Sunday, 2 May 2021

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित तर ६६९ रुग्णांचा मृत्यू!

राज्यात दिवसभरात ५६ हजार ६४७ नवीन कोरोनाबाधित तर ६६९ रुग्णांचा मृत्यू!


मुंबई : राज्यात करोना संसर्ग अद्याप वाढतच आहे. दररोज मोठ्या संख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत. शइवाय रूग्णांच्या मृत्यू संख्येतही वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर लॉकडाउनचा कालावधी देखील १५ मे पर्यंत वाढवला गेला आहे. दरम्यान, आज दिवसभरात राज्यात ५६ हजार ६४७ नवीन करोनाबाधित आढळून आले असून, ६६९ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाल आहे. राज्यातील मृत्यूदर १.४९ टक्के एवढा आहे.

तर, आज ५१ हजार ३५६ रुग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. तर, राज्यात आजपर्यंत एकूण ३९,८१,६५८ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट ) ८४.३१ टक्के एवढे झाले आहे.

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २,७६,५२,७५८ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ४७,२२,४०१ (१७.०८ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३९,९६,९४६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २७,७३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज रोजी एकूण ६,६८,३५३ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

लसीकरणासाठी पोलिसांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे !! "सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील" यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं.

लसीकरणासाठी पोलिसांच्या मुलांना प्राधान्य देण्यात यावे !!

"सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील" यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं.


*केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. करणार याचा पाठपुरावा - संदिप कसालकर* 

मुंबई, विशेष प्रतिनिधी : जोगेश्वरी व मेघवाडी विभागाच्या सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील या लसीकरणासाठी आपल्या दोन मुलांना कूपर रुग्णालयात घेऊन गेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी कसलीही दाद न देता सुजाता पाटील यांना परत पाठवल्याची घटना समोर आली आहे.
या घटनेमुळे पोलीस दलात निराशा झाली असून पोलिसांच्या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य देण्यात यावे अशी विनंती सहायक पोलिस आयुक्त सुजाता पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना केली आहे. 

सुजाता पाटील यांनी त्यांच्या पात्रता म्हटलं आहे की, "महाराष्ट्र शासन व सन्माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य,उद्धवजी ठाकरे सर. जयहिंद सर, माझी आदरणीय महोदय आपणास विनंती आहे, 18 ते 44, वयोगटातील व्यक्तींना आज पासून कोरोना लसीकरण देणे चालू झालेले आहे. पोलीस अधिकारी व कर्मचारी हे अहोरात्र ड्युटी करून रोड वर काम करत आहेत. या कोरोना महामारीमध्ये आमचे महाराष्ट्र पोलीस दलातील बरेच पोलीस बांधव मृत्युमुखी पडलेले आहेत. श्रद्धांजल्या वाहत वाहत डोळ्यातील पाणी आटून गेलेल आहे., कधी कोणाला कोरोना प्रार्दुभाव होईल याची गॅरंटी नाही. आपणास हात जोडून विनंती आहे, पोलिसांच्या मुलांना कोरोना प्रादुर्भावाचा जास्त धोका आहे. हाय रिस्क मध्ये आमचे कुटुंबीय वावरत आहेत. तरी, पोलिसांच्या मुलांना प्राधान्याने कोरोना लसीकरण होणेबाबत त्वरित निर्णय व्हावा. आज स्वतः मी माझ्या 18 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील दोन मुलांना घेऊन जुहू मुंबई येथील कूपर रुग्णालयात गेली असता मला, येथील वैद्यकीय अधिकारी यांनी जुमानले नाही. रजिस्ट्रेशन कोटा पुरा झालेला आहे, तुम्हाला वरून कोणाचा तरी फोन आणावा लागेल म्हणून सांगितले परंतु वरून कोणाचा फोन आणला पाहिजे त्यांचे नाव सांगा अशी विचारणा केली असता त्या वैद्यकीय अधिकारी यांनी कोणाचा नंबर नाव देण्यास नकार दिला. मी स्वतः सहाय्यक पोलिस आयुक्त म्हणून मुंबई मध्ये काम करत असताना युनिफॉर्म वर माझ्या दोन मुलांना घेऊन नोंदणी करून वॅक्सीन देण्यासाठी गेली असता तेथील वैद्यकीय अधिकारी यांनी काहीही ऐकून न घेता दाद दिली नाही, मुलांना वॅक्सीन न देता नाराज होऊन घरी परत घेऊन आले. माझ्या मुलांचे चेहरे केविलवाणे झाले. लॉकडाऊन घरी बसून आराम करणारी लोक लसीकरण घेऊन तंदुरुस्त आणि फ्रंट वॉरियर यांची मुलं लसीकरणापासून वंचित, आज प्राप्त माहितीनुसार आठ ते दहा दिवसा पर्यंतची नोंदणी कोटा पुरा झालेला आहे. आमच्या मुलांना काय सुरक्षा आहे ? या आठ ते दहा दिवसांमध्ये कोरोना सुरक्षिततेची काय गॅरंटी मिळू शकते ? महाराष्ट्र पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी व कर्मचारी हा या कोरोना महामारीत युनिफॉर्ममध्ये कर्तव्य करत असताना, आतून आक्रंदत असतो, तो नोकरी व कुटुंब या कचाट्यात पिळवटून निघालेला आहे, त्यांचे मनोधैर्य, आत्मबल वाढवण्यासाठी आपण सन्माननिय विद्यमान  मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी ठाकरे सर, आमची तसेच आमच्या कुटुंबीयांची  दखल घ्यावी. हात जोडून विनंती."
मुख्यमंत्र्यांनी हा विषय गांभीर्याने घेऊन तात्काळ यावर योग्य ते पाऊल उचलून पोलिसांच्या मुलांना लसीकरणासाठी प्राधान्य द्यावे असे केंद्रीय पत्रकार संघ, सी.पी.जे.ए. चे राष्ट्रीय अध्यक्ष संदिप कसालकर यांनी सांगितले आहे.

नवी मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयात आय.सी.यु मध्ये सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवा : शोभाताई भोईर

नवी मुंबई परिसरातील कोविड रुग्णालयात आय.सी.यु मध्ये सी.सी. टी.व्ही.कॅमेरे बसवा :  शोभाताई भोईर


नवी मुंबई - येथील परिसरातील सर्व कोव्हीड रुग्णालयात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावेत अशी मागणी दुर्गा फाऊंडेशन च्या वतीने नवी मुंबई आयुक्त अभिजीत बांगर यांच्याकडे करण्यात आली आहे.


नवीमुबंई शहरात कोव्हीड रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातील शेकडो रुग्ण आय सी यु व व्हेटिलेटरवर उपचार घेत आहेत. रुग्ण आय सी यु त पोचल्यानंतर त्या रुग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला पाहता येत नाही.रुग्णांचे नातेवाईक आय सी यु कक्षाच्या बाहेर दिवस-रात्र काळजीत बसलेले असतात.बऱ्याचदा आय सी यु दाखल झालेले रुग्ण हे कालांतराने मृत पावत असल्याने नातेवाईकांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण होत आहे.डॉक्टरांकडून आपल्या रुग्णावर उपचार होताना नातेवाईकांना पहाता यावे व आपल्या रुगणाचे नक्की काय झाले यासाठी आयसीयूमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आवश्यक असल्याचे दुर्गा फाउंडेशन ने केलेल्या सर्व्हेत दिसून आले आहे

कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णाच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन देखील घेता येत नाही हे अत्यंत वेदनादायी व दुःखद घटना आहे. त्यामुळे निदान आय.सी .यु कक्षात सी सी टी व्ही कॅमेरे लावुन तो डीस्पले रुग्णालयातील आवारात लावल्यास नातेवाईकांनाआपल्या रुग्णांवर लक्ष ठेवता येईल,जीवाला लागलेला घोर कमी होईल आणि नागरिकांना दिलासा मिळेल अशी भावना दुर्गा फाऊंडेशनची असून यासाठी नवी मुंबई महानगरपालिका व पनवेल आयुक्त यांना निवेदन देण्यात आले आहे.

यावेळी दुर्गा फाऊंडेशनच्या संस्थापिका अध्यक्षा सौ शोभाताई भोईर,नवी मुंबई अध्यक्षा सौ हेमलता खंदारे, नवी मुंबई सचिव सौ.रसिका म्हाञे व संघटक सौ प्रिती जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होत्या .

Saturday, 1 May 2021

महाराष्ट्र दिनानिमित जय महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार संघटनेची बांद्रा येथे स्थापना ! राज्याचे 'परिवहन मंत्री अँड. अनिल परब' यांच्या मार्गदर्शनाने 'माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर', 'संस्थापक कुणाल सरमळकर', 'शाखाप्रमुख संदीप शिवलकर' यांचे सलमान कुरेशी यांना लाभले मार्गदर्शन

महाराष्ट्र दिनानिमित जय महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार संघटनेची बांद्रा येथे स्थापना !

राज्याचे 'परिवहन मंत्री अँड. अनिल परब'  यांच्या मार्गदर्शनाने 'माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर', 'संस्थापक कुणाल सरमळकर', 'शाखाप्रमुख संदीप शिवलकर' यांचे सलमान कुरेशी यांना लाभले मार्गदर्शन 


मुंबई, (शांत्ताराम गुडेकर /समीर खाडिलकर) :

        आज १ मे महाराष्ट्र दिन ज्याप्रमाणे आपल्या देशाला १५ ऑगस्ट १९४७ ला स्वतंत्र मिळाले त्याप्रमाणे महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा हा १ मे १९६० रोजी प्राप्त झाला. आणि तेव्हापासून या दिवसाला महाराष्ट्र दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. आणि योगायोग म्हणजे महाराष्ट्र दिनाच्या दिवशीच कामगार दिन (Labour Day) सुध्दा असतो आणि तो सुध्दा याच दिवशी साजरा करण्यात येतो. १ मे हा जगातील कामगारांच्या निर्धाराचा व ऐक्याचा दिवस पाळला जातो. १ मे जगातील कामगारांसाठी मोठा स्फूर्तिदायक दिवस आहे. या दिवशी शिकोगो मधील कामगारांनी दिलेल्या आहुती मुळेच जगातील कामगारांना त्यांचे न्याय हक्क प्राप्त झाले आहेत. आज खाजगीकरण व अन्य आर्थिक धोरणामुळे कामगार शक्तीला दडपण्याचा घाट मालक वर्गाबरोबर देशयातील सत्याधिश वर्ग करीत आहे.जागतिकीकरण, जागतिक मंदी, स्वेच्छा निवृत्ती कामगार कपात, इ. मुळे कामगार देशोधडीला लागला आहे. त्याचा वाली कोणीही नाही. अशी दयनीय अवस्था कामगारांमध्ये निर्माण झाली आहे. कामगारांसाठी नवा कंत्राटी कायदा आणला आहे. ठरकेदारी कायदेशीर करण्यात असली आहे. त्यामुळे लाखो कामगारांचा उदर निर्वाह, राहणी मानाचा प्रश्न उभा आहे.काम करून घ्यायचे व नंतर त्यांना कामावरून कमी करायचे असा शॉर्टकट मालक वर्गाला सापडला आहे. कामगार दिनी त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक व्हावी अशी अपेक्षा.महाष्ट्रामध्ये हा दिवस गणतंत्र दिवस किवां स्वतंत्रता दिवसा सारखा झेंडा फडकावून साजरा केला जातो त्या वेळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित होत असतात. त्या मध्ये महाराष्ट्रावर भाषण, निबंध, कविता या सारख्या प्रतियोगिताही होत असतात. मात्र सद्यस्थितीत असलेल्या लाँकडाऊनचे सर्व नियम पाळत मुंबईतील युवकांना रोजगार मिळावा यासाठी बांद्रा येथे सलमान कुरेशी यांनी मात्र राज्याचे परिवहन मंत्री अँड. अनिल परब  यांच्या मार्गदर्शनाने माजी महापौर प्रि. विश्वनाथ महाडेश्वर, संस्थापक कुणाल सरमळकर, शाखाप्रमुख संदीप शिवलकर यांच्या सहकार्याने जय महाराष्ट्र माथाडी ट्रान्स्पोर्ट आणि जनरल कामगार संघटनेची स्थापना आज महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमिताने संस्थापक कुणाल सरमळकर यांच्या शुभहस्ते केली.युवकांना रोजगार मिळावा या उद्देशाने या संघटनेची स्थापना करण्यात आली असल्याचे मत सलमान कुरेशी यांनी बोलताना व्यक्त केले.

म्हसळा पंचायत समिती शिक्षणसेवकांच्या जीवावर उठली का ? 'म्हसळा शिक्षण सेवकांचा सवाल'

म्हसळा पंचायत समिती शिक्षणसेवकांच्या जीवावर उठली का ? 'म्हसळा शिक्षण सेवकांचा सवाल'


     बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : शिक्षणसेवकांची कोरोना कामगिरीवर नियुक्ती करण्यात येऊ नये. असे विषयाचे दि. २६/०४/२०२१ रोजी मान. तहसीलदार साहेब म्हसळा, गटविकास अधिकारी, गट शिक्षणाधिकारी साहेब पंचायत समिती म्हसळा यांना निवेदन देऊन सुद्धा  पंचायत समितीने सदर निवेदनाची दखल न घेता तालुक्यातील शिक्षणसेवक/ सहायक शिक्षक परिविक्षाधीन यांची शिक्षणसेवक नव्हे तर चक्क नावापुढे प्राथमिक शिक्षक म्हणून फसवणूक  करूनच कोरोनाकामगिरीवर तालुक्यातील सर्व शिक्षण सेवकांची नियुक्ती केलेली आहे. महाराष्ट्र शासनाने आधीच शिक्षणसेवक योजना निर्माण करून ६००० मानधनावर शिक्षणसेवकांची आर्थिक पिळवणूक केली आहे. शिक्षणसेवक कालावधीत ६००० मानधनाव्यतिरिक्त कायम स्वरुपी शिक्षकांसारखा कुठल्याही शासकीय लाभ मिळत नाही. मेडिकल रजा, मेडिकल बिल, कर्ज, शासकीय रुग्णालयातील मोफत उपचार, प्रोत्साहन भत्ता, अग्रिम यासारखा कुठलाही शासकीय लाभ शिक्षणसेवकांना मिळत नाही. बऱ्याच जिल्ह्यात शिक्षणसेवकांचा कोरोना कामगिरीवर असताना मृत्यू झाल्याने शासनाकडून किंवा स्थानिक प्रशासनाकडून कुठलीही आर्थिक मदत त्यांच्या कुटुंबाला मिळालेली नाही. 
       तरी देखील म्हसळा पंचायत समितीने तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकांची नियुक्ती केली. त्यामुळे एखाद्या शिक्षणसेवकाच्या जीवितास धोका उद्भवल्यास पर्यायी त्याचा मृत्यू झाल्यास कायदेशीररीत्या स्थानिक प्रशासन व संबंधित अधिकारी वर्ग, म्हसळा पंचायत समिती प्रशासन आणि तहसीलदार साहेब संबंधित मृत शिक्षणसेवकांच्या परिवारास ५० लाख रु. भरपाई आणि अनुकंपा तत्वावर परिवारातील सदस्याला एक नौकरी देण्यास बाध्य राहत असेल तरच शिक्षणसेवक कोरोना कामे करण्यास तयार राहतील. अन्यथा तालुक्यातील सर्व शिक्षणसेवकांचा कोरोना कामावर बहिष्कार आहे.

खरीप हंगामात धानाची पेरणी बीजप्रक्रिया करूनच करा - कृषी विभाग माणगाव

खरीप हंगामात धानाची पेरणी बीजप्रक्रिया करूनच करा - कृषी विभाग माणगाव 


       बोरघर / माणगांव, (विश्वास गायकवाड) : चालू वर्षी अर्थात सन २०२१-२२मध्ये  कृषी विभागा मार्फत खरीप हंगाम पूर्व बीज प्रक्रिया मोहीम राबविण्यात येत आहे.  कृषी उत्पादन वाढीमध्ये  बीज प्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. जमिनीतून व बियाणे द्वारे पसरणारे रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी करून पिकांची जोमदार वाढ होण्यासाठी बीज प्रक्रिया कमी खर्चाचे अत्यंत प्रभावी साधन आहे. या दृष्टीने खरीप  हंगामामध्ये जास्तीत जास्त क्षेत्रावर बिजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी करण्याचे दृष्टीने मोहीम स्वरूपात माहे मे महिन्या मध्ये राबविण्यात येणार असल्याचे मा. श्री आर.डी.पवार तालुका कृषी अधिकारी माणगाव यांनी सांगितले. तालुक्यांमध्ये बीज प्रक्रिया मोहीम लोकसहभागातून विनाअनुदान तत्त्वावर राबविण्याचे नियोजित आहे. बियाणे बदल कमी असलेला भात पिकामध्ये शेतकऱ्यांकडील स्वतःचे बियाणे वापराचे प्रमाण जास्त आहे, अशा बियाण्यावर जमिनीतून व बियाणे द्वारे होणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होतो, त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीक संरक्षणावरील खर्चामुळे पिकाचे उत्पादन खर्चात वाढ होते व पर्यायाने उत्पादन घटते. त्याकरीता बीज प्रक्रिया मोहिमेअंतर्गत अशा शेतकऱ्यांना स्वतःकडील किंवा घरगुती वापरात येणाऱ्या बियाण्यास बीजप्रक्रिया करण्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. 
      भात बियाण्यास बीजप्रक्रिया  तीन प्रकारे केली जाते : 
१) मिठाच्या पाण्याची बीज प्रक्रिया - या बीजप्रक्रिया मध्ये १० लिटर पाण्यात ३०० ग्रॅम मीठ विरघळून घ्यावे व त्यामध्ये भात बियाणे ओतावे व चांगले ढवळून घ्यावे नंतर द्रावण स्थिर होऊन द्यावे पोकळ व रोगाने हलके झालेले तरंगणारे बियाणे अलगद वरचेवर काढून घ्यावे तसेच तळाशी राहिलेले वजनदार व निरोगी बियाणे बाहेर काढून ते दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुऊन सावलीत चोवीस तास वाळवावे व त्यानंतर रोग प्रतिबंधक उपाय म्हणून बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करावी.  
२) बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया मुळे बियाण्यात राहणाऱ्या व तसेच उगवल्यानंतर पिकास अपायकारक असणाऱ्या बुरशीचा नायनाट करण्यासाठी बीजप्रक्रिया करतात, यामध्ये थायरम, कॅप्टन, कार्बनडिझम, यापैकी कोणतेही एक बुरशीनाशक २.५ ग्रॅम या प्रमाणात १ किलो बियाण्यास पेरणीपूर्वी चोळावे.  
३) जिवाणू खताची बीजप्रक्रिया - बियाणे रुजल्या पासून पिकाच्या पुढील वाढीसाठी आवश्यक असलेले नत्र व स्फुरद सहज उपलब्ध व्हावे म्हणून जिवाणू खताची बीजप्रक्रिया केली जाते यामध्ये १) पी एस बी (स्फुरद विरघळणारे जिवाणू) हे जिवाणू जमिनीतील स्फुरद विरघळणारे पिकास उपलब्ध करून देतात, याचे वापराचे प्रमाण २५० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे.
   २) ऑझटोबॅक्टर नत्र स्थिरीकरण करणारे जिवाणू हे जिवाणू हवेतील नत्र शोषून घेऊन जमिनीत स्थिर करून पिकास उपलब्ध करून देतात वापराचे प्रमाण २०० ग्रॅम प्रति १० किलो बियाणे. 
    वरील प्रमाणे खरीप हंगामात सर्व शेतकऱ्यांनी धानाची बीज प्रक्रिया नक्की करावी. खरीप हंगामा व इतर माहितीसाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय माणगाव, मंडळ कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक व कृषी सहाय्यक यांचे समवेत संपर्क करावे असे आवाहन कृषि विभाग माणगाव यांचे मार्फत करण्यात आले आहे.

बातमी च्या दणक्यानंतर आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींना आली जाग, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी !!

बातमी च्या दणक्यानंतर आमदारांसह इतर लोकप्रतिनिधींना आली जाग, लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी !!


कल्याण, (संजय कांबळे) : कल्याण तालुक्यातील आणि उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात समाविष्ट असणाऱ्या म्हारळ, वरप आणि कांबा गावातील नागरिकांना संकट काळात येथील लोकप्रतिनिधींनी वा-यावर सोडले अशा मथळ्याखाली पत्रकार संजय कांबळे यांनी विविध बातम्या प्रसिद्ध केल्या. याची दखल घेऊन आमदार कुमार आयलाणी, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख, सरपंच व सदस्यां यांनी या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे.  उशिरा का होईना यांना येथील जनतेची अडचण लक्षात आली. त्यामुळे देर आये, दुरुस्त आये, असे म्हणायला हरकत नाही.
कल्याण तालुक्यातील म्हारळ वरप कांबा या गावाची अवस्था ना घर ना घाट का अशी झाली आहे. कारण गावे कल्याण तालुक्यात, पंचायत समिती कल्याण, तहसील कल्याण, पोलिस ठाणे कल्याण. आणि मतदारसंघ उल्हासनगर! म्हारळ ची तर अवस्था खूपच बिकट कारण यांचे रेशनिंग पण उल्हासनगर मध्ये. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना अनेक अडचणी येतात.
मागील वर्षी कोरोनाच्या संकटामुळे या गावांना मोठा फटका बसला, येथील आरोग्याच्या दृष्टीने सोईसुविधा मिळाव्यात म्हणून वरप येथे कोरोना कोविड सेंटर सुरू आले. त्यावेळेस एकाही लोकप्रतिनिधींनी या गावाकडे लक्ष दिले नाही. सुदैवाने कोरोनाचे संकट कमी झाल्याने याकडे लोकांनी दुर्लक्ष केले. परंतु आता कोरोनाची दुसरी लाट आली. येथील नागरिकांना औषध उपचार घ्यायचा असेल तर ग्रामीण रुग्णालय गोवेली किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र दहागाव येथे १०/१५ किलोमीटर अंतरावर जावे लागते आहे. त्यातच आता लसीकरण सुरू झाले आहे. यासाठी गोवेली किंवा दहागाव येथेच जावे लागते. त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत कोणत्याही लोकप्रतिनिधी, पक्ष अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा इतर कोणी लक्ष दिले नाही. त्यामुळे जनता यांच्या वर प्रचंड चिडली आहे. यातूनच वरप ग्रामपंचायतीचे उपसरपंच निलेश कडू, म्हारळ ग्रामपंचायत हद्दीतील समाजसेवक दत्तू सांगळे यांनी आमदार कुमार आयलाणी यांना जाब विचारला. तश्या विविध प्रकारच्या बातम्या पत्रकार संजय कांबळे यांनी प्रसिद्ध केल्या. यातून लोकप्रतिनिधी ची जनतेप्रति बांधिलकी काय, हे वास्तव मांडले. याची दखल उल्हासनगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुमार आयलाणी यांनी घेऊन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना पत्र पाठवून म्हारळ वरप कांबा येथील नागरिकांसाठी वरप येथील कोरोना कोविड सेंटर मध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे अशी मागणी केली आहे. आमदार कुमार आयलाणी यांना दोन वेळा कोरोना झाला आहे. त्यामुळे कदाचित या भागाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले असावे? परंतु त्यांची यंत्रणा आहेच ना याचीही विचार त्यांनी करायला हवा,
या बातम्या नंतर शिवसेनेचे उपतालुका प्रमुख दत्ता भोईर, म्हारळ ग्रामपंचायतीच्या सरपंच श्रीमती प्रगती प्रकाश कोंगिरे, वरप ग्रामपंचायतीच्या सदस्यां दिपाली भोईर आदींनी खासदार श्रीकांत शिंदे यांना पत्र लिहून या परिसरात लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे उशिरा का होईना आमदार कुमार आयलाणी सह इतर लोकप्रतिनिधी ना जनतेच्या अडचणी कळल्या हे ही कमी नाही. त्यामुळे देर आये असे म्हणायला हरकत नाही,
परंतु केवळ पत्र देऊन चालणार नाही, कारण कोरोनाची परिस्थिती खूपच बिकट आहे. आपल्या भागात रोज पेंशट वाढत आहेत. कुठेही बेड नाहीत, अत्यंत जवळचे मित्र, नातेवाईक मरत आहेत. यावर एकमेव उपाय म्हणजे "लसीकरण" हे होय. त्यामुळे ते लवकरात आहे आपल्या परिसरात कसे सुरु करता येईल, यासाठी आवश्यक आरोग्य अधिकारी व कर्मचारी, जागा, मुबलक लसीची साठा, याचाही विचार करुन आमदार महोदय व खासदार यांनी सातत्याने पाठपुरावा करायला हवा. आणि नागरीकांनी देखील जागृतपणे त्यांच्या पाठीशी असायला हवे. तरच तिसऱ्या लाटेचा आपण समर्थपणे मुकाबला करू शकतो.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...