"के. बी. महिला महाविद्यालया"त कृत्रिम बुद्धिमतेवर राष्ट्रीय परिषद संपन्न !
ठाणे, प्रतिनिधी : एक्सेलसियर एज्युकेशन सोसायटीच्या, के. बी. कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, ठाणे 'आय क्यू ए सी आणि बीएस सी आयटी' विभागाच्या संयुक्त विद्यमाने, तसेच संस्थेचे अध्यक्षा डॉ. हर्ष खन्ना, व्यवस्थापकीय संचालक डॉ. साई किरण व संचालक श्रीमती पुष्पा नारंग यांच्या सहकार्याने एक दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन शनिवार, दि.१/३/२०२५ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये केले होते. या परिषदेचा विषय होता, ' कृत्रिम बुद्धिमत्तेचा शिक्षण व संशोधनावरील परिणाम: एक जागतिक क्रांती '
संस्थेच्या प्रथेप्रमाणे परिषदेचे उद्घाटन मुंबई विद्यापीठाच्या वाणिज्य शाखेचे अधिष्ठाता, डॉ. रविंद्र भांबर्डेकर यांच्या हस्ते व प्रमुख वक्ते, एआय तज्ञ श्री. रवी अय्यर, डॉ. अनुषा रामानाथन,
माजी प्राचार्या डॉ. रेणू त्रिवेदी व प्राचार्य डॉ. विनायक राजे यांच्या उपस्थितीत दिप प्रज्वलन व सरस्वती वंदनेने झाले. ५० मिनीटाच्या या उद्घाटनाच्या पहिल्या सत्रात प्रमुख वक्त्यांनी कृत्रीम बुद्धीमतेचे आधुनिक शिक्षण व संशोधनांवर वर होत असलेल्या चांगल्या वाईट परिणामांची अत्यंत अभ्यासपूर्ण विवेचन उपस्थित अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांसमोर केले.
त्यांनतर दिड तासाच्या महत्वाच्या दुसर्या सत्रात पॅनल डिस्कशनद्वारे निमंत्रीत वक्त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानामुळे अर्थीक व कौशल्य विकास, नोकरीच्या संधी, आव्हाने व उपाय इत्यादी विषयांवर अभ्यासपूर्ण मांडणी केली. तसेच काहींच्या प्रश्नांनाही समाधानकारक उत्तरे दिली. यामध्ये टाटा समाजशास्त्र संस्थेच्या प्राध्यापिका, डॉ. अनुषा रामानाथन, एआयचे तज्ञ, श्री. रवी अय्यर व प्राचार्य डॉ. महेंद्र कनोजिया, डॉ. विलास नितनवरे व डॉ. आरती बक्षी यांचा समावेश होता.
दुपारच्या जेवणानंतरच्या तिसर्या सत्रात सहभागी अभ्यासकांचे 'कृत्रिम बुद्धिमत्ता' विषयावरील पेपर सादरीकरण आयोजित केले होते. यामध्ये मुंबईसह मध्यप्रदेश, ओरीसा, गोवा, छत्तीसगड या राज्यातील महाविद्यालयातून सहभागी झालेल्या निवडक १२ प्रतिनीधीना संधी देण्यात आली. त्यांनीदेखील वरील विषयावरील त्यांचे अभ्यासपूर्ण प्रेझेन्टेशन केले. या सत्राचे परिक्षण डॉ. निता पाटील यांनी केले.
समारोपाच्या शेवटच्या सत्रात प्राचार्य डॉ. विनायक राजे यांनी सर्व सहभागी वक्ते, अभ्यासक, शिक्षक व विद्यार्थ्यांचे आभार मानले व सर्वांना प्रमाणपत्रांचे वाटप केले. तसेच परिषद यशस्वी करण्यासाठी हातभार लावलेल्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सदर राष्ट्रीय परिषद यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी माजी प्राचार्या डॉ. रेणू त्रिवेदी, जेष्ठ प्राध्यापिका डॉ. सीमा झा व प्राचार्य डॉ. विनायक राजे यांच्या मार्गदर्शनाखाली, डॉ. उषा भंडारे यांच्या नेतृत्वात प्रा. सुनंदा बसागरे, प्रा. राणी पोडीचेट्टी, प्रा. प्रज्ञा गरड व प्रा. सुवर्णा सावंत यांनी मागिल दिड महिन्यापासून भरपूर मेहनत घेतली.
सौजन्य -
डॉ. उषा भंडारे (निमंत्रक)