावधी राहिला असताना सरपंच पदाची निवडणूक जाहीर झाली होती. सर्व सदस्यांनी एकत्र येऊन सरपंच पद बिनविरोध द्यायचे निश्चित केले. त्यामुळे अपेक्षेप्रमाणे सरपंच पदी तरुणतडफदार सदस्य प्रवीण भोईर यांची बिनविरोध निवड केली. सकाळी अकरा वाजता उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ देण्यात आली होती. विहित मुदतीत सरपंच पदासाठी कोणाचाही इतरांचा अर्ज सादर न झाल्याने दुपारी दोन वाजता निवडणूक निर्णय अधिकारी श्रीसंत यांनी प्रवीण भोईर यांची उशीद ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. यावेळी ग्रामसेवक विलास मिरकुटे नवनियुक्त सरपंचांचे स्वागत केले.


यावेळी शिवसेनेचे माजी तालुकाप्रमुख विश्वनाथ जाधव यांनी मार्गदर्शन केले तर या प्रसंगी कल्याण पंचायत समितीचे उपसभापती रमेश बांगर, पत्रकार संजय कांबळे, दिपक भोईर, काकडपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच प्रवीण चौधरी, ग्रामपंचायत सदस्या सुरेखा भोईर, अश्विनी भोईर, कमळाबाई विशे, रंजना भोईर, दिनेश भोईर, महिला बचत गट, ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी गावातील रस्ता व स्मशानभूमी सुशोभीकरण या कामांचे भूमिपूजन करण्यात आले. आपण गावाच्या विकासासाठी प्रयत्न करणार असल्याचे सरपंच प्रवीण भोईर यांनी सांगितले.

महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० ; परिपूर्णतेचे प्रतिबिंब', महाअंतिम स्पर्धेत "मेधा जोशी" प्रथम !

महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० ; परिपूर्णतेचे प्रतिबिंब', महाअंतिम स्पर्धेत "मेधा जोशी" प्रथम !


प्रकाश संकपाळ : सातारा - येथील महाबळेश्वरमध्ये महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० परिपूर्णतेचे प्रतिबिंब' ही स्पर्धा कुसुमवत्सल फाउंडेशन व सहारा प्रोडक्शन हाऊस च्या सहकार्याने 'महाराष्ट्राची सौभाग्यवती २०२० या परिपूर्ण प्रतिबिंब असलेल्या एकापेक्षा एक, सरस ठरलेल्या व अखेरच्या श्वासापर्यंत उत्कंठा वाढविणाऱ्या या महाअंतिम स्पर्धेत मेधा जोशी, गौरी पांडे, अनामिका ओव्हाळ यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला. अंतिम फेरीतील ३० स्पर्धकांमधून दहा विजेत्यांची ही निवड करण्यात आली, त्यामध्ये स्मिता जाधव, वर्षा शिंदे, सोनल कदम, स्वीटी दर्डा, मेधा जोशी, गौरी पांडे, अनामिका ओव्हाळ, जागृती काणेकर, विद्या कोतवाल, सारिखा शेठ यांचा समावेश होता.


या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा महाबळेश्वर येथील योगदा रिसॉर्टमध्ये आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धेत परदेशातील मलेशिया व लंडन या व्यतिरिक्त महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली,सातारा,बारामती, नागपूर, नांदेड,लातूर,यवतमाळ, गडचिरोली, सोलापूर,धुळे जळगाव,नाशिक अशा अनेक जिल्ह्यातून विवाहित सौंदर्यवतींनी सहभाग घेतला होता.या स्पर्धेत मॉडेल्सना प्रश्नोत्तरे, कौशल्य, रॅम्पवॉक त्याचबरोबर स्विमिंग पूल राउडअप असे विविध प्रकारचे राऊंडस घेण्यात आले होते. 

एकविसाव्या शतकातील स्त्रीचे सशक्त रूप जगासमोर येण्यासाठी आणि आजच्या युगातील स्त्रीला मत मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने या आगळ्यावेगळ्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या उत्कृष्ट स्पर्धेची संकल्पना महान समाजसेविका व फॉउंडेशन च्या संस्थापिका अध्यक्षा वैशालीताई  पाटील, सहारा प्रोडक्शन हाऊसचे अध्यक्ष डॉ. भवाळकर, रुणवाल ग्रुपचे प्रदीप गायकवाड, हरिश्चंद्र दांगट, कल्याण राव, अवताडे, मिलिंद पानसरे, देसाई  मॅडम, व्ही. दिलीप, सामाजिक कार्यकर्त्या भारती चंगेडिया, संशोधन आणि विकास प्रमुख शर्वरी डोंबे,डॉ.अपूर्वा अहिरराव, वैशाली चिपलकट्टी,रणरागिनी बाउन्सर ग्रुपच्या  अध्यक्ष  दीपा परब कुसुमवत्सल्य संपूर्ण टीम उपस्थित होते.

या महाअंतिम स्पर्धेसाठी ज्युरी म्हणून 'गेट सेट गो'च्या प्रमुख श्रध्दा भवाळकर, मिडाज टच'च्या अंजली जोशी, पूनम परदेशी, योगिराज कामठे, प्रख्यात गृमिंग एक्सपर्टच्या देवश्री चक्रवर्ती यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन संदीप पाटील यांनी  केले.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...