Sunday, 13 April 2025

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मायेची सावली एक हात कर्तव्याचा या संस्थेतर्फे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच जिवनावश्यक वस्तूंचे वाटप !

मुंबई, (शांताराम गुडेकर) :
             सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख मा.श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांना प्रेरित होऊन ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण हेच उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून,शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनाप्रमुख अदित्य ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुढी पाडवा हिंदू नवीन वर्ष, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित सामाजिक, आरोग्य आणि शैक्षणिक, पर्यावरण आदी क्षेत्रात कार्यरत असलेल्या शिवसेना प्रणित मायेची सावली एक हात कर्तव्याचा (महाराष्ट्र राज्य) परिवार यांच्यावतीने ३५ वा उपक्रम पुणतांबा येथील मेथडिस्ट होमचे अनाथ शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू तसेच वॉशिंग मशीन, जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे, गोंडेगावचे लोकप्रिय माजी सरपंच संभाजीराजे बढे उपस्थित होते. त्यांच्या शुभ हस्ते मुलांना साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी शिवसेना नेते सुहास वहाडणे, पुणतांबा शिवसेना शहरप्रमुख महेश कुलकर्णी उपस्थित होते. मायेची सावली परिवार संस्थापक अध्यक्ष कटृर निष्ठावंत शिवसैनिक यशवंत विठ्ठल खोपकर व त्यांचे सर्व सहकारी कट्टर निष्ठावंत शिवसैनिक बंधु भगिनी यांच्या अथक प्रयत्नातुन अशा सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असते. पुणतांबा येथील मेथडिस्ट चर्च‌ मधील फादर जॉन प्रिंटर यांच्या उपस्थितीत बाल गोपाल अनाथ आश्रम येथे वरील सर्व वस्तूंचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी खा.वाकचौरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करत पुणतांबा शहर शिवसेनेचे व मायेची सावली परिवाराचे कौतुक करत आपण भविष्यात या अशा प्रकारचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर आयोजित करु. या सेवेत मी सदैव आपले पाठीशी तत्पर उपलब्ध राहील असे सांगितले. यशवंत खोपकर (मायेची सावली एक हात कर्तव्याचा (संस्थापक अध्यक्ष), संदिप चादिवडे (सचिव), दौलत बेल्हेकर (संचालक), वसंत घडशी (कार्यालय प्रमुख), विश्वनाथ जाधव, वैभव डोके, मेघा सावंत, निर्मला आवटे, रूपाली डोके, अपूर्वा पारकर, राजेंद्र पेडणेकर, राजेंद्र मणसुख,दत्तात्रय काशीद, अर्णव सावंत, अर्णव खोपकर, लिखित डोके यांच्यासह अन्य मायेची सावली सावलीचे पदाधिकारी, सदस्य, सभासद, हितचिंतक उपस्थित होते. तसेच मायेची सावली पदाधिकारी या सर्वांचा खा.वाकचौरे साहेब यांच्या हस्ते  संस्थेचे संस्थापक यशवंत खोपकर तसेच पदाधिकारी या सर्वांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला. तसेच सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

नेमेचि येतो मग उन्हाळा, पर्यावरणाचा उमाळा !!

दरवर्षी उन्हाळ्यामध्ये उन्हाच्या झळा सहन करत पर्यावरणाच्या गप्पा मारतो. वृक्ष तोड आणि वृक्षांची कमी होणारी संख्या याबाबत तावातावाने चर्चा करतो. लेख लिहितो, वाचतो. परंतु याचे मूळ काय याकडे बहुतेकांचे दुर्लक्षच असते. त्यानंतर

५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा (?) करतो.  या दिवशी आपण पर्यावरणाचे रक्षण करण्याची शपथ घेतो.  त्यासाठी विविध कार्यक्रमांचं नियोजन करतो. परंतु पर्यावरण रक्षण ही गोष्ट मूळ कशावर अवलंबून आहे आणि ते टाळता येणे शक्य आहे का याचा विचार जेव्हा माझ्या मनात येतो तेव्हा विचारांचा पूर्ण गोंधळ उडालेला असतो. 

आपल्या भारताचाच विचार करू भारताची लोकसंख्या जेव्हा स्वातंत्र्य मिळालं तेव्हा तेहेतीस कोटी होती आणि आज ती जवळपास १३३+ कोटी झाली. म्हणजे शंभर कोटीची भर पडली. फक्त सत्तर वर्षात. परंतू आताही भारताची जमीन १९४७ साली जेवढी  होती तेवढीच  आहे. जेवढं पाणी होतं तेवढंच पाणी आहे. पण लोक मात्र १०० कोटीने वाढले. या सर्व १०० कोटी लोकांची राहण्या-खाण्याची सोय त्यांना सुख सोयी देण्याची व्यवस्था आपल्याला करणे भाग आहे.  लोकसंख्या तर आपण काही कमी करू शकत नाही. तैहेतीस कोटी लोकांचे ऐवजी १३३ (आता म्हणे १४० कोटीच्या वर झाली) कोटी लोकांची सोय करण्यासाठी तेवढी घरे, रस्ते, तेवढी मार्केट, इतर सुखसोयी एकूण संपूर्ण पायाभूत सुविधा उभ्या करायच्या आहेतच. त्यासाठी आपण उपलब्ध असलेली जमिनच वापरणार.  उपलब्ध असलेला पाणीसाठाच वापरणार. उपलब्ध असलेली खनिजे वापरणार.वगैरे वगैरे.  म्हणजे तेवढ्या संख्येने झाडे कमी होणार, जंगले कमी होणार, पाणीसाठे कमी होणार. एक चादर एका माणसांसाठी वापरायच्या ऐवजी जर चार माणसांसाठी वापरायची ठरवली तर ओढाताण  होणारच. चादर फाटणारच. त्याला पर्याय काय ? सध्या आणखी नवीन नवीन शोध लागत आहेत. नवीन नवीन उत्पादने निर्माण होतायत. त्या सगळ्यासाठी नैसर्गिक शक्तींचा वापर होणारच आहे. तसेच नवीन नवीन औषधांचे शोध लागतात नवीन नवीन आरोग्य सुविधा निर्माण होत आहेत गेल्या शंभर वर्षांमध्ये असे म्हटले जाते की माणसाचे वयोमान सरासरी ६० वर्षावरून ८० वर्षापर्यंत जात आहे. बालमृत्यूचे प्रमाण अत्यंत कमी झाले आहे. त्यामुळे लोकसंख्येची भर सतत पडणारच आहे. त्यासाठी कोणताही उपाय किंवा कोणतीही उपाययोजना माणसांच्यावर लादता येत नाही.  लोकसंख्या वाढ कमी करता येत नाही. त्यासाठी कुणी समाज प्रबोधन करतानाही दिसत नाही. फक्त पर्यावरण रक्षणाचा कंठशोष करून पर्यावरणाचे रक्षण होणे शक्य आहे का ?   

मृत्यूचे प्रमाण कमी झाल्यामुळे व लोकसंख्या वाढीचा वेग जास्त असल्यामुळे त्याबाबत आपण काहीही उपाय योजना करण्यास असमर्थ आहोत. माझ्याच आयुष्याचा प्रवास पाहिला तर ५० वर्षापूर्वी मी पाहिलेली मुंबई आणि पुणे आणि आज मी पहात असलेलं मुंबई व पुणे तसेच पन्नास वर्षांपूर्वीची त्याहीपेक्षा लहान शहरे आणि खेडेगावे सुद्धा. त्याचप्रमाणे शहराच्या आजूबाजूला असलेल्या खेडेगावाच्या कमी होत असलेल्या पिकाऊ जमिनी आणि उत्पादन वाढ व माणसांच्या सवयीमुळे होणारे प्रदूषणाचे प्रमाण खूपच वाढत चालले आहे. पर्यावरण रक्षणाचे प्रमाण व प्रयत्न पाहिल्यानंतर फक्त एवढेच जाणवते की आज पासून एक हजार वर्षांनी पृथ्वीचा विनाश होणार असेल तर फक्त तो ५-६ वर्षांनी पुढे ढकलता येईल यापेक्षा त्या प्रयत्नांना फार यश येणार नाही. हे क्षीण प्रयत्न ही सुद्धा चिंतेची बाब आहेच. आपण लोकसंख्येची वाढ कमी करू शकत नाही. प्रदूषणाचे प्रमाण कमी करू शकत नाही. पाण्याचा वापर कमी करू शकत नाही.  माणसांच्या सवयी बदलू शकत नाही. जंगले वाचवू शकत नाही. प्राणीजीवन वाचवू शकत नाही. वनस्पती संवर्धन ज्या प्रमाणात होत आहे त्याच्या कितीतरी पटीने जास्त वनस्पतींचे नष्टचर्य सुरू आहे. माणसाच्या कोणत्याही सवयींना अमुलाग्र बदलणे हे अशक्य आहे. आपल्याला विकास पाहिजे आणि हा विकास वरील नष्टचर्य चालू ठेवूनच होऊ शकला पाहिजे. त्यामुळे या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार केल्यास पर्यावरण नष्ट करून पृथ्वी नष्ट करणे व संपूर्ण मानवजातीचे नष्टचर्य याचा वेळ वाढवणे यावर आपण काहीही करू शकत नाही. 

तुका म्हणे उगी रहावे, जे जे होईल ते ते पहावे. याशिवाय आपल्या हातात काय आहे. फक्त आपण मनातल्या मनात म्हणत राहायचे 'बुडते हे जन देखवेना डोळा' !

—-- सुनील देशपांडे ९६५७७०९६४०.

भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन

असाध्य ते साध्य, करिता सायास ।
कारण अभ्यास ! तुका म्हणे ।। 

**भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती चिंतन 

या विश्वगुरू संत तुकाराम महाराजांच्या उक्तीचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्वर्गीय भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर ! 

विद्यार्थीदशे पासूनच शिक्षणासाठी किती अभ्यास केला आणि त्या अभ्यासासाठी किती सायास केले हे त्यांच्या चरित्रावरून साऱ्यांनाच माहिती आहे. आपल्याजवळ कोणतीही साधने असोत किंवा नसोत. कोणाचेही पाठबळ असो किंवा नसो. प्रत्यक्ष शिकवणारा असो किंवा नसो. ग्रंथ हेच गुरु मानून आणि अभ्यासाचा प्रचंड सायास करून त्यांनी जे करून दाखवले ते खरोखरच असाध्य होते परंतु ते साध्य करून दाखवले. 
विशेषतः त्यांच्या घटना समितीच्या शब्दांकन विभागाच्या प्रमुख पदाच्या कामगिरीबद्दल हे मोठेपण विशेष करून जाणवते. 

वकील झाल्यानंतर त्यांनी विशेष आवड म्हणून अनेक देशांच्या घटनांचा अभ्यास करणे हा छंद म्हणून जोपासला होता. त्यामुळे घटना समितीमध्ये त्यांना सामावून घेताना त्यांच्या या अभ्यासाचा मान राखून त्यांना या शब्दांकन उपसमितीचे प्रमुख बनवले. 

तरीसुद्धा त्यांचे खरे मोठेपण पुढेच आहे __

या शब्दांकन उपसमिती मध्ये त्यांचे शिवाय आणखी काही सदस्य होते. परंतु वेगवेगळ्या कारणाने ते सदस्य ही उपसमिती सोडून गेले. शेवटी शब्दांकन समितीचे ते एकमेव सदस्य त्या समितीत शिल्लक राहिले. तरीसुद्धा त्यांनी या समितीमध्ये माझ्या मदतीसाठी आणखी कोणी सदस्य मला द्या. सोडून गेलेल्या सदस्यांबद्दल कोणी पर्यायी सदस्य माझ्या मदतीला हवेत. अशी कोणतीही मागणी न करता. नेटाने एकट्याने रात्रंदिवस खपून आणि अभ्यास करून घटना समितीच्या शब्दांकन उपसमितीची जबाबदारी सर्वोत्कृष्ट पद्धतीने आणि वेळेवर पूर्ण केली. हे त्यांचे कार्य हे एकमेवाद्वितीयच आहे. 
आज त्यांच्या जयंतीदिनी या सर्व सायासातून घडलेल्या आणि आपल्या देशाची घटना घडवलेल्या या महान तपस्वी अभ्यास विभूतीला माझा साष्टांग प्रणिपात! 

परंतु या व्यक्तीच्या या सर्व सायासांचा मान राखणे हे आपले कर्तव्य आहे हे मात्र आज कुणाच्याही खिजगणतीतही नाही. 

स्व. भारतरत्न बाबासाहेबांनी राज्यघटनेनुसार आम्हाला एखाद्या न्याय्य मागणीसाठी किंवा हक्कासाठी आंदोलन करायचा अधिकार दिलेला आहे एवढेच आमच्या लक्षात आहे. परंतु ते आंदोलन करताना त्यातून हिंसात्मक उद्रेक किंवा बेकायदेशीर नुकसानकारक कृत्य किंवा राष्ट्रीय संपत्तीचा नाश करण्याची राष्ट्र विघातक कृती घडू नये यासाठी जे नियम आहेत ते मात्र आम्ही पाळणार नाही. अशा पद्धतीने आम्ही जर वागू लागलो तर त्यात स्व. बाबासाहेबांच्या सायासांचे आम्ही विडंबन करतो आहोत असे नाही का वाटत? 

ज्या जातीअंताची लढाई स्व. बाबासाहेबांनी आरंभली आहे त्या जातींअंताकडे आमचा प्रवास चालू आहे की त्या विरुद्ध दिशेने चालू आहे याचा कोणी विचार करतो आहे का? व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून सामाजिक समतेकडे वाटचाल करण्यासाठी कटिबद्ध असलेले किती कार्यकर्ते समाजात दिसतात? 

कोणत्याही चांगल्या कृतीमध्ये कालांतराने विकृती घुसत जातात हे जगात सगळीकडेच दिसून येते. परंतु लोकशाही सारख्या चांगल्या विचारांमध्ये घुसलेल्या सामाजिक विकृती विरोधात कार्य करण्यासाठी सायास करणारे व स्व. बाबासाहेब यांच्या मूळ विचारधारेशी प्रामाणिक राहून कार्य करणारे कार्यकर्ते जास्तीत जास्त संख्येने निर्माण होतील का? या प्रश्नाचिन्हावर भविष्याकडून काही आशादायक घडावे एवढी प्रार्थना करून आज स्वर्गीय बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला कोटी कोटी प्रणाम!!!

—----- सुनील देशपांडे (९६५७७०९६४०)

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...

सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेले जवान नंदन रघुनाथ जाधव यांचा चांबळे ग्रामस्थांच्यावतीने कृतज्ञता सन्मान...

वाडा, प्रतिनिधी : वाडा तालुक्यातील चांबळे येथील सैन्यदलातील जवान नंदन रघुनाथ जाधव हे भारतीय सैन्य दलात 20 वर्षे सेवानिवृत्त झाले असून त्यांचा ग्रामस्थांच्या वतीने कृतज्ञता सन्मान सोहळा करण्यात आला. 

नंदन जाधव हे सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून ते जून 2005 साली  सेवेत रुजू झाले होते. जून 2006 पर्यंत हैद्राबाद ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर त्यांची  पहिली पोस्टिंग पठाणकोट (पंजाब) येथे देण्यात आली होती. तर  2007 ते 2015 पर्यंत त्यांची सलग 8 वर्षे  जम्मु काश्मीर येथे पोस्टिंग होती. त्यानंतर 2015 ते  2022 पर्यंत संभाजी नगर (औरंगाबाद) येथे पोस्टिंग होती. तर 2022 ते 2025 पर्यंत त्यांची चीन सीमेवर दुर्गम ठिकाणी  त्यांनी काम केले. अशाप्रकारे भारतीय सैन्यदलातील गौरवास्पद व निष्कलंक सेवा बजावून  ते 31 मार्च 2025 रोजी सेवानिवृत्त झाले आहेत.

नंदन जाधव यांचा कृतज्ञता सन्मान सोहळा हनुमान जयंतीच्या दिवशी (12 एप्रिल) रोजी आयोजित करण्यात आला होता. सैन्यदलातील सेवेबद्दल ग्रामस्थांच्यावतीने नंदन जाधव यांना कृतज्ञता सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष जयेश शेलार, गोऱ्हे उपसरपंच व तेली समाज युवक अध्यक्ष अनिल खिलारे, मिठाराम बोंद्रे सर, ग्रामस्थ धनेश पाटील, रमेश पाटील, xxx यांनी मनोगत व्यक्त केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोहिदास कासार सर यांनी केले.

सैन्य दलात सेवा करण्याची संधी मला मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो, जास्तीजास्त तरुणांनी सैन्य दलात जाऊन देशाची सेवा करावी. 
नंदन रघुनाथ जाधव
(सेवानिवृत्त जवान)

सौजन्य -
श्री. जयेश शेलार
राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष, वाडा 

Saturday, 12 April 2025

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम या विषयावर युसुफ मेहेरअली सेंटर तारा येथे कार्यशाळा संपन्न !!

हवामान बदल व त्याचे परिणाम  या विषयावर जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ सौम्या दत्ता यांच्या मार्गदर्शनाखाली नुकतीच एक कार्यशाळा रायगड जिल्ह्यातील पनवेलजवळ तारा येथील युसुफ मेहेरअली सेंटर येथे पार पडली. सदर कार्यशाळा 8 आणि 9 एप्रिल 2025 रोजी जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय (NAPM) च्या National Alliance of Climate and Ecological Justice (NACEJ) या राष्ट्रीय मंचाच्या महाराष्ट्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. हवामान संकट आणि त्याचे परिणाम या विषयावरील या कार्यशाळेत NACEJच्या कामात सहभाग देऊ इच्छिणारे महाराष्ट्रभरातील पर्यावरणीय व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सहभागी झाले होते. हवामान बदलाबद्दल कार्यकर्त्यांत जागरुकता निर्माण करणे व या क्षेत्रात काम करण्यासाठी क्षमता वाढविण्यासाठी प्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित केलेली होती.

NACEJच्या कार्यकर्त्यांसाठी आयोजित केलेल्या या कार्यशाळेत हवामान संकटात पर्यावरण व सामाजिक न्यायासाठी वैज्ञानिक हस्तक्षेपाची क्षमता कार्यकर्त्यांत निर्माण करण्यासाठी प्रशिक्षण देण्यात आले. हवामान आणि वातावरण या वैज्ञानिक संज्ञाच्या मूलभूत संकल्पनेपासून ते या संज्ञा मोजण्याच्या प्रात्यक्षिकापर्यंत या प्रशिक्षणात समावेश होता. विविध जनआंदोलनात व पर्यावरणीय लढ्यात सामिल असलेले सामाजिक कार्यकर्ते या मूलभूत संकल्पना समजून घेत होते व हवामान बदलातील विविध घटक विविध उपकरणांच्याद्वारा मोजून पहात होते हे या कार्यशाळेचे महत्वाचे वैशिष्ट्य.  

दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत गंभीर हवामान स्थिती समजून घेणे, हवा, पाणी, ध्वनी, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन, आयोनाइजिंग रेडियेशन इत्यादी संपूर्ण पर्यावरणीय प्रदूषणाचे निरीक्षण व मोजमाप करणे, त्यासाठीचे सरकारी निकष, वापरण्यात येणारी मानकांची माहिती, दस्तऐवजीकरण आणि प्रदूषण स्रोत आणि दायित्व स्थापित करण्यासाठीची पद्धती, वेगाने उदयास येणारे प्रदूषण धोके जसे इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडियेशन प्रदूषण यांची माहिती प्रशिक्षणार्थींना मिळाली. हवामान बदलाच्या संकटाचा परिणाम उपेक्षित समाजाच्या उपजिविकेवर आणि तब्येतीवर कशा प्रकारे होतो आहे याचीही चर्चा झाली. त्याचबरोबर असुरक्षित समुदायांना जोखीम कमी करण्यात आणि परिस्थितीशी जुळवून घेण्यास मदत करण्यासाठी तसेच हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी साधे सोपे उपाय कसे योजता येतील ह्यासाठी मार्गदर्शन केले गेले. हवामान बदल, पर्यावरण व सामाजिक न्याय याचा परस्पर संबंध या चर्चेतून समजावून देण्यात आला. या विषयातील तज्ञ डॉ. सौम्या दत्ता यांनी या कार्यशाळेत मुख्यत्वे मार्गदर्शन केले.  

NACEJ चे राष्ट्रीय कार्यकारणी सदस्य संतोष ललवाणी यांनी हवामान बदलाबाबतचा तेरी या संस्थेने बनवलेला *'महाराष्ट्र स्टेट ॲक्शन प्लॅन ऑन क्लाइमेट चेंज'* हा रिपोर्ट संक्षेपात सादर करुन प्रशिक्षणार्थिंना  अशा प्रकारच्या अभ्यासाबाबत अवगत केले व NACEJ च्या वतीने गरज असेल तिथे भविष्यात अशा प्रकारचा अभ्यास अहवाल तयार करण्यासाठी संशोधक टीम तयार करण्याची गरज अधोरेखीत केली. 
 
कार्यशाळेचा समारोप NACEJ-महाराष्ट्र द्वारे पुढील स्तरावरील राज्यव्यापी कृतींच्या नियोजनाची कालबद्ध आखणी करुन करण्यात आला. हवामान बदलाच्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी तळागाळातील उपेक्षित समाजात काम करण्यासाठी व जनआंदोलनांना वैज्ञानिक डेटा पुरवणाऱ्या सजग कार्यकर्त्यांची फळी उभारण्याची गरज प्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय मंगला गोपाळ यांनी समारोप प्रसंगी बोलताना व्यक्त केली. त्यासाठी अशा प्रकारच्या कार्यशाळा महाराष्ट्रातील विविध विभागांत आयोजित करण्याचे नियोजनही उपस्थित प्रतिनिधींच्या मदतीने करण्यात आले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी महाराष्ट्र राज्य समन्वयक सुजय मोरे यांनी विशेष मेहनत घेतली.

सौजन्य‌ -
NACEJ, महाराष्ट्र 
लेखन : सिरत सातपुते

भव्य 'रक्तदान शिबिरां'द्वारे महात्मा फुलें व बाबासाहेबांना अभिवादन !!

भव्य 'रक्तदान शिबिरां'द्वारे महात्मा फुलें व बाबासाहेबांना अभिवादन !!

महात्मा ज्योतिबा फूले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्ताने प्रथमच  पिपल्स एज्यूकेशन सोसायटीच्या मुंबईतील ३ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागांनी संयुक्तिक 'भव्य रक्तदान शिबीराचे' आयोजन शुक्रवार, दि. ११/४/२०२५ रोजी तीन वेगवेगळ्या रेल्वे स्थानकांवर (दादर, चर्चगेट व सिएसएमटी) केले होते. 

तिन्ही शिबिरातून १५०+ युनिट्स रक्त जमा झाले. यामध्ये दादर रेल्वे स्थानकातील आंबेडकर कॉलेजच्या शिबीरातून सर्वात जास्त (७५) रक्त युनिट्स जमा झाले. फोर्ट येथिल दोन्ही सिद्धार्थ महाविद्यालयाच्या सिएसटी व चर्चगेट रेल्वे स्थानकातील शिबिरातून एकून ८० रक्त युनिट्स जमा झाले. 
तिनही ठिकाणी ७० पेक्षा जास्त रक्तदात्यांची इच्छा असूनदेखील त्यांचे हिमोग्लोबिन कमी असल्यामुळे ते रक्तदान करू शकले नाहीत. 


अत्यंत कडक उन्हाळ्याच्या गरम वातावरणात व परिक्षा चालू असताना देखिल तिन्ही महाविद्यालयाच्या एन एस एस कार्यक्रम अधिकार्यांच्या नेतृत्वात, जवळजवळ ५० विद्यार्थ्यांनी प्रवाशी रक्तदाते मिळवण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली. या शिबिराला काही माजी विद्यार्थी व शिक्षकांनी देखील भेट देऊन रक्तदानही केले व विद्यार्थ्यांचे कौतूक केले.‌ सर्व शिबिरांसाठी लायन्स क्लब मुंबई महानगर यांनी सर्वांचे नास्ता पाणी व जेवणासह पेंडालचा खर्च करून उत्तम सहकार्य केले.

या शिबिराच्या योग्य नियोजनासाठी शिबीर समन्वयक श्री. अनिल गरेंच्या नेतृत्वात तीनही कॉलेजचे कार्यक्रम अधिकारी प्रा. नितीन खडतर, डॉ. धनंजय चंदनशिवे, प्रा. विशाल करंजवकर व डॉ. विष्णू भंडारे यांनी विशेष मेहनत घेतली. तसेच नायर रक्तपेढीचे समाज विकास‌ अधिकारी कांतीलाल पवार, सायन रक्तपेढीचे शुभम भोईर व जगजीवनराम रेल्वे रक्तपेढीचे प्रथमेश सकपाळ यांनीही उत्तम सहकार्य‌ केले. मुंबई विद्यापिठ, रासेयोचे संचालक प्रा. सुशिल शिंदे व जिल्हा समन्वयक, प्रा. क्रांती उके यांनीदेखिल आमच्या या संयुक्त रक्तदान मोहीम उपक्रमाला पाठींबा देऊन सर्वांचे  कौतूक केले. 
 
*-डॉ. विष्णू भंडारे, मुंबई प्रतिनिधी*

Friday, 11 April 2025

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

नालासोपारात मुदत संपलेल्या औषधे लेबल बदलून विक्री !

 *शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाची कारवाई ची मागणी*

नालासोपारा, प्रतिनिधी :- नामांकीत लॉरेल कंपनीच्या औषधे व वस्तुवर असलेले लेबल बदलवुन त्याची विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 
नालासोपारा येथिल वि केअर मेडिकल येथुन व्यक्तीने लॉरेल कंपनीच्या वस्तुचे खरेदी केली असता बाहेरील बॉक्स वर मुदत २०२७ व आतील वस्तुंवर मुदत तारीख २०२४ असल्याचा प्रकार समोर आला याबाबत त्वरीत औषध विक्रेता ला  प्रकार सांगताच त्यांनी लॉरेल कंपनीचे चुक असल्याचे सांगितले.
संबधित व्यक्तीने शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्षाकडे तक्रार करताच शिवसेना उपनेते व अध्यक्ष अँड अरून जगताप साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी अन्न व औषध प्रशासनाची भेट घेत नागरीकांच्या जीवाशी खे॓ळ सुरू असल्याचा धक्कादायक  प्रकार उघडकीस आणला.
तक्रारीची दखल घेत अन्न सुरक्षा मानक कायद्याची पायमल्ली केल्याचे आढळून आल्याने अन्न व औषध प्रशासनाकडुन उत्पादने सील करून अधिक तपास सुरू केला. मुदत संपलेल्या औषधांची विक्री करणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे, म्हणून यावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे.
या लॉरेल कंपनीवर फौजदारी गुन्हा नोंद करून कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी शिवसेना ग्राहक तक्रार निवारण कक्ष तर्फे जिल्हाप्रमुख रूचिता नाईक यांनी केली....

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...