Wednesday, 27 April 2022

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावावर घेतली गंभीर दखल. "रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी नेते, अशोकराव जाधव, अरुणा प्रकल्पग्रस्त संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी घेतली मंत्री महोदयांची मंत्रालयात भेट"

राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रस्तावावर घेतली गंभीर दखल !

"रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा शेतकरी नेते, अशोकराव जाधव, अरुणा प्रकल्पग्रस्त संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी घेतली मंत्री महोदयांची मंत्रालयात भेट"


मुंबई, बातमीदार :
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील अरुणा प्रकल्पाची बेकायदेशीरपणे घरभरणी करून त्यात पाणीसाठा केल्याने पाण्यात बुडालेल्या सुमारे 130 पेक्षा जास्त घरांचा प्रश्न महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात आणि राज्याचे पुनर्वसन मंत्री ना. विजय वडेट्टीवार यांच्यासमोर मांडण्यात आला असून याची गंभीर दखल मंत्रीमहोदयांनी घेतले आहे. कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात, आणि पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करून मंत्रालयात मिटींगला बोलवा असे लेखी आदेशच मंत्रिमहोदयांनी दिले आहेत.


काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि शेतकरी नेते अशोकराव जाधव आणि लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप यांनी या प्रश्नावर मंत्री महोदयां यांचे लक्ष वेधले आहे.त्याची गंभीर दखल मंत्रीमहोदयांनी घेतली आहे.

या बाबतचे  सविस्तर वृत्त असे मोबदला नाही, भुखंड नाही, प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि स्थलांतर केलेले नसताना तसेच कालवे तयार नसताना २०१९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी पांढरपट्टे, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, कार्यकारी अभियंता राजन डवरी, आणि अधीक्षक अभियंता मिलिंद नाईक या अधिकाऱ्यांनी गावातील काही दलालांना हाताशी धरून अरुणा प्रकल्पाची एका महिन्यात मे २०१९ मध्ये घळभरणी पूर्ण करून धरणात पाणी साठा केला केल्याने; आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांची सुमारे ३६ रहाती घरे धरणाच्या पाण्यात बुडालेली आहेत. रात्री १२ वाजता गावात आणि घरात धरणाचे पाणी घुसल्याने प्रकल्पग्रस्त जीव वाचवण्यासाठी गावातून बाहेर पडलेले आहेत.

पाण्यात बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई मिळावी व कायद्याप्रमाणे पुनर्वसन करण्यात यावे या मागणीसाठी लढा संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे, अजय नागप, प्रकाश सावंत, विलास कदम, राजेंद्र नागप, सुर्यकांत नागप, यांच्या नेतृत्वाखाली गेली चार वर्षे धरणे, मोर्चे, आंदोलने, आणि प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला जात आहे. असे असतांना या प्रकल्पात एकही घर बुडाले नाही असे रिपोर्ट डवरी, जोशी, पांढरपट्टे, या अधिकाऱ्यांनी शासनाला सादर केलेले आहेत. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर येताच या अधिकाऱ्यानी या जिल्ह्यातून अन्यत्र बदल्या करून पळ काढला आहे.

आता अधीक्षक अभियंता विजय थोरात, कार्यकारी अभियंता हर्षल यादव, बदली होऊन आलेले आहेत. हे अधिकारी जिल्ह्यात रुजु झाल्यानंतर गेली दोन वर्षे या अधिकाऱ्यांना प्रकल्पग्रस्तांनी सहकार्य केले. गोड बोलून धरणाचे उर्वरित काम अहोरात्र सुरू ठेवून पूर्ण करून घेतले. मात्र घरांच्या प्रश्नावर या अधिकाऱ्यांनी गोड बोलून प्रकल्पग्रस्तांशी चर्चा सुरु ठेवत. मुळ प्रश्न तसाच लोंबकळत ठेवला आहे. या अधिकाऱ्यानी आता प्रकल्पाचे काम संपताच मागील अधिकाऱ्यांची री ओढत एकही घर बुडाले नसल्याचे कारण सांगत आहेत.

कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनीच मार्च २०२२ मध्ये अरुणा प्रकल्पातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू ठेवला होता. त्यामुळे धरणातील पाणीसाठा पुर्ण कमी झाला आणि आखवणे, नागपवाडी, भोम गावातील प्रकल्पग्रस्तांची तब्बल चार वर्षानंतर सुमारे 130 पेक्षा जास्त घरे धरणाच्या पाण्यातून जशीच्या तशी पाण्याबाहेर आलेली आहेत. या घरांची पाहणी करण्यात यावी आणि प्रकल्पग्रस्तांना बुडालेल्या घरांची नुकसान भरपाई देण्यात यावी यासाठी अरुणा प्रकल्प गेले दोन टाहो फोडत आहेत. पाऊस तोंडावर आलेला आहे. पुन्हा पाऊस पडला आणि ही घरे पाण्याखाली गेली तर ती पुन्हा कधीच दिसणार नाही. त्यामुळे तातडीने या घरांची पहाणी करावी ही मागणी सुद्धा कार्यकारी अभियंता आणि अधीक्षक अभियंता मान्य करायला तयार नाहीत. ते वेळकाढूपणा करीत असुन पावसाची वाट पहात आहेत. या संदर्भात गेल्या महिनाभरात अनेक बैठका झाल्या परंतु वेळकाढू पणा करण्याचे काम वरील अधिकारी करत आहेत असा आरोप प्रकल्पग्रस्त करीत आहेत.

अरुणा प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन न करता ज्या पद्धतीने त्यांचे हाल करण्यात आले.आणि त्यांना न्याय दिला जात नाही. याची गंभीर दखल रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी घेतली आहे. काल २६ एप्रिल २०२२ रोजी त्यांनी रत्नागिरी वरून अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत ते थेट मंत्रालयात पोहोचले. त्यांच्यासोबत संघर्षाचा अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या अस्तित्वाचा संघटनेचे सेक्रेटरी अजय नागप होते. काॅंग्रेसचे ज्येष्ठ नेते व शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री नामदार विजय वडेट्टीवार यांची मंत्रालयात भेट घेतली. अरुणा प्रकल्पग्रस्तांची प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीने वाट लावली आणि अन्याय केला त्याचे पुरावेच सादर केले.

महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी उपलब्ध कागदपत्र, वर्तमानपत्रातील बातम्यांची कात्रणे, आणि धरणाच्या पाण्यातुन तब्बल चार वर्षानंतर बाहेर आलेल्या घरांचे फोटोग्राफ्स पाहिल्यानंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन आणि स्थलांतर केल्याशिवाय कायद्याने प्रकल्पाची घळभरणी करताच येत नाही. मग हे बेकायदेशीर काम कसे करण्यात आले असा सवालच मंत्रीमहोदयांनी उपस्थित केला आहे.

कार्यकारी अभियंता राजन कार्यकारी अभियंता हर्षल यादव, अधीक्षक अभियंता विजय थोरात, आणि जिल्हा पुनर्वसन अधिकारी अमोलसिंह भोसले यांच्याकडे वस्तुनिष्ठ अहवाल मागवून त्यांना मंत्रालयात मिटींगला बोलावण्याचे आदेशच मंत्री महोदयांनी दिले आहेत.

गेली चार वर्ष अरुणा प्रकल्पग्रस्त त्यांच्यावर झालेल्या अन्यायाच्या बाबतीत आक्रोश करीत आहेत. माजी आमदार, शेतकरी नेते दिवंगत पितृतुल्य पुष्पसेन सावंत यांच्या शिवाय कोणीही दखल घेतलेली नाही. सर्वस्व गमावलेल्या प्रकल्पग्रस्तांच्या बाबतीत कोणीही सहाणुहोती दाखवलेली नाही. परंतु आता शेतकरी नेते असलेले रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांनी सोशल मीडिया, युट्युब चॅनेल, आणि वर्तमानपत्रांच्या बातम्यांच्या आधारे अरुणा प्रकल्पग्रस्तांशी संवाद साधत मंत्री महोदया समोर हा गंभीर प्रश्न मंत्री उपस्थित केला आहे. तेवढीच गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे लेखी आदेश दिले आहेत. यामुळे अरुणा प्रकल्पग्रस्तांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवसातच पावसाळा सुरू होणार असल्याने याबाबतची मंत्रालयात तातडीने बैठक व्हावी अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली असुन ज्येष्ठ नेते अशोकराव जाधव यांचे अरुणा प्रकल्पग्रस्तांनी आभार मानले आहेत.
१ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर अरुणा प्रकल्पग्रस्तांचे अन्नत्याग आंदोलन शेतकरी नेते अशोकराव जाधव यांनी शब्द दिल्यामुळे पुढे ढकलण्यात आले आहे.

अस्तित्वाचा संघटनेचे अध्यक्ष तानाजी कांबळे :

 📞 -  7507966260


Tuesday, 26 April 2022

बजरंग शांताराम तांगडकर सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य सामाजिक राजकीय प्रवास... *संगमनेर तालुका ते कल्याण व्हाया लालबाग- घाटकोपर*

बजरंग शांताराम तांगडकर सर्वसामान्य कुटुंबातील असामान्य सामाजिक राजकीय प्रवास...

*संगमनेर तालुका ते कल्याण व्हाया लालबाग- घाटकोपर*



बजरंग शांताराम तांगडकर सर्व सामान्य कुटुंबातील तरूण गेली अनेक वर्षांपासून सामाजिक, शैक्षणिक आरोग्य, कला, क्रीडा, राजकीय क्षेत्रातील कार्यरत असून‌ त्यांचा वाढदिवसानिमित्त निमित्त घेतलेला त्यांच्या कार्याचा आढावा, 


जेष्ठ पत्रकार शिवचरित्र व्याख्याते, वडील शांताराम तांगडकर जे शेतकरी कुटुंबात आंबीखालसा, ता. संगमनेर जि. अहमदनगर येथे जन्मगाव कै. रखमाजी चिमाजी तांगडकर यांचे चिरंजीव  ७ भावंडे असलेले जोड कुटुंब असलेला मोठा परिवार या घरांमध्ये इतर भाऊ पुणे, मुंबई, संगमनेर येथे स्थायिक असा मोठा प्रपंच, वडीलांनी महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महामंडळ मध्य नोकरी करत, पत्रकारिता करत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह केला सामाजिक, राजकीय पत्रकारिता क्षेत्रात १९६८ पासून शालेय आंदोलन पासून सुरूवात कार्यरत, सन १९८५ ला विद्यमान महसूल मंत्री व त्याकाळचे अपक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रचारात स्वर्गीय एडवोकेट सुदामराव आहेर ,माजी न्यायमूर्ती सुमंत कोल्हे यांच्याबरोबर ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर यांनी संगमनेर मतदारसंघ पिंजून काढला वक्ता म्हणून महत्त्वाची भूमिका बजावलली व आमदार बाळासाहेब थोरात प्रथम आमदार म्हणून निवडून आले, 


त्यानंतर १९८८ साली तत्कालीन आमदार बाळासाहेब थोरात आमदार आदिवासी विकास मंत्री राज्यमंत्री मधुकररावजी पिचड, सहकार महर्षी कै. प्रभाकर भोर यांच्या उपस्थितीत महर्षी दयानंद विद्यालय परेल येथे साप्ताहिक नवस्फूर्ती वृत्तपत्राचे प्रकाशन करण्यात आले नवस्फूर्ती साप्ताहिक, विशेषांक दिवाळी अंक, तेथून लालबाग, घाटकोपर कल्याण असा दिर्घ प्रवास केला.. 


घाटकोपर मध्ये दादा म्हणून ओळख असलेले पत्रकार शांताराम तांगडकर यांचे पत्रकार क्षेत्राबरोबरच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातही त्यांचा मोलाचे योगदान असो आहे स्थानिक शिवसेना नगरसेवक शुभांगी शिर्के शिर्के यांच्या नेहमी पाठीशी राहत निवडणुकीत महत्त्वाची भूमिका बजावत ४ वेळा व  दशरथ शिर्के १ वेळा, तर संगमनेर तालुक्यातील आंबीखालसा ग्रामपंचायत सुरेश कान्होरे यांना चार वेळा निवडून आणण्यात मोलाची भूमिका बजावली 


आता त्यांचे चिरंजीव बजरंग तांगडकर सामाजिक शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असून त्यांचा हा प्रवास, लालबाग -घाटकोपर, भटवाडी इथून सुरू होतो मोठे कुटुंब असल्याने वयाच्या ३ वर्षा पासून १९८६ पासून  मुंबईत स्थायिक झाले, चाळीत १०×१० रूम मध्ये रूम मध्ये भांवडे, चुलता, चुलती सोबत राहत बर्वे नगर महानगरपालिका शाळा क्रमांक ३ मध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले, पुढे रामनिरंजन झुनझुनवाला कॉलेजमध्ये पदवी घेतली, त्यानंतर एअरलाइन क्षेत्रांमधील डिप्लोमा पदवी घेत जेट एअरवेज सारख्या देशातील नामांकित कंपनीमध्ये नोकरी केली तर आता इंटरियर, एक्स्टरियर, सिव्हिल क्षेत्रात स्वतःचा व्यवसाय करत आहे.. 


घरामध्ये वडील पत्रकार व सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे घरात नेहमीच सामाजिक वातावरण कोणाच्याही सुख दुःख मध्ये सहभागी होत ,कोणाचेही काम आले तर कोणतीही अपेक्षा न ठेवता तत्परतेने कशी‌, सोडवता येईल यासाठी नेहमीच धडपड ,कोणाला मंत्रालयातून शिफारस पत्र, कोणाला शाळा कॉलेज येथे शिफारस पत्र, कुणाला नोकरी लावणे, कोणी कुठे कधी अडचणीण त्यासाठी मदत करणे असे नेहमीच मदतीची भावना त्यांच पावलांवर पाऊल ठेवत त्यांचे चिरंजीव बजरंग तांगडकर आज सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रामध्ये कार्यरत आहे त्यांच्या सामाजिक  व राजकीय जीवनाची खरी सुरुवात २०११ जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या देशातील भ्रष्टाचार विरोधी आंदोलन आंदोलनात ठाणे येथे सहभाग घेऊन झाली, 


पुढे मराठा क्रांती मोर्चा आंदोलन ना मधील कल्याण, ठाणे ,मुंबई येथे मोर्चा व समन्वयक म्हणून सहभाग, २०१५ निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणण्यासाठी दया गायकवाड यांचे प्रचार प्रमुख म्हणून धुरा सांभाळली, 


कार्यकर्ता ते वार्ड अध्यक्ष - कल्याण शहर उपाध्यक्ष असा राजकीय प्रवास, २०१५-२०१९ केंद्रीय मंत्री खासदार कपिल पाटील साहेब, माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या निवडणुकांना  प्रचारात नेहमीच अग्रेसर राहिले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सीएम चषक च्या माध्यमातून शाळांमध्ये चित्रकला, स्पर्धा रांगोळी स्पर्धा, वकृत्व स्पर्धा, काव्य स्पर्धा मध्ये सहभाग नोंदवला भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक उपक्रमांमध्ये, आंदोलनामध्ये सहभाग नोंदवत पक्षाची ध्येय धोरणे तळागाळापर्यंत पोहोचण्यासाठी सदैव प्रयत्न करत राहिले. 


बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख, मतदार नोंदणी असो शासनाचे उपक्रम असो भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्र प्रदेश स्तरावर राबवलेले विविध कार्यक्रम पोहोचविण्याचे कार्य अतिशय प्रामाणिक, कष्ट आणि जिद्दीने केले वेळप्रसंगी कुटुंबाकडे कधी-कधी दुर्लक्ष होते परंतु त्यांच्या रक्तात व मनात असलेली कार्याची आवड व पॅशन त्यांना शांत बसून देत नव्हती घरात थांबून देत नव्हती.


भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये सदैव क्रियाशील राहत प्रत्येक उपक्रमांमध्ये ,आंदोलनामध्ये सहभाग नोंदवला कार्यकर्ता- वार्ड अध्यक्ष ते शहर उपाध्यक्ष असा प्रवास करत सर्व कार्यकर्ते पदाधिकारी व ज्येष्ठ नेते यांच्या संपर्कात राहत विविध उपक्रम आपल्या प्रभागात राबवण्याचे कार्य केले त्याचबरोबर जमिनीवर राहत प्रत्येक तरुणांच्या ,नागरिकांच्या संपर्कात त्यांच्या समस्या जाणून घेऊन सोडवल्या आहे स्फूर्ती फाउंडेशनच्या माध्यमातून दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते गरजू नागरिकांना  रक्तदानाचे मदत होईल. 


गौरीपाडा टावरी पाडा येथील शंकेश्वर प्रेसिडेन्सी येथे वास्तव्यास असलेल्या सोसायटीमध्ये मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रिडा मनोरंजन, उत्सव, पुढाकार अतिशय थाटामाटात मध्ये साजरी करण्यात येतात विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज जयंती, गणपती उत्सव, नवरात्र उत्सव यामध्ये नेहमी अग्रेसर राहत या माध्यमातून काही ना काही सामाजिक उपक्रम राबवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे तसेच पंचशिल मित्र मंडळ माध्यमातून साजरी करण्यात येत असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती च्या सुरुवातीच्या स्थापनेमध्ये ही त्यांनी पुढाकार घेत तेव्हापासून आजपर्यंत ही त्यांचा नेहमीच सहभाग असतो, शंकेश्वर प्रेसिडेन्सी ६५० सदनिका असलेल्या फेडरेशनचे सचिव असून तेथील छोट्या-मोठ्या समस्या कल्याण- डोंबिवली महानगरपालिकेच्या संबंधित समस्या सोडविण्यासाठी सदैव तत्पर असतात. 


मराठी शाळांमधील काही कुटुंबातील आर्थिक परिस्थितीमुळे विद्यार्थ्यांची फी भरणे शक्य नव्हते त्यासाठी पुढाकार घेत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून मुलांची फी भरण्यात आले. कोरोना संकटामध्ये मागील तीन वर्षांपासून सर्वांचीच परिस्थिती हालाखीची आहे पूअनेकांच्या नोकऱ्या गेल्या उद्योगधंदे ठप्प झाले शाळा बंद कॉलेज बंद त्यामुळे सर्व कडे जी परिस्थिती उद्भवली होती या परिस्थितीमध्ये स्फूर्ती फाउंडेशन व शंकेश्वर मित्र मंडळाच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांना मदत देण्याचा प्रयत्न या माध्यमातून  केला ज्यामध्ये अन्नधान्य वाटप असो , पोलीस बांधवना सुरक्षा किट,सोसायटीमधील नागरिकांना अल्प दरामध्ये भाजीपाला उपलब्ध, करून देणे असो डी मार्ट किराणा सुविधा उपलब्ध करून देणे असो ,माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या माध्यमातून औषध फवारणी आर्सेनिक गोळ्या उपलब्ध करून दिली नागरिकांना कोरोना झाल्यानंतर अनेक नागरिक पेशंट जवळ जात नव्हते परंतु त्यांनी पेशंटच्या जवळ जात त्यांना आधार देण्याचा त्यांचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रयत्न केला.स्फूती फाउंडेशन च्या माध्यमातून दरवर्षी महाराष्ट्रातील विविध शहरात क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांचा गुणगौरव व सन्मान हिरकणी पुरस्कार देऊन केला जातो या माध्यमातून खऱ्या अर्थाने महिला सक्षमीकरण व सबलीकरण करण्याचा उद्देश स्फूर्ती फाउंडेशनचा आहे दरवर्षी स्फूर्ती फाउंडेशन दिनदर्शिका माध्यमातून कार्याचा प्रचार आणि प्रसार लोकांपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करत असतात...

स्फूर्ती फाउंडेशन च्या माध्यमातून सामाजिक ,शैक्षणिक, आरोग्य कला क्रीडा ,क्षेत्रात विविध उपक्रम राबवत गरजू नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न केला त्यामध्ये कोल्हापूर मधील आलेला पूर असो ,कल्याण मध्ये आलेला पूर असो सदैव मदतीची भावना मनात ठेवत आधार देण्याचा प्रयत्न केला, तसेच झेप प्रतिष्ठान ठाणे या सामाजिक संस्थेच्या सोबत राहत विविध सामाजिक उपक्रमांमध्ये सहभाग घेतला हिवाळ्यामध्ये रस्त्यावर झोपणाऱ्या ब्लँकेट वाटप , आदिवासी पाड्यांवर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप असो, असे अनेक उपक्रम राबवत प्रतिष्ठानच्या माध्यमातून ते सक्रिय राहिले 

त्यांचे कार्य फक्त कल्याण पुरते मर्यादित नसून त्यांचे गाव असलेल्या संगमनेर तालुका जिल्हा अहमदनगर आंबी खालसा मुक्काम तांगडी येथेही आहे .. संपूर्ण जग आधुनिकतेकडे वळत होतो व त्यांच्या गावातील साधी मोबाईल नेटवर्क सुद्धा नव्हते फोनही लागत नव्हता आपण एवढ् शिक्षण घेऊन मोठे झालो परंतु जर आपण आपल्या मातृभूमीसाठी काही करू शकलो नाही तर त्याच्या इतकी खंत कोणतीच नसेल हि भावना‌ ठेवत २०१६ साली संगमनेर तालुक्यातील पठार भागांमध्ये मोबाईल नेटवर्क सुविधेसाठी सर्व शासकीय, खाजगी कंपनीकडे पाठपुरावा केला, स्थानिक आमदार नामदार बाळासाहेब थोरात अकोले तालुका आमदार वैभव पिचड यांच्याकडे पत्रव्यवहार केला आणि आपल्याला हि सुविधा मिळत नाही त्याचा रोष हा बाहेर आला आजूबाजूच्या सर्व गावांना एकत्रित करत मूळ खोरे पठार भाग संघर्ष समिती माध्यमातून २०१७ साली सर्व पक्षिय आंदोलन पुणे -नाशिक हायवे वर मोबाईल टॉवरवर चढून प्रशासना विरुद्ध निषेध केला हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचत सर्व माध्यमांनी याची दखल घेतली यामध्ये काँग्रेसचे सत्यजित तांबे, जि.प. सदस्य अजय फटांगरे, शिवसेना तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, मनसे नगर जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोके यामध्ये सहभागी झाले हे आंदोलन करून फक्त न थांबता औरंगाबाद येथील मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात मध्ये रिट याचिका दाखल करत प्रशासनाला मोबाईल सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडले त व खासगी कंपन्यांना पत्रव्यवहार करत त्यांना ही सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाग पाडले तसेच युवा विकास  प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य स्थापन करत तांगडी आंबीखालसा गावातील काही प्रमुख समस्या वर्षानुवर्षे प्रलंबित होत्या ज्या काही तांत्रिक अडचणीमुळे असो या काही जागी अभावी  या पूर्ण होत नव्हता हि मनात खंत होती त्यासाठी व्हिजन तांगडी २०२० संकल्प करत विविध विषय सोडवण्यासाठी एक व्हीजन तयार केले यामध्ये श्री ईश्वरेश्वर देवस्थान ३.५ किलोमीटरचा रस्ता वन विभागाच्या माध्यमातून व माजी आमदार वैभव पिचड यांच्या सहकार्याने पूर्ण केला ,तसेच आंबीखालसा तांगडी येथे वर्षानुवर्ष स्मशानभूमी ला जागा उपलब्ध होत नव्हती ती जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न युवा विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून करण्यात आला नदीवर अंत्यसंस्कार होते यामध्ये अनेक पाहुणे ,नागरिकांना पावसाळ्यात अडचणी येत होत्या नुकतेच त्या स्मशानभूमीच्या काम पूर्ण झालेले आहे त्याच बरोबर  तांगडी परिसरामधील दरेवाडी येथे पावसाळ्यामध्ये ओढ्याला पुरासारखे पाणी येत होतं नागरिकांची मागणी होती तेथे पूल झाला पाहिजे यासाठी माजी आमदार वैभव पिचड आमदार किरण लहामटे  यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला या पुलासाठी नुकताच आमदार किरण लहामटे यांच्या निधीतून १५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला भविष्यामध्ये श्री ईश्वेश्वर देवस्थान हे पर्यटन स्थळ व्हावे भव्य असे मंदिर असा संकल्प पासून फक्त ही मंदिर नसून न राहता येथे गोरगरीब गरजू नागरिकांची विवाह पार पडले पाहिजे या मंदिराच्या माध्यमातून आरोग्य सुविधा व गरजू लोकांना आधार भेटला पाहिजे या उद्देशाने हा संकल्प राबवण्याचा त्यांचा एक प्रयत्न आहे.. असे विविध सामाजिक शैक्षणिक आरोग्य कला क्रीडा क्षेत्रातील प्रत्येक क्षेत्राला त्यांनी स्पर्श करत नेहमी सदैव कार्यरत राहिले यामागे खऱ्या अर्थाने त्यांच्या घरातील कुटुंबाचाही साथ मिळत वडील ज्येष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर करतो त्यांची ,पत्नी शिल्पा तांगडकर ज्या स्वतःचा पार्लरचा व्यवसाय,त्यांची आई शारदा तांगडकर बंधू सुनिल तांगडकर, सुभाष तांगडकर, प्रसाद तांगडकर, ऋषिकेश तांगडकर प्रविण तांगडकर कुटुंबातील चुलते दिनकर तांगडकर, रामदास तांगडकर, नामदेव तांगडकर,जावई संतोष वाकळे, गणेश अरगडे, राजेश काळे ,किशोर चाळक, दिपक धावडे ,मंगेश फापाळे..बहिण मनिषा वाकले ,सुरेखा अरगडे ,प्रज्ञा तांगडकर,आरती त्यांना साथ देण्याच्या नेहमी प्रयत्न केलेला आहे जुन्नर तालुक्यातील सासू शांता कुटे,कारभारी कुटे, विनोद कुटे व संपूर्ण कुटे परिवाराची खंभीर साथ लाभत आहे.. कै. सिताराम तांगडकर ,कै भास्कर तांगडकर यांचा बजरंग तांगडकर यांच्या जीवनामध्ये लहानपणापासून जडणघडणीमध्ये ही सोबत राहिली आहे .. खऱ्या अर्थाने त्यांचे आजोबा कै. रखमाजी चिमाजी तांगडकर यांची शिकवण होती नेहमी चांगले कार्य करायचे ,समाजामध्ये चांगले राहायची चांगल्या लोकांच्या सहवासात राहायचे कोणाचे वाईट करायचे नाही कोणाचे वाईट चिंतायचे नाही एवढं चांगलं कार्य करा कि कोणी विचारल तर रखमा तांगडकर चा नातू असं सांगताना मला अभिमान वाटला पाहिजे अशी त्यांची इच्छा होती..तेच आचार, विचार शिकवण घेऊन बजरंग तांगडकर कार्यरत आहेत  वाढदिवसानिमित्त काहीतरी विशेष उपक्रम राबवावा अशी त्यांची मनोमन इच्छा होती कोरोना मध्ये अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत ,उद्योगधंदे ठप्प झाले आहे या निमित्ताने त्यांनी भव्य रोजगार मेळावा त्याचबरोबर ज्या शासकीय योजना गरजू नागरिकांपर्यंत, विधवा महिला, अपंग व दारिद्र रेषेखाली नागरीकांना पोहोचत नाही त्यांचा खऱ्या अर्थाने त्यांना लाभ होत नाही अशांसाठी सर्व शासकीय योजनांचे शिबीर, सर्व शासकीय कागदपत्रांचा शिबिर व आरोग्य शिबिराचे आयोजन केलेले आहे त्याच्यामध्ये आरोग्य तपासण्या, रक्त तपासणी, अल्प दरात शस्त्रक्रिया होणार आहे त्याचबरोबर रक्तदान शिबिराचे आयोजन केलेले आहे सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये रस्ता, वीज, पाणी या नित्यनेमाचे या अनेक वर्षांपासून असलेल्या समस्या आहेत त्या आहेत आणि चालतही राहतील परंतु कोरोनाने जे आर्थिक नुकसान झाले आहे ते भरून काढण्यासाठी आता भविष्यामध्ये खऱ्या अर्थाने गरज आहे त्या आर्थिक सक्षमीकरणाची  प्रत्येक कुटुंबाचे, प्रत्येक व्यक्तीचे नोकरी असो वा व्यवसाय मिळाला पाहिजे उद्देश घेऊन बजरंग तांगडकर व शिल्पा तांगडकर वाढदिवसानिमित्त संकल्प केला आहे.. असा हा सर्वसामान्य कुटुंबातील बजरंग तांगडकर यांचा थक्क करणारा प्रवास नेहमीच युवा तरुणांना स्फूर्ती देणारा व प्रेरणा देणारा ठरेल यामध्ये संदेह नाही..

गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न !!

गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेशन ॲण्ड रिसर्च महाविद्यालयाचा पदवीदान समारंभ संपन्न !!
 

कल्याण, (सौजन्य) इंडिया टि. व्ही : रोजी शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई संचलित गुरुकृपा कॉलेज ऑफ एज्युकेषन ॲण्ड रिसर्च कल्याण पश्चिम येथील वर्ष 2019-2021 मधील बी.एड् व एम.एड्. विद्यर्थ्यांचा पदवीदान समारंभ संपन्न झाला.

यावेळी समारंभाचे प्रमुख पाहुणे डी.बी. वीर सर (संस्थापक, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई), डॉ. पंकज वीर सर, (सचिव, शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ, मुंबई) यांनी भूषविले तसेच डॉ. व्ही.एस. शेट्टी सर (मुख्याध्यापक डी.एस.डी. स्कूल), सचिन आवळे सर (मुख्याध्यापक, ब्रायटन वर्ल्ड स्कूल), संजय दरगुडे सर (विभाग प्रमुख, गुरुकृपा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय), महेंद्र सोनावणे (मुख्याध्यापक, प्राथमिक विद्यालय), प्रतिक्षा पवार (विभागप्रमुख, डी. एस.डी. प्रायमरी स्कुल, कल्याण) कार्यक्रमास उपस्थित होते.
दिपप्रज्वलनानंतर महाविद्यलाय प्राचार्य, डॉ. विद्युलता कोल्हे मॅडम यांनी महाविद्यलायाच्या 2020-21 या वार्शिक अहवालाचे वाचन केले.

वर्ष 2021-22 मधील एम.एड्. विद्यार्थ्यांनी साकारलेले टेक्नो प्लॅनेट’ या मासिकेचे व बी.एड्. विद्यार्थ्यांनी साकारलेले ‘आझादी का अमृत महोत्सव’ या विषया अंतर्गत तयार केलेल्या मासिकांचा अनावरण सोहळा डी.बी.वीर सर आणि डॉ. पंकज वीर सर यांच्या हस्ते पार पडला. वर्ष 2019-21 मधील महाविद्यालयातील मुंबई विद्यापीठ अंतर्गत बी.एड्. व एम.एड्.परिक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे व मान्यवरांच्या हस्ते पदवी वाटप करण्यात आले. बी.एड. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त प्रज्ञा पटनाईक, एम.एड्. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त- रोहीत तोमर, डी.एल.एड्. विभागातून प्रथम क्रमांक प्राप्त दिक्षा सिंग आणि  2020-21 मधील महाविद्यालयीन विद्यार्थी अर्चना पवन भोईर सेट परिक्षा उत्तीर्ण व शेख खलिदा मुखतार सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण केल्याबद्दल स्मृतीचिन्हं आणि प्रमाणपत्र देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले.

महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ. पंकज वीर सर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना ज्ञानाचा सदुपयोग कसा करावा आजच्या परिस्थितीला सामोरे कसे जावे याबाबत विविध उदाहरणाद्वारे उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतामधून कार्यक्रमाच्या नियोजनाविषयी कौतुक केले व जुन्या आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्राची परंपरा राखणारे कोळी नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. सदर कार्यक्रमास उपस्थित संस्थेतील सर्व विभागांचे विभाग प्रमुख मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी यांनी समारंभ यशस्वी करण्यासाठी योगदान दिले. आभारप्रदर्शन डॉ. नितीन गाढे यांनी केले. अशा प्रकारे आनंदी वातावरणात पदवीदान समारंभ संपन्न झाला.

बौद्धजन सहकारी संघ पिंपर विभाग तर्फे पालशेत येथे सर्व महापुरुष व महामाता यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी !!

बौद्धजन सहकारी संघ पिंपर विभाग तर्फे पालशेत येथे सर्व महापुरुष व महामाता यांची संयुक्तिक जयंती उत्साहात साजरी !!


[ निवोशी/गुहागर- उदय दणदणे ] :

बौद्धजन सहकारी संघ, विभाग क्र.०५ (पिंपर विभाग) यांची रविवार दि.२४ एप्रिल २०२२ रोजी शाखा क्र.३९, पालशेत, ता. गुहागर येथे सर्व महापुरुष व महामाता यांची संयुक्तिक जयंती मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. 


सदर कार्यक्रमाची सुरुवात विभागाचे अध्यक्ष आयु. दिलीप सदाशिव जाधव (अडूर) यांच्या हस्ते धम्माचे प्रतीक असलेला पंचरंगी ध्वज फडकावून करण्यात आली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची  लेखणी प्रतीक निळ्या ध्वजाचे पालशेत शाखेचे अध्यक्ष आयु. मनोज नागे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. 


सर्व महापुरुष व महामाता यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आल्यानंतर पालशेत शाखेतील लहान मुलांनी त्यांच्या सुमधुर वाणीने धम्म पूजा पाठ पठण केले. कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर व प्रमुख वक्ते म्हणुन आयु. लंकेश गजभिये सर (प्राध्यापक, पाटपन्हाळे महाविद्यालय, गुहागर), तालुक्यातील प्रशिक्षित श्रामणेर सुप्रिय शशिकांत जाधव (वरवेली), रुपेश सुरेश सावंत (गुहागर), निलेश चंद्रकांत गमरे (चिखली) तसेच मध्यवर्ती गाव कमिठीचे चेअरमन आयु. विश्वनाथ कदम (पाटपन्हाळे), सरचिटणीस आयु. महेंद्र मोहिते (कौढर), चिटणीस विश्वास मोहिते (पवार साखरी), विश्वस्त आयु. राजेश पवार (वाघांबे), उपाध्यक्ष व विभाग ०५ चे सल्लागार आयु. संतोष दामले (साखरी आगर), विभाग क्र.०५ चे अध्यक्ष आयु. दिलीप सदाशिव जाधव (अडुर), उपाध्यक्ष आयु. मिलिंद पवार (वाघांबे), सरचिटणीस आयु. प्रशांत कदम (उमराठ), कोषाध्यक्ष आयु. प्रभाकर मोहिते (पालशेत), विभाग अधिकारी आयु. संजय जाधव (हेदवी), माजी विभाग अधिकारी आयु. उदय जाधव (हेदवी), तालुका व विभाग माजी कार्यकर्ते आयु.वसंत कदम (उमराठ), आयु. दत्ताराम कदम (पिंपर), आयु. सुभाष जाधव (अडुर), आयु. विनायक कदम (उमराठ), आयु. अशोक नागे (पालशेत), आयु. विनायक नागे (पालशेत), आयु. जगन्नाथ मोहिते (पालशेत), आयु. निलेश नागे सर (पालशेत), आयु. दीपक पवार (तवसाळ), आयु. अनंत जाधव (अडुर), आयु. दीपक नागे (पालशेत), त्यानंतर महिला ग्रामपंचायत सदस्या आयु. नि. समिक्षा शैलेश घाग ( पिंपर ), आयु. नी. मधुरा मनोज नागे (तवसाळ), आयु, नि. सायली संजय जाधव (हेदवी), या सर्व मान्यवरांचा विभाग क्र.५ तर्फे सत्कार करण्यात आला. त्यानंतर विभागातील विद्यार्थी व महिलांनी महापुरुष, महामाता यांच्या  जीवनावर भाषणे केली. त्यांना विभागामार्फत प्रमाणपत्र व वस्तू भेट देऊन गौरविण्यात आले, त्यानंतर विभागातील १०वी, १२वी, पदवी, तसेच इतर क्षेत्रात प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थी, महिला व पुरुष यांना प्रमाणपत्र व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. यामध्ये  पालशेत शाखेतील कु. श्रावणी अशोक नागे हिने १४ एप्रिल २०२२ रोजी गुहागर येथे जिल्हास्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धेत ५२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक संपादन केले तसेच ४८व्या राज्यस्तरीय ज्युनियर ज्युडो स्पर्धा २०२२ (पुणे) मध्ये निवड झाली त्याबद्दल तिचे अभिनंदन, तसेच आयुष प्रशांत मोहिते (पालशेत) शिरगाव येथील प्रश्नमंजुषा स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला, श्रुती संतोष नागे (पालशेत) हिने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षा प्रथम क्रमांक पटकावला, तसेच प्रसाद मनोज नागे (पालशेत) व सोनिया मनोज नागे (पालशेत) यांनी गणित विषयामध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. तसेच महिला ग्राम पंचायत सदस्या, सर्व श्रामणेर यांच्या उल्लेखनीय कामगिरी बद्दल प्रशस्ती प्रत्रक व भेटवस्तू देऊन सर्वांना गौरविण्यात आले. 


तसेच पालशेत शाखेतील महिलांनी विभागातील महिलांकरिता स्नेहमेळावा आयोजित केला होता, त्याला सर्व महिलांनी उस्फुर्त प्रतिसाद दिली. प्रमुख प्रवक्ते प्रा. लंकेश गजभिये यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक व राजकीय विचार व सद्या अस्तित्वात त्यांच्या विचारांची होत असलेली पायमल्ली, खास करून राजकीय नेते गटबाजी करून समाजाची, बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची करीत असलेली विभागणी यांवर प्रकाश टाकला. तसेच स्पर्धा परीक्षा बाबतीत मार्गदर्शन केले तसेच श्रामनेर सुप्रीय शशिकांत जाधव यांनी  बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची अनेक पुस्तके सर्वां समोर आपल्या उत्तम शैलीत मांडली व सर्वांना मंत्रमुग्ध केले. अशा प्रकारे अनेक मान्यवर यांनी आपले विचार मांडले व शेवटी अध्यक्ष दिलीप जाधव यांनी  सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. यावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विभागाचे सरचिटणीस प्रशांत कदम यांनी केले व त्यांना कोषाध्यक्ष प्रभाकर मोहिते यांनी उत्तम साथ दिली.

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता, आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल !!

१०० कोटी वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना क्लीन चिट मिळण्याची शक्यता, आरोपांत तथ्य नसल्याचा चांदीवाल आयोगाचा अहवाल !!


भिवंडी, दिं,२६, अरुण पाटील (कोपर) :
            १०० कोटींच्या वसुली प्रकरणात चांदिवाल आयोगाने आपला अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेले आरोप खोटे असल्याचे आयोगाने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट करण्यात आल्याची माहिती आहे.


             परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपात तथ्य नसल्याचे आयोगाच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळे अनिल देशमुखांना क्लिन चिट मिळणार असल्याची शक्यता आहे. १०० कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मंत्रिपद सोडावे लागले होते.
           २० मार्च २०२१ या दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केला होता. या आरोपाने राज्यात एकच खळबळ उडाली होती.
                 या प्रकरणी आरोपांची शाहनिशा करण्यासाठी राज्य सरकारने चांदिवाल आयोगाची स्थापना केली होती. मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश कैलास उत्तमचंद चांदीवाल या न्यायाधीशांची या आयोगाच्या अध्यक्षस्थानी नेमणूक केली. कोविडच्या काळातही या चौकशी आयोगाने आपले कामकाज सुरुच ठेवले होते.
              मुंबई पोलीस खात्यामध्ये पुन्हा सामावून घेण्यात आलेल्या सचिन वाझे या अधिकाऱ्याला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांच्या शासकीय निवासस्थानावर बोलावून घेतले होते. या दरम्यान त्यांनी सचिन वाझे यांना सांगितले होते की, मुंबईत १७५०बार आहेत. प्रत्येक बारकडून २ ते ३ लाख रुपयांची वसुली दर महिन्याला केल्यास ४० ते ५० कोटी रुपयांचा टार्गेट हे पूर्ण केले जाऊ शकते. उरलेले ५० कोटींच्या टार्गेटसाठी इतर माध्यमातून प्रयत्न करावा लागेल, असे सांगून दर महिन्याला १०० कोटी रुपयांची वसुली करण्यास त्यांना सांगण्यात आल्याचा आरोप परमबीर सिंग यांनी पत्रात केला होता.
              याशिवाय, दादरा नगर हवेलीचे अपक्ष खासदार मोहन डेलकर यांनी मुंबईतील ग्रीन सी हॉटेलमध्ये आत्महत्या केल्यानंतर या संदर्भात सुसाईड नोटच्या आधारावर आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा मुंबई पोलिसांकडे नोंद घेण्यात यावा, म्हणून गृहमंत्री हे आग्रही होते. मात्र, मुंबई पोलीस आयुक्त म्हणून मी माझा अनुभव त्यांना सांगून या संदर्भात आपण कायदेशीर सल्ला घेऊन कारवाई करावी, असे सुचवले होते.
              प्रथम दर्शनी डेलकर यांनी आत्महत्या केली होती. यास त्यांनी दादरा -नगर हवेली येथील प्रशासन व काही अधिकार्‍यांची नावे सुसाईड नोटमध्ये लिहिलेली होती. त्यामुळे या प्रकरणाचा तपास हा दादरा-नगर हवेलीच्या पोलिसांकडून करण्यात यावा, असे मी सुचवले होते, आसा दावाही परमबीर यांनी पत्रात केला होता.

सेवा हा स्काऊट्सचा धर्म; स्काऊट्स गाईडने देशसेवेचा संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी !!

सेवा हा स्काऊट्सचा धर्म; स्काऊट्स गाईडने देशसेवेचा संकल्प करावा : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी !!


मुंबई, आजाद श्रीवास्तव : सेवा हा स्काऊट्सचा धर्म आहे. प्रत्येक स्काऊट आणि गाईड हा केवळ आपल्या कुटुंबाचा सदस्य नसतो तर तो समाजाचा व देशाचा देखील सदस्य असतो. त्यामुळे स्काऊट्स सदस्यांनी आपल्या प्रतिज्ञेला जगात देशासाठी सेवा करण्याचा संकल्प करावा व राज्याचे तसेच देशाचे नाव मोठे करावे, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.  


राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राज्याच्या विविध जिल्ह्यांमधील १४५ स्काऊट्स व गाईड्स यांना सन २०१८-२०१९ व २०१९- २०२० या वर्षांतील राज्यस्तरीय स्काऊट - गाईड्स राज्य पुरस्कार प्रमाणपत्र मंगळवारी (दि. २६) वितरीत करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.


स्काऊट गाईड पॅव्हिलियन, शिवाजी पार्क, मुंबई येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाला राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट्स व गाईडचे अध्यक्ष सुनील केदार, राज्यमंत्री आदिती तटकरे, स्काऊट व गाईडचे राज्य मुख्य आयुक्त ओमप्रकाश बकोरिया व सरचिटणीस एन बी मोटे प्रामुख्याने उपस्थित होते.


पासष्ट वर्षांपूर्वी दुर्गम गावातील आपल्या शाळेत एनसीसी वगैरे काही नव्हते त्यावेळी आपण स्वतः स्काऊट म्हणून रुजू झालो होतो व स्काऊट्सच्या सहली व शिबिरांना उपस्थित राहिल्याचे सांगून स्काऊट मध्ये राहून अनुशासन व शिस्त या गुणांचे महत्व कळते असे राज्यपाल कोश्यारी यांनी यावेळी सांगितले. 


चांगले काम केले तर प्रत्येकदा प्रमाणपत्र मिळणार नाही, परंतु समाजाकडून आशीर्वाद अवश्य मिळतील व ते अधिक मोलाचे असतात असा मंत्र राज्यपालांनी स्काऊट्स व गाईड्सना दिला.   'दया कर दान भक्ती का', ही स्काऊट्सची प्रार्थना केवळ म्हणण्यासाठी नसून ती जीवनात आचरणात आणण्यासाठी आहे असे सांगून आपल्या वाट्याला जे काही काम आले ते सर्वोत्तम करावे असे राज्यपालांनी सांगितले. 

भारत हा सरासरी २५-२६ वर्षे वय असलेला युवकांचा देश आहे, त्यामुळे युवकांना घडविल्यास देशाची प्रगती होईल असे क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी यावेळी सांगितले. राज्याच्या विभागीय स्तरावर स्काऊट्स - गाईड, एनसीसी व राष्ट्रीय सेवा योजना यांचा संयुक्त कार्यक्रम आयोजित करावा अशी सूचना सुनील केदार यांनी केली. 

एकशे चौदा वर्षांपूर्वी स्थापन झालेली  स्काऊट गाईड ही चळवळ ग्रामीण भागात पोहोचावी व मुलींचा आत्मसन्मान वाढून त्यांचे सक्षमीकरण व्हावे अशी अपेक्षा राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केली. 

देशातील स्काऊट गाईड मध्ये महाराष्ट्राचे प्रमाण २२ टक्के इतके आहे असे सांगून हे प्रमाण पुढील काही वर्षात ५० टक्के नेण्याचे उद्दिष्ट असल्याचे राज्याचे मुख्य स्काऊट गाईड आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी यावेळी सांगितले. एन बी मोटे यांनी आभारप्रदर्शन केले.


शासकीय विश्राम गृह माणगाव येथे २८ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी दक्षिण रायगड जिल्हा नुतन कार्यकारिणीच्या मुलाखतींचे आयोजन !!

शासकीय विश्राम गृह माणगाव येथे २८ एप्रिल रोजी वंचित बहुजन आघाडी दक्षिण रायगड जिल्हा नुतन कार्यकारिणीच्या मुलाखतींचे आयोजन !!
     
  
      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) : वंचित बहुजन आघाडी च्या माध्यमातून सर्व आजी माजी पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सभासद यांना सूचीत करण्यात येते की, दक्षिण रायगड जिल्हा कार्यकारणी सर्व पदाच्या मुलाखती २८ एप्रिल रोजी  दुपारी १ ते ३ या वेळेत माणगाव शासकीय विश्राम गृह येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. 
       या संदर्भात दक्षिण रायगड जिल्ह्यातील सर्व कार्यकर्ते आजी-माजी पदाधिकारी सभासद यांना सूचित करण्यात येते की, भौगोलिक दृष्ट्या रायगड जिल्हा विचारात घेतला असता यामध्ये 15 तालुके येतात आणि जिल्ह्याचा कारभार सुरळीत तसेच मोठ्या प्रमाणात होण्याकरिता रायगड जिल्ह्याचे रायगड दक्षिण आणि उत्तर अशा दोन विभागांमध्ये विभाजन करण्यात आले आहे.
     रायगड जिल्हा दक्षिण विभाग  जिल्हा कार्यकारणी तयार करण्या संदर्भात मुलाखती दिनांक २८ एप्रिल २०२२ रोजी, वेळ दुपारी  ०१ ते ०३, ठिकाण माणगांव शासकीय विश्रामगृह या ठिकाणी आयोजित करण्यात आल्या असून सदर मुलाखती करिता प्रमुख उपस्थिती म्हणून वंचित बहुजन आघाडी महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष सर्वजीत बनसोडे उपस्थित राहणार असून  रायगड जिल्हा दक्षिण मधील पोलादपूर, महाड, माणगांव, म्हसळा, तळा, श्रीवर्धन, मुरुड, रोहा. या तालुक्यांमधून "रायगड जिल्हा दक्षिण" जिल्हाकार्यकारणी तयार  करण्यात येणार असून सदर निवड थेट मुलाखती मार्फत होणार असून "अध्यक्ष रायगड जिल्हा दक्षिण, जिल्हा उपाध्यक्ष, महासचिव, संघटक तसेच इतर जिल्हा पदांकरिता होणार असून इच्छुक उमेदवारांनी सदर मुलाखतीस येताना आपले परिचय पत्र घेऊन येणे. असे अॅड. प्रियदर्शी तेलंग रायगड जिल्हा प्रभारी वंचित बहुजन आघाडी यांनी प्रसार माध्यमांना प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !!

मास्टर मरीन मेहर यार्ड कंपनीविरोधात गेट बंद आंदोलन सुरू; मागण्या अमान्य केल्याने आंदोलन तीव्र !! *स्थानिकांना रोजगार आणि प्रकल्पग्रस्तांना स...