Thursday, 31 July 2025

महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी सुरेंद्र आढाव यांची नियुक्ती !!

महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या सचिव पदी कल्याण येथील सुरेंद्र आढाव यांची नियुक्ती !!

कल्याण, प्रतिनिधी : कल्याणमधील काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते, तथा कल्याण डोबिवली महापालिका माजी परिवहन सदस्य सुरेन्द्र आढाव यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिवपदी दुसऱ्यांदा नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनी जाहीर केलेल्या यादीत आढाव यांचे नाव आहे.

सुरेंद्र आढाव यांनी या आधी युवक कॉग्रेस कल्याण शहर उपाध्यक्ष, युवक कॉंग्रेस कल्याण शहर जिल्हा प्रवक्ता, अनुसूचित जाती विभाग कल्याण डोंबिवली शहर जिल्हा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश सचिव अशी पदे भूषवली असून त्यांनी केलेल्या चांगल्या कामामुळे पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर प्रदेश सचिवपदाची जवाबदारी सोपवली आहे. आढाव यांच्या नियुक्तीबद्दल त्यांचे काँग्रेस पक्षासह सर्वच राजकीय पक्ष आणि सामान्य नागरिकांकडून अभिनंदन होत असून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

तर पक्षाशी असलेली निष्ठा आणि प्रामाणिक कार्य पाहता माजी आमदार संजय दत्त यांच्या आशिर्वादाने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव पदी आपली पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. आपण गरीब परिवारातून आणि दलित वर्गातून असून देखील पक्षाने पुन्हा एकदा मोठी जवाबदारी दिली आहे. राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, कॉग्रेसच्या जेष्ठ नेत्या सोनिया गांधी, विरोधीपक्ष नेते खासदार राहुल गांधी, प्रियांका गांधी, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल, रमेश चेनीथला, प्रांत अध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ, व्ही. पी. व्यंकटेश, माजी आमदार संजय दत्त आणि पक्षाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवत संघटना वाढीसाठी काम करणार असल्याचे सुरेन्द्र आढाव यांनी सांगितले.

३९व्या आगरी सेना वर्धापन दिनानिमित्त मुरबाड मध्ये स्वच्छता मोहीम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..

३९व्या आगरी सेना वर्धापन दिनानिमित्त मुरबाड मध्ये स्वच्छता मोहीम कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न..

मुरबाड (मंगल डोंगरे) : रविवार, दि. २७ जुलै २०२५ रोजी हुतात्मा हिराजी गोमाजी पाटील स्मारक, मुरबाड येथे आगरी सेना मुरबाडच्या वतीने स्वच्छता मोहीम कार्यक्रम अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत उत्साहवर्धक वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

याप्रसंगी ॲड. महेश अशोक भगत(अध्यक्ष, अगरीसेना मुरबाड तालुका) यांच्या नेतृत्वाखाली *आगरी सेनेचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते* यांच्यासोबत समाजातील अनेक मान्यवर, श्री. पांडुरंगजी शेळके (उपाध्यक्ष, आगरीसेना ठाणे जिल्हा ग्रा.), श्री. दिपकभाऊ खाटेघरे (सभापती, कृ.उ.बा. समिती मुरबाड), श्री भगवान भगत सर (जिल्हाध्यक्ष, प्रा. शिक्षक संघ ठाणे), श्री. नारायण दादा गोंधळी (मा. उपनगराध्यक्ष नगरपंचायत मुरबाड), सौ. दिक्षिता वारघडे (उपनगराध्यक्षा, मुरबाड नगरपंचायत), श्री. मोहनभाऊ गडगे (नगरसेवक, मुरबाड नगरपंचायत), श्री. नितीन राणे सर (सचिव, आधार फाउंडेशन मुरबाड), श्री. ज्ञानेश्वरजी भोईर (ग्रामसेवक), श्री. महेंद्र पवार सर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. सिताराम राणे (पो.पा. धानिवली), श्री. विलास भांडे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. रघुनाथ भांडे (मा. सरपंच, देवगाव), श्री. मार्तंड टेकडे (सामाजिक कार्यकर्ते), श्री हरेश तुपे (सामाजिक कार्यकर्ते), ॲड. नितेश खारीक (सामाजिक कार्यकर्ते), श्री. चेतन गोल्हे (उपसरपंच, मानिवली), श्री योगीराज हुमणे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. भाऊ कालेकर (सामाजिक कार्यकर्ते), श्री. भालचंद्र बाबरे (सामाजिक कार्यकर्ते), श्री. अरुण धुमाळ (सामाजिक कार्यकर्ते), श्री. नरेश शेळके (सामाजिक कार्यकर्ते) यांनी आपले बहुमूल्य योगदान देत उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली. आणि अतिशय परिश्रम घेत स्वच्छता मोहीम यशस्वी करून आगरी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी येत्या १ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न होणाऱ्या ३९ व्या अगरीसेना वर्धापन दिनासाठी शुभेच्छा दिल्या.

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कोकण संस्था मुंबईत सन्मानित !!

आरोग्य क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी कोकण संस्था मुंबईत सन्मानित !!

*** कोकण एनजीओ इंडिया ही संस्था गेल्या दशकभरात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो मुलांचे जीव वाचवण्यात यशस्वी

मुंबई (शांताराम गुडेकर/समीर खाडिलकर) :

                वॉकहार्ट हॉस्पिटल्स, मुंबई सेंट्रल येथे आज आयोजित केलेल्या एका सामाजिक सत्कार समारंभात कोकण एनजीओ इंडियाला गरजू व वैद्यकीय दृष्ट्या संकटात असलेल्या घटकांसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल गौरवण्यात आले. गेल्या १३ वर्षांपासून संस्था गरजू रुग्णांसाठी, विशेषतः जीवघेण्या आजाराने ग्रस्त मुलांसाठी, अहोरात्र झटत आहे. आज पर्यंत संस्थेने अनेक समाजपयोगी, शैक्षणिक उपक्रमातून लाखो लोकांना मदत पोहोचवली असून संस्थेला अनेक राष्ट्रीय पुरस्कारांनी  याआधीही सन्मानित करण्यात आले आहे.
            आज झालेल्या या कार्यक्रमात संस्थेचे श्री. सूरज कदम आणि कु. स्वाती नलावडे यांनी कोकण एनजीओ इंडियाच्या वतीने हा सन्मान स्वीकृत केला. "सामाजिक सेवेचा सन्मान " या संकल्पनेवर आधारित हा कार्यक्रम आज येथे आयोजित करण्यात आला होता.
           कोकण एनजीओ इंडिया ही संस्था गेल्या दशकभरात दुर्धर आजाराने ग्रस्त असलेल्या शेकडो मुलांचे जीव वाचवण्यात यशस्वी झाली असून, २०३० पर्यंत ३० लाख गरजू लोकांची सेवा करण्याचे उद्दिष्ट संस्थेने निश्चित केले आहे. वॉकहार्ट हॉस्पिटल्सने कोकण संस्थेच्या सेवाभावी वृत्ती, बांधिलकी व समर्पणाचे विशेष कौतुक केले आणि अशा कार्यामुळे आरोग्य सेवांमध्ये सकारात्मक बदल घडत असल्याचे नमूद केले.

जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे तर्फे मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप !!

जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवे तर्फे मोरा शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्याचे मोफत वाटप !!

उरण दि ३१, (विठ्ठल ममताबादे) : जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था,उलवे यांच्या तर्फे जे.एम. म्हात्रे प्राथमिक शाळा व न्यू  इंग्लिश स्कूल मोरा  - उरण या शाळेतील पहिली ते दहावी पर्यंतच्या सर्व गरीब गरजू  विद्यार्थ्यांना चालू शैक्षणिक वर्षी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थे मार्फत २५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वह्या, पेन्सिल, पेन पट्टी आदी शैक्षणिक साहित्यांचे वाटप करण्यात आले.जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील ठाकूर व पदाधिकारी दिनेश पाटील (बंधू), वटवृक्ष सामाजिक संस्थेचे अध्यक्ष किरण मढवी, नंदकुमार वाजेकर, अनिश पाटील, भानुदास  वास्कर, चिंतामण पाटील, अंजू पाटील, रवींद्र भोईर  यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच विनोद तारेकर व रोहिणी तारेकर यांच्या सहकार्याने विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात  आले. प्राथमिक शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ गावंड यांनी आपल्या प्रास्ताविका मध्ये काही भौतिक सुविधा कशा उपलब्ध करून घेतल्या या संदर्भात माहिती दिली. तसेच या शाळेमध्ये आज गरीब गरजू विद्यार्थी मोफत शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती व्हावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जातात. त्यापैकीच एक उपक्रम म्हणजे शैक्षणिक साहित्याचा वाटप हे वाटप जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेने केल्यामुळे त्यांचे शाळेच्या वतीने आभार मानतो असे मनोगत साईनाथ गावंड यांनी व्यक्त केले .माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर यांनी आपल्या मनोगतातून  जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था उलवेच्या कार्याबद्दल माहिती सांगितली तसेच शालेय भौतिक सुविधांबद्दल माहिती दिली. शैक्षणिक साहित्य देणाऱ्या संस्थेचे आभार व्यक्त  केले. दिनेश पाटील  यांनी आपल्या मनोगतामधून  जाणीव सामाजिक सेवाभावी संस्था, उलवे राबवत असलेल्या उपक्रमाबद्दल माहिती दिली. तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांनी आपली दिशा निश्चित करणे गरजेचे आहे. तसेच आपण जन्मताच गरीब असलो तरी शिक्षण घेऊन आपण मोठे व्हायचं आहे आणि समाजामध्ये नाव कमवायचा आहे. हीच आपलं श्रीमंती. शिक्षणासाठी जी काही मदत लागेल ते आम्ही करायला तयार आहोत असा शब्द दिला. कार्यक्रमाचे अध्यक्ष मनोज ठाकूर  वनवासी कल्याण आश्रम उरण यांनी देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर भाषण करून काही विद्यार्थ्यांना जर शिक्षणात अडचणी येत असतील तर त्या  दूर करू व त्यांना पुढील उच्च शिक्षण चांगल्या प्रतीचे देऊ असे शब्द दिले.

           या प्रसंगी जाणीव सामाजिक सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुनील ठाकूर, दिनेश पाटील तसेच सर्व पदाधिकारी, माध्यमिक शाळेचे चेअरमन पी. एम. कोळी, प्राथमिक शाळेचे चेअरमन चंद्रकांत कोळी, माध्यमिकचे मुख्याध्यापक सुधीर मुंबईकर, प्रभारी मुख्याध्यापक साईनाथ  गावंड, सहाय्यक शिक्षक सुगिंद्र म्हात्रे, अनिल पाटील, मनोज म्हात्रे, स्वप्निल नागमोती, रोहिणी घरत, सुनीता पाटील, राणी कदम, सुप्रिया मुंबईकर, सत्यवान मर्चंडे, रुपाली चौधरी, कोल्हे मॅडम, शिक्षक, विद्यार्थी व पालक वर्ग उपस्थित होते. कार्यक्रमाची सजावट घनश्याम म्हात्रे,दिनेश पाटील व ममता गवस यांनी केली. सूत्रसंचालन अनिल पाटील यांनी केले. सहाय्यक शिक्षिका रोहिणी घरत यांनी आभार व्यक्त करून कार्यक्रम संपल्याचे जाहीर केले.

शिक्षणासाठी झगडणाऱ्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न !

शिक्षणासाठी झगडणाऱ्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न !

मुंबई, (पी. डी. पाटील) : महाराष्ट्र प्रदेश रात्रप्रशाला मुख्याध्यापक संघ आणि छात्र भारती यांच्या वतीने दहावी व बारावीच्या रात्रशाळा विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा नुकताच दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात उत्साहात पार पडला. कार्यक्रमात १०० हून अधिक रात्रशाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य (बॕग, वह्या, पाणी बॉटल, कंपासपेटी) व रोख रक्कम म्हणून देण्यात आले. मॉर्निंग वॉकिंग ग्रुपचे प्रमुख सुभाष भाई आणि सुमनबाई यांच्या तर्फे हे शैक्षणिक साहित्य देणगी म्हणून देण्यात आले होते. 

समाजवादी नेते माजी आमदार साथी कपिल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात लोककवी अरुण म्हात्रे, शिक्षक भारतीचे अध्यक्ष अशोक बेलसरे, कार्याध्यक्ष सुभाष मोरे, राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील आणि राज्याध्यक्ष राजा कांदळकर, रात्रशाळा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत म्हात्रे आणि छात्र भारतीचे अध्यक्ष रोहित ढाले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय डी.एन. त्रिवेदी, एस. वाय. देशपांडे, डी. एस. पवार, जी. टी. पाटील, माताचरण मिश्रा हे ज्येष्ठ पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते. संस्थेचे शिवाजी खैरमोडे, राधिका महांकाळ, दत्तात्रेय सोनवणे, अमोल गंगावणे, रवी कांबळे, सचिन काकड, विकास पटेकर, चेतन पाटील इ. कार्यकर्त्यांनी कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. या कार्यक्रमाला मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनंदा कदम यांनी केले.

*मुलुंड येथे "ओळख कोकणातील रानभाज्यांची " महोत्सवाचे आयोजन !!

*मुलुंड येथे "ओळख कोकणातील रानभाज्यांची " महोत्सवाचे आयोजन !!

मुंबई, (पी.डी. पाटील) : "मराठमोळं मुलुंड" आणि "महाराष्ट्र शासनाचा कृषी विभाग" ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवार, दिनांक ०२ ऑगस्ट रोजी मुलुंड हायस्कूल हॉल, युनियन बँक (जुनी- आन्ध्र बँकेच्या जवळ), चंदन बाग रोड, पाच रस्ता, मुलुंड (पश्चिम) याठिकाणी सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० वाजेपर्यंत "रानभाज्या, कडधान्य व तृणधान्य (मिलेट) महोत्सव" आयोजित करण्यात आला आहे. 
     पावसाळ्यात उगवणाऱ्या विविध भाज्यांची लज्जत व वेगवेगळी तृणधान्ये (मिलेट), कडधान्य सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचविण्यासाठी व त्यावर उपजीविका करणाऱ्या आदिवासी बांधवांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासनाच्या कृषी विभागा बरोबर रानभाज्या व मिलेट महोत्सवाचे आयोजन केले आहे.    
     मराठमोळं मुलुंड संस्थेने वर्ष २०२१- २२ - २३ - २४ मध्ये रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले होते व त्यास मुलुंडकरांनी भरघोस प्रतिसाद दिला होता. तेव्हा मुलुंडमधील सर्वच नागरिकांना विनंती आहे की त्यांनी याही वर्षी या उपक्रमाचा लाभ घ्यावा व आदिवासी बांधवांना त्यांच्या उपजीविके करिता हातभार लावावा, असे आवाहन आहे.

'कुतुहल' बालगीत संग्रहाचे प्रकाशन !!

'कुतुहल' बालगीत संग्रहाचे प्रकाशन !!

नवी मुंबई, (पी. डी. पाटील) : कवयित्री सुचिता गणेश खाडे यांनी रचलेल्या ‘कुतुहल' या बालगीत संग्रहाचे प्रकाशन २७ जुलै रोजी वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात पार पडलेल्या एका विशेष कार्यक्रमात करण्यात आले. यावेळी विचारमंचावर ज्येष्ठ कवयित्री-साहित्यिक  प्रा.प्रतिभा सराफ, दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत, साहित्यक राजेश साबळे ओतुरकर, कवि डॉ. गजानन मिटके उपस्थित होते.

बालसाहित्य हे आधीपासूनच निर्मितीच्या बाबतीत मागे असून पाचशे लेखकांत एखादा लेखक बाल साहित्यावरील पुस्तक लिहितो असे याप्रसंगी प्रा. प्रतिभा सराफ म्हणाल्या. मुलांसाठी या प्रकारचे साहित्य आले पाहिजे, ते मुलांपर्यंत पोहचवले पाहिजे, स्व-भाषेत सुचत नसेल तर प्रसंगी अन्य भाषांतील बालकांसाठीच्या कविता या अनवादित करुन मुलांसमोर आणल्या पाहिजेत असे मत प्रा. सराफ यांनी यावेळी नोंदवले. कुतुहल हे पुस्तक लिहिणाऱ्या सौ. सुचिता खाडे यांना विविध गीते ही पुढच्या पिढीकडे संक्रमित करण्याची मनापासून इच्छा असल्याबद्दल त्यांचे कौतुक करुन राजेंद्र घरत यांनी या पुस्तकातील काही ओळी या वाचनानंद देण्याप्रमाणेच बालक-माता यांच्यामधील काही आनंदी क्षणही वाचकांसमोर तंतोतंत उभे करण्यात यशस्वी ठरल्या असल्याचे सांगत पाने, फुले, चंद्र, तारे, डोंगर, झाडे, पाऊस, फळे, झाडे या रुढ प्रतिमांप्रमाणेच मॅगी, पिझ्झा, बर्गर आदिंंचेही कालसुसंगत चित्रण या कवितांमधून आल्याचे आपल्या भाषणामधून सांगितले. ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे-ओतुरकर यांनी पुस्तक प्रकाशन, वितरणातील काही अनुभव श्रोत्यांसमोर मांडले. कवयित्री सुचिता खाडे यांनी या पुस्तक प्रकाशनामागची भूमिका विशद केली केवळ एका निरोपावर पाहुणे मंडळींनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शवल्याबद्दल आपल्या मनोगतामधून कृतज्ञता व्यक्त केली. राजसा प्रकाशनकृत ‘कुतुहल' या ५० पृष्ठांच्या बालगीत संग्रहामध्ये ३० बालगीतांचा समावेश आहे. या गीतांना समर्पक छायाचित्रे महेश कोंढाळकर यांनी रेखाटली आहेत.

वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग

वाटद परिसरात येणा-या प्रदूषण विरहित प्रकल्पाचे जाहीर स्वागत.. बाळशेठ जोग


रत्नागिरी..
  ....या भूमीतील तरुणांच्या हाताला काम देणे ही आजची सर्वात मोठी गरज आहे आणि त्यासाठी येथे उद्योगधंदे आले पाहिजेत. साऱ्या जगाचे औद्योगिकीकरण झपाट्याने होत असताना आपण मात्र जुन्या कल्पना कवटाळून बसलो तर स्पर्धेत आपण कसा टिकाव धरणार? मात्र येथे येणारे उद्योग व्यवसाय हे प्रदुषण न होणारे असावेत एवढाच आमचा आग्रह आहे. सुदैवाने या भूमीतील आमदार आज महाराष्ट्राचे उद्योगमंत्री असल्याने कधी नव्हे तो 'योग' आता जुळून आला आहे.. असा 'योग'आजवर कधीच जुळून आला नव्हता म्हणूनच आलेली संधी वाया घालवू नये, प्रदुषण विरहीत प्रकल्पांचा मार्ग खुला करावा आणि या भूमीचा विकास देखील झपाट्याने मार्गी लागावा यासाठी वाटद पंचक्रोशीत येणाऱ्या प्रकल्पांचे आम्ही सारेजण जाहीर समर्थन करीत आहोत असे खणखणीत प्रतिपादन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि वाटद खंडाळा परिसरातील एक ज्येष्ठ उद्योजक श्री. बाळशेठ जोग यांनी प्रकल्प जनजागृती कार्यक्रमात केले. ते पुढे म्हणाले, जग विलक्षण वेगाने औद्योगिक प्रगती करीत आहे आणि आपण मात्र जुनाट कालबाह्य कल्पना कवटाळून बसलो तर मग स्पर्धेत आपल्या देशाला व आपल्यालाही टिकाव धरणे कदापि शाक्य होणार नाही. म्हणूनच या शस्त्रास्त्र निर्मिती कारखान्यांला पाठिंबा देणाऱ्या शेतकऱ्यांची जनप्रबोधन सभा नुकतीच खंडाळा येथे झाली. या सभेमध्ये आपले रोखठोक मत मांडताना ज्येष्ठ नेते आणि उद्योजक बाळशेठ जोग. सोबत व्यासपीठावर ना.उदय सामंत आणि अन्य मान्यवर होते. पुढे बोलताना त्यांनी सडेतोडपणे सांगितले की वाटद पंचक्रोशीत येऊ घातलेल्या प्रकल्पांना आमचा पूर्ण पाठींबा व सहकार्य राहील.

प्रकल्पाला पूर्ण पाठींबा !

तरुणांसाठी ट्रेनिंग केंद्रे ही मागणी देखील मान्य झाली श्री. बाळशेठ बोग हे दूरदृष्टी असणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांनी सांगितले, "या प्रकल्पांसोबतच ना. उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन वाटद, खंडाळा परिसरात सैनिकी शाळा सुरु करावी. येथील संस्थेकडे जागा आहे, शासनाने त्यासाठी मंजुरी द्यावी. तसेच स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी येणाऱ्या उद्योगांनी येथे तरुणांसाठी ट्रेनिंग सेंटर्स सुरु करावीत अशी आम्ही मागणी केली होती. ना. उदय सामंत यांनी ती तात्काळ मान्य केली याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत.

अर्थव्यवस्था बळकट होईल !

त्यांनी पुढे सांगितले, "प्रदुषण न करणारे आणि येथील उद्योग व्यवसायाला पुरक ठरणारे प्रकल्प अर्थव्यवस्था बळकट होणार आहे. याच भूमिकेतून आम्ही सारेजण वाटद परिसरात होणाऱ्या शस्त्रास्त्र निर्मिती व अन्य प्रकल्पांना जाहीर पांठींबा देत प्रकल्पांचे आपण खुल्या मनाने स्वागत केले पाहिजे. फक्त हे प्रकल्प प्रदुषणकारी नसावेत एवढीच आमची मागणी होती आणि ती ना. उदय सामंत यांनी त्वरित मान्य केली त्यामुळे या प्रकल्पात नाव ठेवण्याजोगे काहीच नाही. आमचा प्रकल्पाला पूर्ण पाठींबा आहे" असे त्यांनी सडेतोड शब्दात सांगितले. हे प्रकल्प १०० टक्के प्रदुषण नसणारे आहेत. खुद्द उद्योगमंत्री‌ ना. उदय सामंत यांनी तशी ग्वाही दिली आहे. त्यामुळे या प्रकल्पांना आम्ही वाटद येथे झालेल्या जन प्रबोधन सभेत व्यासपीठावरुन जाहीर समर्थन दिले" अशा स्वच्छ व स्पष्ट शब्दात त्यांनी आपली भूमिका विषद केली.सर्व मागण्या मान्य श्री. बाळशेठ जोग हे आधुनिक व सुधारणावादी विचारांचे पाईक सांगितले, आम्ही जाहीर पाठींबा म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुढे देताना काही अटी घातल्या होत्या, त्या सर्व मान्य असल्याचे उद्योगमंत्री ना. उदय सामंत यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे समर्थन केले.

प्रकल्प ठराविक काळात पूर्ण करण्याची ग्वाही !

या साऱ्या परिसरात येणारे उद्योग हे प्रदुषण विरहीत असतील अशी ग्वाही ना. उदय सामंत यांनी दिली आहेच आणि उद्योग देखील ना, प्रदुषण न करणारे आहेत याचे आम्हाला समाधान आहे. मात्र हे प्रकल्प उभारण्यासाठी निश्चित असा कालावधी ठरविण्यात यावा अशी आमची मागणी होती. ती देखील हे प्रकल्प ठराविक काळातच उभे उदय सामंत यांनी मान्य केली. राहतील कारण कालावधी लांबला तर त्या उद्योग समूहांना ते परवडणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे ती मागणी मान्य झाली आहे. प्रकल्पाखाली राहती भरे, सुपिक शेतजमीन, बागायती जमीन, नैसर्गिक जलस्त्रोत (पाणवठे) मंदिर, मस्जिद वा कोणतेही धार्मिक स्थळ नसावे या आमच्या मागण्या ना. उदय सामंत यांनी तात्काळ मान्य केल्या. आमच्या मागण्या मान्य झाल्याने आम्हा सर्वांचे पूर्ण समाधान झाले आहे" असे सडेतोड प्रतिपादन त्यांनी केले.
प्रकल्पांचे स्वागत करुया।

श्री. बाळशेठ जोग भरभरुन बोलत होते. त्यांनी सांगितले, "आज कोकणचा विचार केला तर कोकण भकास होत चालले की काय? अशी भीती वाटू लागली आहे. बहुतांशी तरुण रोजी रोटीसाठी मुंबई वा अन्य बड्या शहरात गेल्याने येथील घरांम ध्ये फक्त वृध्द मंडळी असतात. जवळपास ६० टक्के तर काही ठिकाणी ९० टक्के घरे बंद आहेत. आता तर ही तरुण मंडळी आपल्या सोबत कुटुंब घेऊन गेल्याने येथील लोकसंख्या रोडावल्याचे चिन्न दिसून येते. त्यामुळे परिसराची 'बरकत' आटली की काय? असे वाटू लागते.. हे बदलायचे असेल तर येथे उद्योग आलेच पाहिजेत.. याच भावनेने येणाऱ्या प्रदुषण विरहित प्रकल्पांचे आपण सर्वांनी सुहास्य वदनाने स्वागत करायचे आहे असे निःसंदीग्ध प्रतिपादन त्यांनी केले, 

सर्वाधिक दर मिळणार !

श्री. बाळशेठ जोग यांनी पुढे सांगितले, "मेथील जमिनींना भरघोस मोबदला मिळावा अशी सर्वांची मनोभावना आहे. उद्योगमंत्री हे सुदैवाने आपले आहेत, या मतदार संघाचे आम दार आहेत. त्यामुळे त्यांनी तात्काळ सांगितले की जमिनींना सर्वाधिक दर दिला जाईल. लवकरच दर जाहीर होईल आणि मग मी खात्री देतो की सारे ग्रामस्थ मनोमन सुखावतील. अशा स्थितीत या प्रकल्पाला विरोध कशासाठी करायचा? असे उत्तम इंजिनिअरींग, इलेक्ट्रीकल व इलेक्ट्रॉनिक्स प्रकल्प येत असताना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल व सुसज्ज स्टेडियमची मागणी वाटद, गडनरळ, कोळीसरे, वैद्यलावगण, निरवणे, कळझोंडी परिसरात 'मल्टीस्पेशालिटी' सुसज्ज हॉस्पिटल व्हावे व विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी सुसज्ज स्टेडियम व्हावे अशी मागणी आम्ही ना. उदय सामंत यांना व रत्नागिरीचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देकन केली आहे. कायान ना. उदय सामंत यांनी अनुकूलता दर्शविली असून तशी योजना तयार करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत त्याबद्दल आम्ही सारेजण त्यांचे आभारी आहोत.

त्यांचे आपण सर्वांनी स्वागत करूं या आणि हो भूमी सुकलाम, सुफलाम झाल्याचे पाहण्याचे भाग्य आपणा सर्वांना याच पिढीला मिळो अशीच आम्हा सर्वांची सदभावना आहे" अशी मनोभावना त्यांनी व्यक्त केली.

सौजन्य / वृत्तांत - विलासराव कोळेकर सर 

Wednesday, 30 July 2025

**पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड मा के नाम" उपक्रमांतर्गत ६५० झाडांचे वृक्षारोपण**

**पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड मा के नाम" उपक्रमांतर्गत ६५० झाडांचे वृक्षारोपण**

मुरबाड, (श्री.मंगल डोंगरे) : भारत सरकार, युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय अंतर्गत मेरा युवा भारत ठाणे यांच्या वतीने, महाराष्ट्र युवा संघ कल्याण (जिल्हा युवा संस्था पुरस्कार - महाराष्ट्र शासन) व वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ३० जुलै २०२५ रोजी किशोर गाव (तालुका मुरबाड, जिल्हा ठाणे) येथे पर्यावरण संवर्धनासाठी "एक पेड मा के नाम" हा वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत एकूण ६५० झाडे लावण्यात आली.

या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून –श्री. संजूदास हेमा राठोड, वनपरिक्षेत्र अधिकारी – मुरबाड पश्चिम, स्काय डायव्हर अजित कारभारी, अध्यक्ष – महाराष्ट्र युवा संघ व राज्य युवा पुरस्कार (महाराष्ट्र शासन २०१३-१४) श्री. साहेबराव बळीराम खरे, परिमंडळ वन अधिकारी – किशोर, श्री. विनायक तानाजी पवार, वनरक्षक श्री. साहिल दीपक पवार, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड श्री. निलेश आत्माराम जाधव, वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन मुरबाड, श्री. प्रविण भालेराव, संस्थापक – वाईल्ड इंडिया ०५ फाऊंडेशन श्री. अजिंक्य मंगल डोंगरे, सचिव – गर्जा प्रतिष्ठान मुरबाड, हे मान्यवर उपस्थित होते.

वन विभागाच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक आणि युवतींनी उत्साहाने या उपक्रमात सहभाग घेतला. एकूण ५१ युवक-युवतींना मेरा युवा भारत ठाणे यांच्याकडून भारत सरकारचे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हा उपक्रम मेरा युवा भारत ठाणेच्या जिल्हा युवा अधिकारी मनीषा शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला.

Tuesday, 29 July 2025

पक्षप्रमुखांना रक्तदान करून वाढदिवसाच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा !!

अंधेरीत भव्य आरोग्य आणि रक्तदान शिबिर संपन्न !!

** पक्षप्रमुखांना रक्तदान करून वाढदिवसाच्या दिल्या अनोख्या शुभेच्छा

 मुंबई, (शांताराम गुडेकर/संतोष गावडे) ::
       अंधेरी पुर्वस्थित मरोळ, सगबाबाग येथे शिवसेना (उबाठा) शाखा ८६ अंतर्गत, भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या माध्यमातून, पक्षप्रमुख श्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, रविवारी (दि.२७ जुलै) भव्य आरोग्य शिबिर व रक्तदान शिबीर पार पडले. सकाळी ०९:०० ते दुपारी ०२:०० या वेळेत चाललेल्या या शिबिरात सर्व आजारांच्या दृष्टीने रक्ताची तपासणी, मधुमेह तपासणी, रक्तदाब तपासणी, हृदय विकारासंबंधित ईसिजी तपासणी, डोळ्यांच्या बहुतेक विकारांचा विचार करता त्यावरील तपासण्या, आदी सर्व तपासण्या विनामूल्य करण्यात येऊन, नागरिकांना आवश्यक काही औषधे सुद्धा विनामूल्य देण्यात आली.  
            गेली काही वर्षे आयोजित या आरोग्य शिबिरात यावेळी रक्तदान शिबिर सुद्धा आयोजित करण्यात आले होते. अनेक रक्तदात्यांनी उत्सुर्त सहभाग देत  रक्तदान केले. तसेच वयोवृद्ध नागरिकांसाठी आधार काठ्यांचे सुद्धा यावेळी वाटप करण्यात आले.
            मुंबईतील सध्याच्या वातावरणाचा विचार करता असंख्य नागरिक विविध व्याधींनी ग्रस्त आहेत. त्याकरिता आपण काहीतरी करणे आवश्यक आहे, असा विचार मनात आला आणि आपण त्यादृष्टीने कामास लागलो. गेली काही वर्षे शिवसेना (उबाठा) शाखा ८६ आणि भैरवनाथ जनसेवा संस्थेच्या सहकार्यातून आपण हे आरोग्य शिबिर आयोजित करीत आहोत, असे भैरवनाथ जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आणि उपशाखाप्रमुख पदी कार्यरत असलेले, शिबिराचे आयोजक श्री राजुदादा सूर्यवंशी यांनी यावेळी सांगितले. शिबिराच्या माध्यमातून होणारी ही छोटीशी जनसेवा ह्याच खऱ्या पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांना आपण दिलेल्या शुभेच्छा आहेत, असेही राजुदादा यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
             यावेळी शिवसेनेचे उपनेते अमोल कीर्तीकर, माजी आमदार ऋतुजा लटके, अंधेरी पूर्व विधानसभा संघटक प्रमोद सावंत,गुरुनाथ खोत, मनोहर पांचाळ, शाखाप्रमुख बिपीन शिंदे, शुभम सुर्यवंशी, युवासेनेचे किरण पुजारी, देवेंद्र भोसले, लक्ष्मण घाग, यशवंत कुंभार, संजय पावले, राम साळवी आणि विभागातील सेनेचे इतर पदाधिकारी, शिवसैनिक आणि विभागीय नागरिक मोठ्या संख्येत उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी घाटकोपरस्थित वेदांत हॉस्पिटल यांचे बहुमोल सहकार्य लाभले.

वाचन आवड वाढवण्यासाठी सकाळ माध्यम व स्फूर्ती फाउंडेशनचा उपक्रम !!

वाचन आवड वाढवण्यासाठी सकाळ माध्यम व स्फूर्ती फाउंडेशनचा उपक्रम !!

(सकाळ वाचकांना कुकर भेटवस्तू वाटप)

कल्याण, प्रतिनिधी - टावरीपाडा, शंकेश्वर सोसायटी मध्ये सकाळ वाचक वर्गणीदार योजनेचा लाभ घेणाऱ्या वाचकांना एकत्रित कुकर देण्यात आले यावेळी नागरीकांनी सकाळ समूहाचे आभार मानले. स्फूर्ती फाउंडेशन अध्यक्ष -बजरंग तांगडकर यांनी पुढाकार घेऊन सकाळ माध्यम व स्फूर्ती फाउंडेशन माध्यमातून हा उपक्रम राबविण्यात आला. 

यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम तांगडकर, स्फूर्ती फाउंडेशन महिला प्रमुख शिल्पा तांगडकर, महाराष्ट्र राज्य उद्योजक परिवार अध्यक्ष मंगेश शेळके, जि एस महानगर बँक अधिकारी शांताराम झावरे, शारदा तांगडकर, भरत पाटील, दिलीप सिंग, अर्जुन बिराजदार, अशोक खंडागळे, लक्ष्मण शिंपी, विनोद गायकवाड, आशिष भदरिगे उपस्थित होते.

Monday, 28 July 2025

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुप मार्फत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे १५० किलो लाडूचे वाटप !!

आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुप मार्फत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मातोश्री येथे १५० किलो लाडूचे वाटप !!

मुंबई, (केतन भोज) : संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिक सदस्य असलेला आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या व्हॉट्सॲप ग्रुप मार्फत ८० टक्के समाजकारण २० टक्के राजकारण करत २६ सामाजिक उपक्रम राबविले गेले आहेत. तसेच २७ वा उपक्रम दर वर्षाप्रमाणे शिवसेना पक्षप्रमुख महाराष्ट्राचे राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या ६५ व्या वाढदिवसा निमित्त महाराष्ट्रातून येणाऱ्या तमाम शिवसैनिकांसाठी मातोश्री बंगला,बांद्रा येथे १५० किलो लाडू वाटप करण्यात आले. 

या लाडू वाटप स्टॉलवर आमदार, खासदार, नगरसेवक यांनी भेट देऊन त्यांच्या हस्ते वाटप करून त्यांनी देखील आम्हाला गर्व हिंदुत्वाचा या ग्रुपची तोंडभरून कौतुक केले. या ग्रुप मधील कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, भंडारा, नाशिक या विविध भागातील या ग्रुपचे सदस्य यांनी सकाळ पासून मेहनत घेऊन हा कार्यक्रम पार करण्यास सहकार्य केले. या ग्रुपचे संस्थापक, संचालक संतोष पाटील, संचालक महेंद्र गुरव, अध्यक्ष सुरेश वाडकर तसेच भालचंद्र उकिर्डे, लवेश म्हात्रे, रंजीत नरवणकर, लिलाधर भोईर, दिलीप गावडे, जितेंद्र पाभरेकर, सुजाता धारगळकर, वासंती गोताड, अनिल कांबळे, संपदा धोंगडे, सोनिया पाटील, संदीप गुरव, प्रवीण कोरपे, विलास चव्हाण, संतोष झोल, खंडू खोचरे, ईश्वर गुळवी, जयाभाऊ दवंडे, बबन शेळके, ललित कुमार मुथा, सागर पाटील, राकेश देवकुळे, आबा मोहिते, लहू साळुंखे, शांताराम नाईक, अशोक कोळंबकर, अशोक देशमुख, संजय डोर्लेकर, सुनील काप, दिनेश पाटील, संजय पवार, रज्जाक शेख, नामदेव रिंगे, राजेश तिवारी इत्यादी ग्रुप मधील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.

भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न !!

भारत-पाक बॉर्डरच्या राज्याचा पाद्यपूजन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न !!

मुंबई, (केतन भोज) : मुंबई येथील भारतीय नौदलाच्या बेस शेजारी, कुर्ला एल.बी.एस. मार्गावरील श्री.सिद्धिविनायक गणेश चित्र शाळेत भारत-पाकच्या बॉर्डरच्या राजाची मूर्ती साकारण्यात येत आहे. भारत-पाक पुंछ सीमेवर विराजमान होणाऱ्या या गणेशाची मूर्ती दरवर्षी मुंबईतून काश्मीरला नेली जाते. यंदाचे हे मूर्तीचे सोळावे वर्ष आहे. भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवरील पुंछ जिल्ह्यात विराजमान होणाऱ्या राजाचा पाद्यपूजन सोहळा रविवारी दि. २७ जुलै २०२५ रोजी मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. भारत-पाक बॉर्डरच्या राजाचा पाद्यपूजन सोहळा पार पडला त्यावेळी ईशरदिदी (मानवाधिकार कार्यकर्ता), छत्रपती आवटेदादा, मंगेश मस्तुद, प्रमोद चव्हाण, बाळू राऊत, अजित घगवे, विनीत पटेल, जगदीश बुछडा, अनुप सोनी, किरण भड, सुहेल तसेच प्रोग्रेसिव्ह नेशन एनजीओ चे कार्यकर्ते उपस्थित होते. भारत-पाक सीमेवर पुंछ येथील पुलस्त नदीच्या तटावर मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशरदीदी तसेच समाजसेवक व शिवनेरी सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष छत्रपती आवटे व प्रोग्रेसिव्ह नेशन एनजीओ कार्यकर्ते यांच्या संयुक्त विद्यमाने या गणेशोत्सवाचे आयोजन केले जाते. या उत्सवात विराजमान होणाऱ्या गणेशाला भारत-पाक बॉर्डरचा राजा म्हणून संबोधले जाते. भारतीय जवानांना देखील गणेशोत्सव साजरा करता यावा या उद्देशाने मुंबई ही आपली आर्थिक राजधानी आहे आणि मुंबई मध्ये अनेक जाती धर्माचे लोक राहतात त्यामुळे मुंबईतून सर्वांचे प्रेम आशिर्वाद घेऊन मानव अधिकार कार्यकर्त्या व प्राचीन शिव दुर्गा भैरव मंदीर ट्रस्ट उपाध्यक्षा ईशरदीदी जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ या ठिकाणी गणेशाची मूर्ती घेऊन जातात. जम्मू काश्मीर येथे भारतीय जवान मोठ्या हर्ष उल्हासात गणरायाचे स्वागत करतात व जम्मू आणि काश्मीर येथील पुंछ या ठिकाणी गणरायाला विराजमान करण्याचे हे अखंडीत सोळावे वर्ष आहे.

Sunday, 27 July 2025

*" कारगिल विजय दिवस साजरा "*

*" कारगिल विजय दिवस साजरा "*

भारतीय सैनिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, खडवली पुर्व‌ कल्याण येथे दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० ते १२.३० या वेळेत हुतात्मा प्रतिष्ठानचे अध्यक्ष व प्रमुख पाहुणे लेफ्टनंट कमांडर (एनसीसी) प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांच्या व्याख्यानाद्वारे "कारगिल विजय दिवस" काल व आज - विद्यार्थ्यांना वाटणारी संरक्षण दलाविषयी आत्मीयता हा विषय चर्चिला गेला.

तसेच *"एन. डी. ए परीक्षा व अभ्यासक्रम"* यांचा दृकश्राव्य माध्यमातून दोन तास उद्बोधन केले. भारत सैनिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज चे कमांडंट कर्नल श्री. शंकर यादव (निवृत्त) यांच्या कल्पनेतून आजचा "कारगिल विजय दिवस" अनोख्या पद्धतीने साजरा केला गेला.

प्रा. डॉ. सुनिल कांबळे यांनी डॉकयार्ड एप्रेंटिस स्कूल परीक्षा, अग्निवीर, नेव्हल अकॅडमी, एयर ट्रॅफिक कंट्रोल यांचे मूलभूत मार्गदर्शन व एन. डी. ए.,परीक्षा,विषय मूल्यांकन व तयारी यावर विस्तृत व्याख्यान दिले.विद्यार्थी व शिक्षण यांनी आपल्या शंका प्रश्नोत्तरे कार्यक्रमात विचारल्या.

हुतात्मा प्रतिष्ठानच्या वतीने भूदल, नौदल, वायुदल या संरक्षण दलाच्या तिन्ही शाखांच्या परीक्षा, त्यांची संकेतस्थळे या बाबत संक्षिप्त माहिती असलेली पत्रके संस्थे मार्फत वितरित करण्यात आली.

सौजन्य / वृत्तांत - अश्विनी निवाते 

आई वडिलांनी केली आत्महत्या, आणि नोकरी ऐवजी कल्पनाचा संसार पडला उघड्यावर !!

आई वडिलांनी केली आत्महत्या, आणि नोकरी ऐवजी कल्पनाचा संसार पडला उघड्यावर !! 

**सुकाळवाडी तील बारवी प्रकल्प बाधीत अदिवासी कुंटूबाला न्याय मिळणार कधी,, ? 

मुरबाड { मंगल डोंगरे } : मुरबाड पासून हाकेच्या अंतरावरील सुकाळवाडी गाव, बारवी धरणग्रस्त आदिवासी समाजाची वस्ती, येथील मंगल उघडा यांची जमीन बारावी धरणात बाधित झाल्याने परवड झालेल्या कुटुंबातील "करण उघडा,, या मुलाला एमआयडीसी ने नवी मुंबई महापालिकेत नोकरी दिली, शिपाई म्हणून आरोग्य विभागात 3 महिने काम केल्यानंतर करन उघडा यांचे अपघाती निधन झाले, कुटुंबातील एकुलता एक कमवता मुलगा निघून गेल्यानंतर हताश झालेल्या "मंगल उघडा, यांनी एमआयडीसी आणि नवी मुंबई महापालिकेत मदतीची याचना केली, एकदोन नव्हे तर तब्बल 3 वर्ष सरकार दरबारी हेलपाटे मारूनही अनुकंपाद्वारे एकुलत्या एक मुलीला नोकरी मिळत नाही, महसूल खाते आणि महापालिका न्याय देत नाही, स्थानिक आमदारानी पत्राद्वारे मागणी करूनही प्रशासन दाद देत नसल्याने अखेर मंगल /संगिता उघडा या दाम्पत्यांनी कीटक नाशक औषध प्राशन करून आत्महत्या केली, या प्रकल्पग्रस्त कुटुंबाची परवड होऊन संपूर्ण संसार उघड्यावर आला, कायदे आणि नियमात एक प्रकल्पग्रस्त कुटुंब धुळीस मिळाला, पण त्यांना मात्र ना न्याय मिळाला की मदत,  सुकाळवाडीत त्या कुटुंबातील आईवडिलांचे छत्र हरवलेल्या एकमेव वारस कल्पना हिला १५ दिवसा पुर्वी कन्यारत्नाचा लाभ झासा असून या शासनाच्या लाडक्या बहिणीला मदतीचा हातभार लावावा असे शासनाला वाटत नाही, असे असतांना या दूर्दैवी घटने नंतर आज २६ रोजी सामाजिक कार्यकर्ते बबन हरणे यांनी सुकाळवाडीत जाऊन या तरूणीची भेट घेऊन प्रापंचिक साहित्य  किराणा सामान, चादर, धान्य आणि दहा हजार रोख मदत करून कुटुंबाचे सांत्वन केले. 

मुरबाड तालुक्यात विविध राजकीय पक्षांनी कार्यकर्ते मेळावे घेऊन मांसाहारी पार्टी झोडत गटारी साजरी केली पण उघड्यावर संसार आलेल्या त्या उघडा कुटुंबाला मात्र साधी मदत करता आली नाही हेच करणी आणि कथनी मधील फरक असलेल्या राजकीय मंडळी नी दाखवून दिले. 

**अनाथांची माय सिंधूताई सकपाळ यांचे मानसपुत्र बबन हरणे यांनी या अभागी कल्पना ला मदतीचं मोलाच योगदान देऊन आपला समाजसेवेचा वसा जोपासला**

कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्यान केंद्र (आपटे फाटा स्वामी मठ) आयोजित श्रावण मास शुभारंभनिमित्त शैक्षणिक सोहळा संपन्न !!

कोकण कट्टा व श्री स्वामी समर्थ विश्वकल्यान केंद्र (आपटे फाटा स्वामी मठ) आयोजित श्रावण मास शुभारंभनिमित्त शैक्षणिक सोहळा संपन्न !!

आदिवासी विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा व तेथील आश्रम शाळेतील सुमारे ८५ विद्यार्थीना शालेय साहित्य वाटप

मुंबई (शांताराम गुडेकर) :
                कोकण कट्टा सेवाभावी संस्था व स्वामी समर्थ मठा तर्फे स्थानिक आदिवासी विभागातील रायगड जिल्हा परिषद शाळा व तेथील आश्रम शाळेतील सुमारे ८५ विद्यार्थीना प्रत्येकी ६ वह्या, पेन, पेन्सिल, खोड रबर, शार्पनर व खाऊ यांचे भेट देण्यात आली.दुर्गम आदिवासी विभागातील मुलांना  शिक्षणाची आवड निर्माण व्हावी व आपण ही समाजाचे देणे लागतो हे लक्षात घेऊन हा उपक्रम गेली अनेक वर्ष सातत्याने विविध विभागात सुरु ठेवले आहे असे मनोगत कोकण कट्टा संस्थेचे संस्थापक अजितदादा पितळे यांनी व्यक्त केले.तर  तारा विभागातील समाजसेविका पुष्पलता पाटीलताई यांनी विभागातील अनेक मुले अशा साहित्या पासून वंचित आहेत आपला उपक्रम स्तुत्य आहे.आम्हाला केलेल्या मदतीसाठी आभार व प्रतिवर्षी अशीच मदत करावी असे नम्र आवाहन केले. स्वामी मठातर्फे उपस्थित शालेय मुलांना प्रसाद म्हणून  गोड जेवण देण्यात आले. प्राध्यापिका पुष्पा शर्के, शिक्षक निलेश कोळी मठाचे व्यवस्थापक प्रदीप मोहिते, कोकण कट्टा संस्थांपक अजित पितळे, मार्गदर्शक जगन्नाथ गावडे, राजमुद्रा मासिकाचे संपादक पत्रकार अरविंदजी गुरव, सुजित कदम, विवेक वैद्य, राजन राऊत मान्यवर उपस्थित होते. प्राध्यापिका पुष्पा शिर्के यांनी व शाळेतील विद्यार्थीयांनी मोजक्याच शब्दात आभार प्रदर्शन केले. मुलांच्या टाळ्यांच्या गजरात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न !!

ए.डी. फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे उत्साहात संपन्न !!

यावेळी ह. भ. प. तुकाराम बाबा महाराज म्हणाले, आई वडिलांच्या पायाशी नतमस्तक झालेल्या प्रत्येक मुला मुलींच्या पायाशी यश लोटांगण घालते. त्यांच्या प्रती व समाजाच्या प्रती नेहमी कृतज्ञ रहा.तसेच वैशाली मार्तंड चव्हाण म्हणाल्या, परस्थिती बदलायची असेल तर मनस्थिती बदला. तुम्ही तुमच्या ध्येयावर ठाम असाल तर तुम्हाला यशापासून कोणीच रोखू शकत नाही. यश आणि किर्ती कोणी मिळवून देत नसत, जिद्दीन काही मिळाल तर कोणी हिरावून घेत नसत. अनिल जाहीर म्हणाले, प्रत्येक चांगल्या कामाचा परतावा हा मिळतोच. तुम्ही जो इतरांना प्रेम, आदर द्याल तो दुप्पटीने तुम्हाला परत मिळेल. एकाद्याची उंची ही त्याच्या वर्तनावर वाढते. प्रत्येक कुटुंबात स्त्रीचा आदर करा. यावेळी श्री राम मांडूरके, सौ. ममता भोई - दौंडे यांनीही मार्गदर्शन केले.
तसेच पुरस्कर्त्या प्रियांका शिंदे यांनी ही शुभेच्छा दिल्या.

ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राष्ट्रीय जीवनगौरव, समाजरत्न पुरस्कार सन्मान सोहळयाचे पुणे येथे भव्य आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशेष उपस्थिती श्री. अनिल भिमराव जाहीर, तनिष्का फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे, ह.भ.प. तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत बागडेबाबा आश्रम संख, वैशाली मार्तंड चव्हाण, पुण्याच्या सहाय्यक महानगरपालिका आयुक्त, मा.श्री. राम मांडूरके, सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे, सौ. ममता भोई खानदेशी अभिनेत्री, प्राजक्ता मालुंजकर रिल स्टार/फेम मोह मोह के धाने आदींची खास उपस्थित होती. या सोहोळ्याचे निवेदक म्हणून प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु. कॉलेज, उमदी यांनी बहारदार सुत्रसंचलन केले. सर्व मान्यवरांचे स्वागत फौंडेशन चे अध्यक्ष श्री अशोक गोरड यांनी शाल व पुस्तक देवून केले. स्वागताध्यक्ष अजित चौगुले संपादक जनदरबार न्यूज, श्री. महादेव महानूर कार्याध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र राज्य व श्री. अशोक श्रीपती गोरड अध्यक्ष, सौ.सविता गोरड ए. डी. फाऊंडेशन, महाराष्ट्र आदीनी सोहोळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. हा सोहोळा नुकताच ग. दि. माडगुळकर नाट्यगृह पुणे येथे संपन्न झाला.यावेळी मान्यवरांच्या हस्ते  दि मॉडेल इंग्लिश स्कुल, सैतवडेचे "मुख्याध्यापक विलासराव कोळेकर यांना भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार" प्रदान करण्यात आला. यावेळी  महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, आध्यात्मिक, कृषी आणि वैद्यकीय अशा निवडक विविध क्षेत्रातील मान्यवरांना मानपत्र, ट्रॉफी, पदक व शाल देऊन सन्मानित करण्यात आले.

"इंद्रा इंग्लिश हायस्कूल"ला एसडीजी पुरस्कार मिळाला !!

"इंद्रा इंग्लिश हायस्कूल"ला एसडीजी पुरस्कार मिळाला !!

रोजी सीईडी फाउंडेशनने मुंबईतील अरिचिड इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एसडीजी स्कूल पुरस्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी संपूर्ण भारतातील ७० शाळांची निवड करण्यात आली. मानखुर्द येथील इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. अशोक गुप्ता यांना एसडीजी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सीआयडीच्या संस्थापक डॉ. प्रियदर्शिनी नायक आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पडये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यावर डॉ. गुप्ता यांचे मित्र आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. या पुरस्कारामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

वृत्तांत - सुनील भोसले 

समाजसेवेचा वसा लाभलेले एक निःस्वार्थ कार्यकर्ते - शांताराम बबन गायकवाड

समाजसेवेचा वसा लाभलेले एक निःस्वार्थ कार्यकर्ते - शांताराम बबन गायकवाड 

काही व्यक्ती आपल्या शांत, साध्या आणि निःस्वार्थ कामातून समाजावर अमिट छाप सोडतात. आपल्या कृतींचा गवगवा न करता ते केवळ सेवेशी निष्ठा राखतात. अशाच व्यक्तिमत्त्वाचा नम्र, पण तेजस्वी झळाळणारा दीप म्हणजे कुरूळी गावचे सामाजिक कार्यकर्ते श्री. शांताराम बबन गायकवाड. गोरगरिबांचा खरा आधार शांताराम भाऊंच्या कामाची सुरुवात होते ती शाळकरी मुलांपासून. शिक्षण हा समाज उभारणीचा खरा पाया आहे, याची त्यांना जाणीव आहे. म्हणूनच गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, कपडे, वह्या, ड्रेस व दैनंदिन आवश्यक वस्तू ते नियमितपणे पुरवतात. कोणत्याही प्रसिद्धीशिवाय, केवळ एक ‘कर्तव्य’ म्हणून. त्यांच्या या मदतीमुळे शेकडो गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण सुकर झाले आहे. शांताराम भाऊंना वारकरी संप्रदायाची अपार श्रद्धा आणि ओढ आहे. त्यांच्या वडिलांकडूनच मिळालेला हा वसा त्यांनी तन, मन, धनाने जपलेला आहे. दरवर्षी ते पायी वारी करतात, आळंदी ते पंढरपूर ही संतांची वाट त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग आहे. केवळ स्वतः वारी करणे इतक्यावर ते थांबत नाहीत. आळंदीतील अनेक वारकरी शाळांना ते नियमित आणि गुप्त स्वरूपात मदत करतात. त्यांच्या देणग्या कोणालाही न सांगता पोचवल्या जातात. हेच त्यांचं खऱ्या अर्थाने नि:स्वार्थ दानधर्म आहे. सद्यस्थितीत त्यांनी एक अत्यंत उपयुक्त आणि संवेदनशील उपक्रम सुरू केला आहे. १९ जुलै २०२५ पासून, भोसरी येथील यशवंतराव चव्हाण आश्रमशाळेतील सुमारे २५० विद्यार्थ्यांना दररोज सकाळचा नाश्ता (पोहे) देण्याची जबाबदारी त्यांनी घेतली आहे. या उपक्रमासाठी कोणताही डंका न वाजवता, केवळ मुलांच्या पोषणासाठी त्यांनी पुढाकार घेतला. हे फक्त सुरूवात आहे. आगामी काळात या आश्रमशाळेसाठी अधिक भरीव योगदान देण्याचा त्यांचा मनोदय आहे. या उपक्रमामुळे अनेक आदिवासी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल मुलांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. शांताराम गायकवाड हे “अमृतानुभव फाउंडेशन”चे उपाध्यक्ष असून, या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून ते विविध उपक्रम राबवण्याचे कार्य करीत आहेत. वृद्धांची देखभाल, अनाथ मुलांना मदत, पर्यावरण संवर्धन, आरोग्य शिबिरे इत्यादी अनेक विषयांवर संस्था कार्यरत आहे. तसेच, “गायकवाड प्रतिष्ठान” या स्थानिक संस्थेद्वारे त्यांनी ग्रामीण भागात समाजप्रबोधन, महिला सक्षमीकरण आणि तरुणांच्या मार्गदर्शनाचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यांचा उद्देश एकच समाजाच्या दुर्लक्षित घटकांसाठी आपली शक्ती, वेळ आणि साधनांचा उपयोग करणे. शांताराम गायकवाड हे स्वतः व्यवसायात सक्रिय असूनही आपल्या वेळेचा आणि उत्पन्नाचा एक मोठा भाग समाजसेवेसाठी खर्च करतात. व्यवसाय, कुटुंब, आणि सेवा या तिन्ही गोष्टी त्यांनी समतोलाने सांभाळल्या आहेत. हीच त्यांची खऱ्या अर्थाने संतवृत्ती आहे. दानशीलतेची नोंद नसते, पण परिणाम खोलवर असतो आज जिथं मदतीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची स्पर्धा आहे, तिथं शांताराम भाऊ मात्र गुप्त दान करत आपल्या मनाचं समाधान शोधतात. त्यांच्या कृतीत आडमुठेपणा नाही, गर्व नाही, केवळ प्रेम आणि दयाळू मन आहे. शेवटी एवढंच म्हणावंसं वाटतं पैसा सगळ्यांकडे असतो, पण दान करण्याची दानत विरळच असते. आणि अशा दुर्मीळ मनाचे नाव "शांताराम बबन गायकवाड".

संदीप राक्षे✍🏻
भोसरी पुणे२६

मुरबाड पी.डब्ल्यु डी.ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार....

मुरबाड पी.डब्ल्यु डी.ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी न झाल्यास १५ ऑगस्टला आत्मदहन करणार....

*** पत्रकार प्रकाश जाधव यांचा राज्यपाल व मुख्यमंत्र्यांना इशारा..

मुरबाड ( मंगल डोंगरे ) :- मुरबाड सार्वजनिक बांधकाम कार्यालय "शिवनेरी " शासकीय विश्रामगृहा समोर उभारण्यात आलेल्या ध्वजस्तंभाला १२५ फुटांची मान्यता असताना फक्त चाळीस फुट उभारण्यात आल्याने ध्वजस्तंभात अनियमितता करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता अधिक्षक अभियंता आणि उप अभियंता यांचेवर ध्वज संहिते नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे २०२३ पासुन लोक आयुक्त, मूख्य सचिव, यांचेकडे तक्रारी करुन दोन वेळा शेकडो कार्यकर्त्यांसह उपोषणे केली. परंतु या गंभीर प्रकरणाची चौकशी केली जात नसल्याने येत्या १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनी मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर होणाऱ्या ध्वजारोहण प्रसंगी आत्मदहन करुन राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्याचा इशारा राज्यपाल व मुख्यमंत्री यांना निवेदनाद्वारे प्रकाश जाधव यांनी दिला असल्याने त्यांचे भुमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

         सार्वजनिक बांधकाम उप विभाग मुरबाड येथे लाखो रुपये खर्च करून सुसज्ज असा ध्वजस्तंभ असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांनी  शिवनेरी या शासकीय विश्रामगृहा समोर सुमारे १२५ फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा घाट घातला त्यांची सुरुवात सप्टेंबर २०२२ मध्ये करुन जानेवारी अखेर चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारला आणि २६ जानेवारी २०२३ रोजी शासकीय कार्यालयात ध्वजारोहण न करता कोणत्याही प्रकारची परवानगी नसणाऱ्या ध्वजस्तंभावर ध्वजारोहण केले. मात्र त्या कामाला २ फेब्रुवारी ते मार्च २०२३ मध्ये प्रशासकीय मान्यता आणि दहा लाखांची तरतूद घेऊन त्यापुर्वीच काम पुर्ण झाले असल्याचा शिलालेख तेथे लावण्यात आल्याने राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेचे एक प्रकारे प्रदर्शन झाले आणि सर्व प्रसार माध्यमांनी बातम्या प्रसारित केल्या असता तात्कालिन विधानसभा सदस्या यामिनी जाधव यांनी तसेच अनेक विधान सभा सदस्यांनी विधी मंडळात प्रश्न उपस्थित केला असता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडे खुलासा मागितला असता उप अभियंता कैलास पतंगराव यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे विधी मंडळास खोटा अहवाल सादर केला.
          मात्र १२५ फुटा ऐवजी केवळ चाळीस फुटांचा ध्वजस्तंभ उभारण्याचा सबळ पुरावा साक्ष देत असताना उप अभियंता कैलास पतिंगराव यांना पाठिशी घालणाऱ्या अधिकाऱ्यावर ध्वज संहितेत नुसार कारवाई करण्यात यावी यासाठी प्रकाश जाधव यांनी राज्याचे लोक आयुक्त मुख्य सचिव, तसेच मुख्यमंत्री सचिवालय कक्ष ठाणे कोकण व मंत्रालय स्तरावर तक्रारी केल्या परंतु एकाही अधिकाऱ्याने या ध्वजस्तंभाची दखल घेतली नाही. त्यासाठी दोन वेळा शेकडो नागरिकांचे सहकार्याने उपोषणे केली परंतु कारवाई झाली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजस्तंभात झालेल्या अनियमिततेची चौकशी करण्यासाठी दोषींना पाठिशी घालणाऱ्या जबाबदार अधिकाऱ्यावर ध्वजसंहिते नुसार गुन्हा दाखल करण्यासाठी पत्रकार प्रकाश जाधव हे १४ किंवा १५ ऑगस्टला मुरबाड तहसीलदार कार्यालया समोर आत्मदहन करुन राष्ट्र ध्वजाला सलामी देणार असल्याचे निवेदन महाराष्ट्राचे राज्यपाल व मुख्यमंत्री यांना सादर केले आहे.

समतावादी विचारांचे प्रचारक प्रकाश कासे व सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे निधन..

समतावादी विचारांचे प्रचारक प्रकाश कासे व सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे निधन.. 

       बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) : बोधिसत्व सेवा संघ तिलोरे भावकीचे विद्यमान अध्यक्ष धम्म उपासक प्रकाश केशव कासे, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क चे राज्य सचिव, माणगांव तालुका बौद्ध समाज समन्वय समिती चे कोशाध्यक्ष धम्म उपासक सुर्यकांत कासे यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांचे वयाच्या ९५ व्या वर्षी वृद्धापकाळाने त्यांच्या तिलोरे येथील राहत्या घरी शनिवार दिनांक २६ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता निधन झाले. त्यांचा अंत्यविधी रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी १०:०० वाजता तिलोरे येथील बौद्ध स्मशान भूमीत बौद्ध धम्माच्या रीतीरिवाजां प्रमाणे करण्यात आला. त्यांच्या अंत्यविधीसाठी माणगांव तालुक्यासह रायगड जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून धम्म उपासक, उपासिका आणि विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर व विविध सामाजिक धार्मिक संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांचा जलदान विधी, पुण्यानुमोदन अभिवादन सभा कार्यक्रम त्यांच्या तिलोरे येथील राहत्या घरी रविवार दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित करण्यात आला आहे. 

      कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, मुलगी जावई असा मोठा परिवार आहे. सामाजिक धार्मिक क्षेत्रातासह कौटुंबिक जीवनात आदर्शवत असलेल्या लक्ष्मीबाई केशव कासे या अत्यंत प्रेमळ स्वभावाच्या व प्रचंड मेहनती, कष्टाळू आणि सुसंस्कारी होत्या. त्यांनी आपल्या वैवाहिक जीवना नंतर त्यांचे पती केशव कासे यांच्या समवेत शेती व्यवसायात प्रचंड काबाडकष्ट केले. त्या उभयतांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत आपल्या मुलांना शिक्षण आणि चांगले संस्कार दिले. आज त्यांची मुलं, सुना, नातवंडे विविध महत्वपूर्ण क्षेत्रात मोठमोठ्या हुद्द्यावर कार्यरत असून त्यांचे कुटुंब प्रगती पथावर आहे. याचे सर्व श्रेय कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई आणि पिताश्री केशव कासे यांना जाते. कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे ह्या केवळ नावानेच लक्ष्मीबाई नाही तर कासे कुटुंबियांच्या घरातील सर्वार्थाने लक्ष्मी होत्या. त्यांच्या निधनाने कासे कुटुंबीय, सगेसोयरे नातेवाईक आणि तिलोरे बोधिसत्व सेवा संघावर दु:खाची शोककळा पसरली आहे. कालकथीत मातोश्री लक्ष्मीबाई केशव कासे यांना पत्रकार विश्वास गायकवाड आणि सहपरिवार बोरघर, माणगांव यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

Saturday, 26 July 2025

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. श्री. अजितदादा पवार साहेब यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा…

पुणे जिल्हा, प्रतिनिधी (स्नेहा उत्तम मडावी) :
आजच्या महाराष्ट्रात जेव्हा खऱ्या नेतृत्वाबद्दल चर्चा होते, तेव्हा पहिलं नाव घ्यावं लागतं ते अजितदादांचं कारण, दादा म्हणजे झपाटलेपणाचं, निर्णयक्षमतेचं आणि निष्कलंक कार्यक्षमतेचं प्रतीक. प्रशासनावर अत्यंत अचूक पकड असलेले, कोणताही विषय खोलवर समजून घेणारे आणि निर्णय घेताना लोकहिताला अग्रक्रम देणारे आणि रोखठोक बोलणारे गरिबांचा खरे कैवारी **दादा हे खऱ्या अर्थाने जनतेचे नेता आहेत त्यांचं नेतृत्व हे केवळ राजकीय नसून, सामान्य माणसाला स्फूर्ती देणारं आहे. जनतेच्या अडचणींवर तोडगा काढण्यासाठी झटणारे, प्रत्येक समस्येकडे गांभीर्याने पाहणारे, आणि **माणुसकीचा गहिरा स्पर्श असलेले दादा आज कोट्यवधी जनतेचा आधार, विश्वास आणि बळ बनले आहेत
खेड तालुक्यातसुद्धा अशाच एका नेतृत्वाची प्रतिमा दिसते, ती म्हणजे आमचे मार्गदर्शक, माजी आमदार मा. दिलीप अण्णा मोहिते पाटील अजितदादांना आपले प्रेरणास्थान मानणाऱ्या अण्णांच्या नेतृत्वशैलीतही तोच झपाटलेपणा, तीच लोकांसाठीची धडपड, आणि जनतेशी असलेली नाळ जाणवते. त्यामुळेच आम्ही त्यांना “*कार्यसम्राट*” ही उपाधी देतो. पद असो वा नसो, अण्णा नेहमीच लोकांसाठी झटत राहतात हीच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची खरी ओळख आहे. 

सप्तरंग कलेक्शन आणि सप्तरंग मिसळ हाऊस या आमच्या व्यावसायिक उपक्रमाच्या उद्घाटनाला स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा उपस्थित राहिले ही आमच्यासाठी अभिमानास्पद आणि संस्मरणीय बाब ठरली. एक तरुण उद्योजक म्हणून मला आणि माझ्या पत्नीला, सौ. अश्विनी पाचारणे यांना, दादांकडून मिळालेली ही *प्रोत्साहनाची ऊर्जा आजही प्रेरणा देते. दादांची शिस्त जितकी ठाम, तितकीच त्यांची माणुसकीही अपार. उद्घाटनाच्या दिवशी दादांनी हसत-हसत म्हटलं, “अरे बाबा, सप्तरंग मिसळ हाऊसचे उद्घाटन झालं पण मला काही मिसळ खायला मिळाली नाही बुवा !” या मिश्किल वाक्याने सगळं वातावरण हलकं-फुलकं होऊन सर्वीकडे हास्यकल्लोळ झालं. हीच दादांची खासियत प्रेमळ, हसतमुख आणि सर्वांशी सहज संवाद साधणारे नेतृत्व.
त्या कार्यक्रमात सौ. अश्विनी पाचारणे यांनी दादांकडे एक विनंती केली मा. दिलीप अण्णांना विधान परिषद आमदार करावे परंतु दादा एका कार्यकर्त्याने दिलेले पत्र वाचण्यात व्यस्त असल्यामुळे अश्विनीताईंनी सांगितलं दादा तुमच आमच्याकडे लक्ष नाहीये त्यावेळेस त्यावर दादांनी आपल्या खास शैलीत आणि हळुवार भाषेत उत्तर दिलं हो हो माझं लक्ष आहे आणि मान हलवली. हेच दादांचं वैशिष्ट्य ते फक्त राजकारणी नाहीत, तर समाजकारणाच्या प्रत्येक पैलूसोबत जोडलेले देवमाणूस आहेत. दादांचा स्पष्टवक्तेपणा, अचूक काम करण्याची कार्यशैली आणि निर्णयक्षम वृत्ती यामुळे त्यांचं नेतृत्व हे आजच्या महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यावश्यक आहे. म्हणूनच आम्हा लाखो कार्यकर्त्यांची एकच इच्छा आहे अजितदादा पवार हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत, आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही परमेश्वराकडे एकच प्रार्थना करतो आपल्याला उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य लाभो. आपली लोकसेवेची भावना अधिकाधिक दृढ होत जावो. आपलं नेतृत्व आम्हाला नेहमीच मार्गदर्शन करत राहो. आपण अशीच निस्वार्थपणे महाराष्ट्राच्या विकासासाठी झटत राहावं… हीच सदिच्छा. 

** दादांना मनापासून अभिवादन आणि वाढदिवसाच्या अनंत शुभेच्छा ! 

शुभेच्छुक : सौ.अश्विनी राजेंद्र पाचारणे, उपाध्यक्ष - राजगुरुनगर सहकारी बँक लिमिटेड आणि श्री.राजेंद्र शांताराम पाचारणे सर्वेसर्वा  - आरीकेत ग्रुप ऑफ कंपनीज - चाकण - खेड.

इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार मिळाला !!

इंद्रा  इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार मिळाला !!

मुंबई, सुनील भोसले : रोजी सीईडी फाउंडेशनने मुंबईतील अरिचिड इंटरनॅशनल हॉटेलमध्ये एसडीजी स्कूल पुरस्काराचे आयोजन केले होते. याप्रसंगी संपूर्ण भारतातील ७० शाळांची निवड करण्यात आली. मानखुर्द येथील इंद्रा इंग्लिश हायस्कूलला एसडीजी पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक डॉ. अशोक गुप्ता यांना एसडीजी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सीआयडीच्या संस्थापक डॉ. प्रियदर्शिनी नायक आणि डॉ. होमी भाभा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास पडये यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार मिळाल्यावर डॉ. गुप्ता यांचे मित्र आणि शिक्षकांनी त्यांचे अभिनंदन केले आणि त्यांनी केलेल्या कार्याचे कौतुक केले. या पुरस्कारामुळे शाळेच्या परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले.

Friday, 25 July 2025

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

"कोकण रत्न" पदवीसाठी नामांकन पाठविण्याचे स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे आवाहन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

              स्वतंत्र कोकण राज्य अभियान अंतर्गत विविध श्रेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या १० भगिनी आणि २५ कोकणी बांधवाना शनिवार १३ डिसेंबर २०२५ रोजी मुंबई मराठी पत्रकार संघ, दुसरा मजला, महापालिका मार्ग, आझाद मैदान शेजारी मुंबई येथे दुपारी ४ ते ६ या वेळेत "कोकण रत्न" पदवी प्रदान करण्यात येणार आहे. यामध्ये पदवी प्राप्त भगिनींना सेमी पैठणी साडी, गोल्ड प्लेटेड मेडल, आकर्षक फ्रेम मध्ये कोकण रत्न पदवी प्रमाणपत्र तर पुरुषांना कोकणरत्न पदवी प्रमाणपत्र, गोल्ड प्लेटेड मेडलप्रदान
 करण्यात येईल.
           कोकण रत्न पदवीसाठी संजय कोकरे संस्थापक / अध्यक्ष 9224443119, 2) धंनजय कुवेसकर मुंबई अध्यक्ष 9869076602, 3) सुखदेव पवार संघटक 8082769 091 यांच्या व्हाट्सअप नंबरवर आपले नामांकन पाठवावे असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक / अध्यक्ष संजय कोकरे यांनी केले आहे. कोकण रत्न पदवीसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जात नाही याची नोंद घेण्यात यावी. तरी इच्छुकांनी दिलेल्या व्हाट्सअप नंबरवर आपली सविस्तर माहिती पाठवावी असे आवाहन स्वतंत्र कोकण राज्य अभियानतर्फे करण्यात करण्यात आले आहे.

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !!

बारवी नदी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा  !! 

**पाण्याच्या  पातळीत वाढ होत असताना कोणीही  नदी ओलांडू नये, किंवा अशा मार्गाने प्रवास करु नये -"एम.आय.डी.सी.प्रशासन"

मुरबाड  ( मंगल डोंगरे ) - संततधार पावसामुळे बारवी धरणाच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली असून, औद्योगिक विकास महामंडळाने संभाव्य धोका लक्षात घेऊन, तसेच शुक्रवार दिनांक 25/07/2025 रोजीची दुपारी 3.00 वाजता ची धरणाच्या पाण्याची पातळीची पाहणी केली असता, ती 70.60 मि.मि.असुन उत्साहीत पातळी ( overflo level) 72.60 हि.मि. एवढी आहे व सद्य स्थितीत बारवी धरणातील पाणीसाठा 83.07, टक्के आहे. बारवी जल ग्रहण क्षेत्रात सततच्या पडणाऱ्या पावसाचे प्रमाण वाढत असल्यामुळे धरणात येणारा संभाव्य येवा वाढत आहे. त्यामुळे बारावी धरणाची पातळी वाढुन बारवी धरणाचे स्वयंचलित ( वक्र द्वारे ) गेट येणाऱ्या काही दिवसांत उघडण्याची शक्यता आहे. परिणामी बारावी धरणातून बारावी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू होईल. 

तरी क्रुपया  बारावी नदीत काठच्या विशेषतः आस्नोली, चांदप, चांदप पाडा, पिंपळोली, सांगाव, पाटील पाडा, पादीर पाडा, कारंद मो-याचा पाडा, चोण, राहटोली या नदी काठावरील गावांनी तसेच इतर शहरे व शहरातील सरकारी यंत्रणा, तसेच गावातील सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील, यांनी गावांतील नागरिकांना नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होत असलेबाबत सतर्कतेच्या सुचना देण्याची ताकीद दिली असुन, या काळात कोणत्याही प्रकारे वाहत्या पाण्यात नागरीकांना व पर्यटकांना प्रवेश न देणे बाबत तसेच नदीच्या पात्रात पोहण्यास मज्जाव करण्यात यावा - सुचना देण्यात आल्या आहेत.

मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रविवारी दादर येथे कोकणकरांची महासभा !!

कोकणवासीयांनो, एकत्र या... आपल्या हक्कासाठी आवाज उठवा !!

** मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे रविवारी दादर येथे कोकणकरांची महासभा


मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियोजन करावे, कोकण रेल्वे व एसटी प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती करावी यावर चर्चा आणि सरकार कडे मागणार मागण्या .....  

मुंबई (शांताराम गुडेकर) 
         
                 गणेशोत्सव हा कोकणवासीयांचा सर्वांत भावनिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या महत्त्वाचा सण आहे. दरवर्षी लाखो कोकणवासी मायभूमीकडे – कोकणात – गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी आणि सण साजरा करण्यासाठी प्रवास करतात. मात्र, मुंबई-गोवा महामार्गाचे दीर्घकाळ चालू असलेले आणि अद्याप अपूर्ण असलेले काम हे Background मार्गातील सर्वात मोठे अडथळे ठरले आहे.

             यंदाही, महामार्गाच्या कामातील दिरंगाईमुळे हजारो प्रवाशांना अपार त्रास सहन करावा लागणार आहे. वेळेवर पोहोचता येत नाही, अपघातांचे प्रमाण वाढते आहे, तसेच सार्वजनिक आणि खाजगी वाहतुकीवरही गंभीर परिणाम होत आहेत. हे दुर्लक्ष कोकणवासीयांच्या आणि गणेशभक्तांच्या श्रद्धेवरच घाला घालणारे आहे.
              या पार्श्वभूमीवर मुंबई-गोवा महामार्ग जनआक्रोश समिती’ मार्फत कोकणकरांची महासभा आयोजित केली आहे. यामध्ये मुंबई व ठाण्यातील कोकण वाशीयांच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील संस्था तसेच विकास मंडळे, एस.टी. प्रवासी संघटना, कोकणातील रेल्वे प्रवासी संघटनासह खाजगी वाहतुकदार तसेच ट्रान्सपोर्ट यांच्यासंघटना, तसेच राजकिय पक्षांचे मान्यवर, समाजसेवक, सर्व सामान्य कोकणकर उपस्थित राहणार आहेत. ही सभा सुरेन्द्र गावस्कर सभागृह मराठी ग्रथसंग्रहालय, नायगाव, दादर पुर्व मुंबई येथे रविवार दिनांक २७ जुलै २०२५ रोजी सकाळी ११:०० वाजता आयोजित केली आहे.
             यावेळी कोकणकरांचा कौल घेत सरकार ला अल्टिमेटम व मान्यवरांचे मार्गदर्शन घेत पुढील मागण्या अडचणीकडे लक्ष वेधण्यात येईल.  मुंबई-गोवा महामार्गाचे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे,गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीसाठी विशेष नियोजन करावे, कोकण रेल्वे व एसटी प्रवासासाठी अतिरिक्त सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अपघातग्रस्त ठिकाणी तात्काळ उपाययोजना व रस्त्यांची दुरुस्ती करावी यावर चर्चा आणि सरकार कडे मागण्या करण्यात येणार आहेत.
               सरकारकडे एकच मागणी करतो की, कोकणवासीयांचा संयम अजून किती वेळ पाहणार? तरी सर्व संघटनांना, कार्यकर्त्यांना, कोकणप्रेमींना आणि सामान्य प्रवाशांना विनंती करण्यात येते की आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहून सरकारवर दबाव आणण्यासाठी, आणि प्रशासनास जाब विचारण्यासाठी एकत्र येऊया. आपल्या हक्कासाठी... आपल्या रस्त्यांसाठी... आपल्या गणेशोत्सवासाठी... आवाज उठवायलाच हवा.तरी या सभेला कोकणवाशीय मुंबई कर यांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असं आवाहन मुंबई -गोवा महामार्ग जनआक्रोश समितीतर्फे करण्यात आले आहे.

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा !!

*** संरक्षण भिंतींच्या निधीलाचं संरक्षणाची गरज

विक्रोळी, (केतन भोज) : म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाच्या अखत्यारीत येणाऱ्या मुंबईतील विक्रोळी पार्कसाईट येथील संरक्षक भितींच्या कामांमध्ये महाघोटाळा झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मध्ये बहुतांश मोठ्या प्रमाणावर डोंगराळ भाग आहे त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यात दरडीचा भाग कोसळून होणाऱ्या दुर्घटनांमध्ये लगतच्या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना याचा नाहक त्रास सहन करावा लागतो. या घटनांना आळा घालण्यासाठी म्हाडाने ठिकठिकाणी दरडीच्या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यासाठी जिल्हाधिकारी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आवश्यक निधी मंजूर करून त्यासाठी निधी देखील पास केला होता. विक्रोळी पार्कसाईट मध्ये एकूण २७ संरक्षण भिंतींच्या कामासाठी आतापर्यंत निधी मंजूर होऊन त्या म्हाडा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत मंजूर ही झाल्या आहेत. तसेच अजून ही पुढे विक्रोळी पार्कसाईट करिता नऊ संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर झाला आहे. फक्त आता त्याच्या वर्क ऑर्डर निघायच्या बाकी आहे. मात्र प्रत्यक्षात याठिकाणी संरक्षण भिंतींच्या कामासाठी निधी मंजूर आणि वर्क ऑर्डर निघून देखील संरक्षण भिंतींचे बांधकाम चालू झालेले नाही. तसेच काही ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम याआधी पूर्ण होऊन ही त्या पुन्हा- पुन्हा नव्याने मंजूर केल्या गेल्या आहेत असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मग एवढा निधी कुठे गेला ? असा संतप्त सवाल स्थानिक नागरिक संबंधित प्रशासनाला विचारत आहेत. या पावसाळ्यात देखील विक्रोळी पार्कसाईट मधील डोंगराळ भागात संरक्षण भिंतींअभावी दरड कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. अखेर येथील स्थानिक लोकांना जीव मुठीत घेऊन जगाव लागत आहे.मात्र तरी संबंधित प्रशासनाला याचेे काहीही देणेघेणे नसल्याचे याठिकाणी दिसत आहे. म्हाडाच्या मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळामार्फत डोंगर उतारांवरील भागांमध्ये संरक्षण भिंत उभारण्यात येतात. लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून हे काम केले जातंय. मात्र सध्या स्थितीत विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतीच्या कामात मोठ्या प्रमाणावर महाघोटाळा झाला असल्याचे चित्र दिसत आहे. याठिकाणी संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली कोट्यवधी रुपये लाटल्याचा धकादायक प्रकार विक्रोळी पार्कसाईट मध्ये समोर आला आहे. विक्रोळी पार्कसाईट मधील अनेक भागांमध्ये संरक्षण भिंती उभारण्याच्या नावाखाली, तद्दन खोटे कागदी घोडे नाचवत यामध्ये कोणत्या लोकप्रतिनिधीच्या कंत्राटदाराला खुश करण्यासाठी फक्त संरक्षण भिंतींच्या नावाखाली टेंडर काढली जात आहेत का? तसेच यामध्ये संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत कोट्यवधी रुपये लाटल्याचं धडधडीत प्रकार याठिकाणी समोर आला आहे. यामध्ये म्हाडा दक्षता विभागाची भूमिका देखील संशयास्पद असल्याची दिसत असून, यामुळेच विक्रोळी पार्कसाईट मध्ये संरक्षण भिंतींच्या कामात महाघोटाळा झाल्याचे तरी दिसत आहे. म्हणूनच निव्वळ संरक्षण भिंतींचे खोटेनाटे बुजगावणे उभे करत स्थानिक रहिवाशांच्या जिवाशी खेळ करणाऱ्या संबंधित प्रशासनाचा याठिकाणी पर्दाफाश करावा असे मत स्थानिक नागरिक व्यक्त करत आहेत. तसेच आता या संरक्षण भिंतींच्या निधीलाच संरक्षण देण्याची गरज याठिकाणी दिसत आहे.

रामनगर सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार ...

रामनगर सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या भिंतीच्या बांधकामात भ्रष्टाचार ...

*** आशिर्वाद कोणाचा ?

घाटकोपर,‌ (केतन भोज) : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) अंतर्गत अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये नाल्यालगत वसलेल्या झोपडपट्टी वासियांच्या संरक्षणार्थ नाल्याच्या ठिकाणी संरक्षण भिंतीचे बांधकाम अंतर्गत १६९ घाटकोपर (पश्चिम) विधानसभा क्षेत्रातील प्रभाग क्रमांक १२३ मधील रामनगर- ब सज्जनगड सोसायटी येथील नाल्यालगत बांधण्यात आलेल्या संरक्षण भिंतीच्या बांधकामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये कंत्राटदाराला खुश करण्यासाठी जास्त रक्कमेचे टेंडर काढण्यात आले होते. आणि त्यामधील निम्म्याहून कमी रक्कम खर्च करून हे काम करण्यात आले असल्याचे सामाजिक कार्यकर्ते यांचे म्हणणे आहे. त्यामुळे या कामात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे सिद्ध होत आहे. यासाठी याला आशिर्वाद नक्की कोणाचा आहे ? याची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच मनपा एन विभागाचे प्रभाग क्रमांक १२३ (देखभाल)चे जबाबदार अधिकारी यांची भूमिका देखील याठिकाणी संशयास्पद असून या सर्व प्रकरणाची आणि या कामाची सखोल चौकशी करण्यासाठी स्थानिक सामाजिक कार्यकर्ते यांनी पुढाकार घेतला असून त्यांनी महापालिका एन विभागाचे सहाय्यक आयुक्त यांच्याकडे लेखी स्वरूपात तक्रार दाखल केली असून मनपा एन विभागाचे (देखभाल) प्रभाग क्रमांक १२३चे संबंधित अधिकारी आणि सदर कामाच्या कंत्राटदारावर कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.

Thursday, 24 July 2025

कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन !!

कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्यतर्फे कारगिल विजय दिवस व सैनिक फेडरेशन वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन शनिवार दि. २६ जुलै, २०२५ रोजी शहीद स्मारक, बीएमसी ऑफिस समोर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे करण्यात आले आहे. 

सैनिक फेडरेशनच्या माध्यमातून प्रति वर्षा प्रमाणे याही वर्षी कारगिल युध्दाचे २६ वर्ष पुर्ण झाल्याबद्दल (विजयोत्सव) सोहळा साजरा करण्याचे नियोजित केले आहे. या कार्यक्रमाचे स्वरूपरेषा पुढील प्रमाणे आहे. सकाळी ८.०० वाजता : देशभक्ती गीतांची धून,सकाळी ९.३० मि.: प्रमुख पाहुण्यांचे आगमन, सकाळी १०.०० वाजता : कारगिल युद्धातील शहिदांना मानवंदना, सकाळी ११.०० वाजता : विविध सांस्कृतिक कार्यक्रम व छत्रपती शिवाजी महाराज शिवकालीन कवायती चे प्रदर्शन, सकाळी ११.३० वाजता : प्रमुख मान्यवरांचे संबोधन, दुपारी १२.०० वाजता :कारगिल युद्धात सहभागी असलेल्या सैनिकांचा व वीरनारी, वीर पिता, वीरमाता यांचा सत्कार सोहळा पार पडणार असल्याची माहिती डी.एफ. निंबाळकर( जनरल सेक्रेटरी -सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्य)यांनी दिली.

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचनेवर शिवसेनेने घेतली हरकत !!

** नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्याची शिवसेना शिंदे गटाची मागणी 

उरण दि २४, (विठ्ठल ममताबादे) : महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक अ कोकण विभागीय पुरवणी क्रमांक RNI NO. MAHBIL/२००९/३५५७४, दिनांक १४/०७/२०२५ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. सदर आदेशानुसार उरण पंचायत समिती येथे झालेल्या बैठकीमध्ये नवघर जिल्हा परिषद प्रभाग रचना नव्याने करण्यात यावी, त्यामध्ये २०१७ च्या निवडणुकी पूर्वी नवघर जिल्हा परिषद मतदार संघामध्ये सोनारी, करळ, सावरखार अशी तीन गावे आताच्या प्रभाग रचनेत वगळण्यात आलेली आहेत. ती पुन्हा एकदा नवघर जिल्हा परिषदेमध्ये घेण्यात यावी.त्याचबरोबर काळा धोंडा हे चाणजे ग्रामपंचयातीमध्ये समाविष्ठ असल्यामुळे तो भाग चाणजे जिल्हा परिषद प्रभागात घेण्यात यावा अशी मागणी शिवसेना शिंदे गटाचे रायगड जिल्हा प्रमुख अतुल भगत यांनी उरणचे तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहारद्वारे केली आहे.भारतीय लोकसंख्येची जनगणना मागील बारा वर्षे झाली नसल्याकारणाने उरण मतदार संघातील जिल्हा परिषद प्रभाग रचनेमध्ये लोकसंख्येत मोठ्या प्रमाणात बदल झाले आहेत. तरी नवघर जिल्हा परिषदेत पारंपारिक असलेले प्रभागातील गावे न वगळता नव्याने २०१७ च्या निवडणुकीत अगोदर असलेले प्रभाग रचना तसेच ठेवण्यात यावी अशी मागणी तहसीलदार उद्धव कदम यांच्याकडे पत्रव्यवहाराच्या माध्यमातून व हरकत घेऊन जिल्हाप्रमुख अतुल भगत यांनी केली आहे.

रामनगर सज्जनगड - सिद्धार्थ सोसायटी येथील नाल्यावरील जीर्ण झालेला पूल धोकादायक स्थितीत ; स्थानिक नागरिकांचा जीवमुठीत घेऊन प्रवास !!

रामनगर सज्जनगड - सिद्धार्थ सोसायटी येथील नाल्यावरील जीर्ण झालेला पूल धोकादायक स्थितीत ; स्थानिक नागरिकांचा जीवमुठीत घेऊन प्रवास !!

घाटकोपर, (केतन भोज) : रामनगर ब प्रभाग क्रमांक १२३ मधील सज्जनगड सोसायटी - सिद्धार्थ सोसायटी येथील मुख्य मोठ्या नाल्यावरील स्थानिक रहिवाशांकरिता असलेला नाल्यावरील पूल धोकादायक स्थितीत झाला असून या नाल्याच्या मुख्य बांधकामाला आणि नाल्यावरील पुलाला मोठे भगदाड पडले आहे.तर नाल्याचा काही भाग हा खचला आहे त्यामुळे तो आता पावसाळ्यात कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.परिणामी येथील स्थानिक सोसायट्यांना जोडणाऱ्या या नाल्यावरील मुख्य पूलावरून स्थानिक नागरिक आपला जीव मुठीत घेऊन रोज येजा करत आहेत. 

तसेच या धोकादायक ठरत असलेल्या नाल्याच्या आजूबाजूला राहणाऱ्या स्थानिक नागरिकांना तसेच लहान मुलांना देखील आपला जीव मुठीत घेऊन याठिकाणी राहावे लागत आहे.परिणामी याठिकाणी आता धोकादायक परिस्थिती निर्माण झाली असून हा पूल आता कधीही कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच येथील स्थानिक नागरिकांसाठी हा पूल येण्या - जाण्याचा हा एकमेव मार्ग असल्यामुळे जर हा धोकादायक पूल कोसळ्यास स्थानिकांचा येण्या-जाण्याचा मार्ग बंद होऊ शकतो.तरी या समस्येकडे पालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे,असे येथील स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.या मुख्य नाल्यावरील पुलाच्या दुरुस्तीसाठी किंवा पुनर्बांधणीसाठी पालिका प्रशासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होताना दिसत नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये मनपा प्रशासनाच्या विरुद्ध नाराजी व्यक्त होताना दिसत आहे.तरी सज्जनगड - सिध्दार्थ सोसायटी येथील मुख्य नाल्यावरील जीर्ण पुलाच्या या समस्येकडे संबंधित मनपा पालिका प्रशासनाने दुर्लक्ष करणे अत्यंत गंभीर आहे.मनपा प्रशासनाने यावर त्वरित कार्यवाही करणे आवश्यक असून, जेणेकरून स्थानिक नागरिकांची गैरसोय दूर होईल आणि कोणतीही दुर्घटना होणार नाही याची हमी घेणे देखील तितकेच गरजेचे आहे.

Wednesday, 23 July 2025

उद्घाटनाच्या दिवशीच ग्रामसेवक निलंबित !!

**उद्घाटनाच्या दिवशीच ग्रामसेवक  निलंबित,,**

मुरबाड , ( श्री.मंगल डोंगरे ) : तालुक्यातील न्हावे  या गावातील नागरिकांना मुलभूत सुविधा पुरविण्यात यशस्वी ठरलेले सरपंच जगदिश हिंदुराव, यांचे कारकीर्दीत बांधण्यात आलेल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन मा.आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते नुकताच करण्यात आले. या गावात अगोदरच दोन कार्यालय असताना हे नवीन ग्रामसचिवालय झाले आहे. यामुळे येथूनच ग्रामपंचायतीचा कारभार चालणार आहे. या गावाला प्रशस्त असे ग्राम सचिवालय मिळाल्याने त्या नुतन सचिवालयाचे आमदार किसन कथोरे यांचे शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले. मात्र त्याच दिवशी न्हावे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक  दिपक कासार यांना  सीईओ  रोहन घुगे यांनी केलेल्या कारवाईत तडकाफडकी  निलंबित  केल्याने ग्रामपंचायतीच्या कामाचा गौडबंगाल समोर आल्याच्या  चर्चैला उधाण आले आहे .   

सीईओ श्री.रोहन घुगे यांनी पदभार स्वीकारल्यापासून  त्यांची कार्यपद्धती आणि धमक हि त्यांनी केलेल्या कामातून दिसून येत आहे. ठाणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यांत त्यांनी कारवाईचा बडगा  उगारला असुन, कामात दिरंगाई, अनियमितता, अफरातफर अशा भोंगळ कारभार करणा-या ग्रामसेवकांच्या छातीत धडकी भरली आहे. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे एकाच दिवशी मुरबाड तालुक्यातील प-हे  व न्हावे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर तात्काळ केलेली निलंबनाची कारवाई हे होय. त्यामुळे तालुक्यातील असे अनेक ग्रामसेवक कारवाईच्या भितीच्या सावटाखाली काम करत असून, सीईओ ची कारवाईची टांगती तलवार कधीही त्यांच्या मानगुटीवर पडुन शकते.अशी आपसात चर्चा सुरु आहे. मात्र ह्या कारवाई झालेल्या ग्रामसेवकांनी केलेल्या चुकीच्या कामांना केवळ ग्रामसेवकच जबाबदार आहेत.की गावातील ठेकेदार या अन्य कोणी लोकप्रतिनिधी याबाबत अंतर्गत चौकशी सुरू असल्याची माहिती लवकरच स्पष्ट होणार असून याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिपक खाटेघरे यांची निवड !!

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी दिपक खाटेघरे यांची  निवड !!

मुरबाड, ( मंगल डोंगरे ) :-  आज झालेल्या मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाच्या निवडणुकीत मुरबाड पंचायत समितीचे माजी उपसभापती दिपक खाटेघरे यांची बिनविरोध सभापती म्हणुन निवड झाली आहे.
             बाजार समितीचे माजी सभापती बाळकृष चौधरी यांनी राजीनामा दिल्याने सभापती पद रिक्त होते.त्या रिक्त असलेल्या जागेची आज निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक सहकारी संस्था मुरबाड श्री.सुजय पोटे यांनी कामकाज पाहिले. प्रक्रिया सुरू झाली तेव्हा श्री. दिपक खाटघरे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. दुसरा अर्ज दाखल नसल्याने दिपक खाटघरे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी  ठाणे जी. प. चे माजी उपाध्यक्ष सुभाष पवार यांनी त्यांचे पुष्प गुच्छ देऊन स्वागत करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी बाजार समितीचे संचालक तसेच हितचिंतक मोठ्या संख्येने शुभेच्छा देण्या साठी उपस्थित होते.

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...